बकेट लिस्ट समीक्षा

बकेट लिस्ट बघून आलो
बघितल्यावर खालील जाणिवा झाल्या :
१. प्लास्टिक हा अत्यंत नैसर्गिक, सेंद्रिय आणि झपाट्याने विघटनशील पदार्थ आहे .
२. माधुरी दीक्षित शिंदे पुलावर उभी राहिल्यावर ओंकारेश्वराचे मंदिर सुंदर व तरुण वाटते ( ताजा ऑइल पेंट हेच काय ते दोघांमधील साम्य)
३. प्रभात रोड वरच्या आपट्यांच्या बंगल्यात अजूनही पापड लाटून टाईमपास करतात .
४. माणिक वर्मांची मुलगी अजूनही लाऊड मराठीतून इंग्लिश बोलण्याचे क्रूड विनोद करते .
५. सिटी प्राईड कोथरूडला आवाज मोठा आणि एसी छोटा ठेवतात , त्यामुळे झोप लागू शकत नाही
६. माझ्या नवऱ्याची बायको नावाची सिरीयल अत्यंत डीप असावी
७. करण जोहर हे वैचारिक चित्रपट निर्मिती करत असावेत .

मंडळी , बकेट लिस्ट बघा , आपल्या माधुरीला मदत करा .
आणि धाग्यावर प्रतिसाद लिहा.
हसा आणि लठ्ठ व्हा .
रेणुका शहाणे गेली हम एके है कौन रिलीज झाल्यानंतर आजपर्यंत खूप हसत असाव्यात.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

ब्राह्मणच ब्राह्मणाचा शत्रू असतो. ही अशी कूपमंडूक वृत्ती आहे म्हणून ब्राह्मण मागे पडतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समीक्षा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

जबरी. हा पिक्चर पाहायला अजिबात उत्सुक नव्हतो. पण आता पाहावासा वाटतोय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसता पाहू नका, त्यावर फारएन्डी परीक्षण येऊ द्या.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पण चित्रपट धमाल आहे का?
हाच तमिळ असता तर नुसते बॅाक्स ओफिस गल्ल्याचे आकडे झळकले असते.
एकूण व्यापक आणि कमी वेळ असणाय्रांसाठीची समिक्षा आवडली.
निअरएण्ड समिक्षा बकेट लिस्टसाठी योग्यच. वेळ संपत आलेली असते ना.
-
भाऊ कदम : मी मग नवीन सिनेमा काढणार.
निलेश : मग, का? आता का नाही?
भाऊ कदम : आताच काढणार, त्या पिच्चरचे नाव मग.
निलेश :?
भाऊ कदम : माधुरीची बकेट तर आपला मगच असणार ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला हा सिनेमा अत्यंत उथळ , फालतू , गरीब , खोटा , प्लास्टिक , बेगडी आणि बोअर वाटला. पण माझं जाऊ दे , मी सिनेमाऔरंगजेब आहे असं गृहीत धरलं तरीही , माझ्या बरोबर असलेले ममव सहृदयी सिनेमाप्रेमी होते त्यांनाही तो "तितका आवडला नाही . थोडा कंटाळा आला "आणि अगदी टोकाचीमाधुरीफ्यान असलेली मित्रपत्नी म्हणाली कि "विषय चांगला होता पण यावर सिनेमा अजून चांगला काढता आला असता " अशी इतर मते मिळाली .
आपापले निष्कर्ष काढा यातून ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडचेच दुसरे एक आपटे संस्कृत शब्दकोश काढणाय्रांचे वंशज अमेरिकेत /भारतातल्या आर्मित उच्चपदस्त असल्याने त्यांनाही पापडाने प्रयोजन नसावे॥

हे निर्देश् निर्मात्याने पटकथालेखकास दिले असणार - बेस्ट लोकॅलिटी/चर्चेतल्या जागा आणि मालिकातले हिट उद्योग घुसव. लेखक बिचारे खाल्लेल्या पापडखाराला*१ जागतात.

*१ - या नावाचे एक मीठ पापड करताना वापरतात असे अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी शेवटचा, थेट्रात पाहिलेला सिनेमा 'प्रकाश बाबा आमटे' होता. त्याआधी बालगंधर्व आणि डायरेक्ट वीर सावरकर २००१. मराठी सिनेमे, त्यांच्या पोष्टरवर असलेले क्यामेराम्यान-स्प्वाटब्वाय पासून सगळ्याच स्टारुल्यांचे फोटो पाहून इच्छाच मरते पाहण्याची.
आजपर्यंत पाहिलेला प्रत्येक मराठी चित्रपट ज्याम ओव्हररेटेड होता. हरिश्चंद्राची फॅक्टरी, किल्ला, एलिझाबेथ एकादशी हे त्यांचे शिरोमणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

मला नट नट्यांमधल काही कळत नाही. कपडे बदलले की मला ते लोक वेगवेगळे वाटतात. माधुरी दिक्शित व वर्षा उसगांवकर यांच्यात माझा जाम गोंधळ व्हायचा आता आता पर्यंत. बच्च्नला मी वायली कापड घातली तरी बी वळकतो
( नांव आठवून लिहिली आहेत)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बच्च्नला मी वायली कापड घातली तरी बी वळकतो

मग जया बच्चन(नांवाची नटी आहे)ला हेलन(नटीच) च्या कपड्यांत वळखाल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

माधुरी दिक्षीत यांनी आयुष्याच्या सर्व जबाबदाऱ्या अगोदर एकदाच्या संपवुन टाकल्या जसे अगोदर हिंदी सिनेमे नंतर इतर नंतर पुन्हा हिन्दी सिनेमे नंतर जाहीराती नंतर नृत्यप्रशिक्षण नंतर सर्वात शेवटी त्यांनी त्यांच्या आयुष्याच जे सर्वोच्च ध्येय्य होत मराठीची सेवा करणे या भाषेच कर्ज अदा करणे यासाठी शेवटी एकदाचा मराठी चित्रपट केला व यापुढेही आता वरील सर्व जबाबदारी संपवुन टाकल्याने आता मराठी च चित्रपट करुन त्या मराठी ची च सेवा करतील
अशा आपल्या मराठी अभिनेत्रीच्या महान कार्याला त्यागाला नावे कोण ठेवतो ?
मराठी माणुसच मराठी माणुसच
( माधुरी मराठीत चांगल्या संधीची "वाट" इतक्या वर्षापासुन बघत होती हे ही सहजपणे विसरवले जाते नाकारले जाते. एकतर तुम्ही तिला इतक्या वर्षात टुकार मराठी दिग्दर्शक निर्मात्यांमुळे संधी ची वाट पहायला भाग पाडले याचे वाईट वाटले पाहीजे होते पण नाही )

सबब मराठी माणसा जागा हो माधुरीच्या मराठी सिनेमाचा "खेळ" बघ

मराठी सिनेमात मराठी माधुरी दिक्षीतला पाहणे
जणु माधुरीच्या बकेटीत रविनाची हेमपुष्पा आढळणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version

अजून एक सेवा मराठीसाठी. ती म्हणजे माधुरीने मराठी नाटकांत काम करणे. आणि पहिल्या मराठी नाटकाची जाहिरात करताना, 'हवा येऊ द्या' वर येणे, आणि तिथेही मी खरी स्टेजवालीच, असे उसासे टाकत म्हणणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

माझ्या केसमध्ये-
आम्ही कितीही मोठे गणिती झालो, पीएचडी गाईड/रिसर्च स्कॉलर झालो आणि वयोपरत्वे ते, उच्चकोटीतलं (श्लेष जाणीवपूर्वक) गणित, मोठे विद्यार्थी इ. झेपेनासं झालं, नवीन विद्यार्थी भाव देईनासे झाले की अगदीच रिटायरमेंट घ्यायच्या आधी थोडं प्राथमिक शाळेत शिकवू म्हणतो. नंतर मीही शाळेतलाऽच असं म्हणायला मोकळे होतो. तसंच काहीसं सगळे करतात. (इथे आपापलं क्षेत्र घालून पहावं.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

बंगाली मिथुन हिंदीत आला तर बंगाली प्रेक्षक ज्या उत्साहाने गल्ला जमा करून देतात तितक्या उत्साहात मराठी कलाकारांस हिरो/हिरविण केल्याने होण्याची शक्यता माधुरीबद्दल हिंदी निर्मात्यांस वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सो कॉल्ड मराटी नट नट्यांना म्हातारं झाल्यावर बॉलीवुडात कोणी इचारत नाही म्हणून मग मऱ्हाटी प्रेमाचा पुळका / पाझर किंवा अजुन काय फुटतो तो वेळीच आवरायला पायजे. नाहीतरी मऱ्हाटी नट्यांना फिगर नसली तरी चालतय असा त्यांचा गोड गैरसमज आहे तो ही एकदा मोडून काढला पायजेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

तुमच्यामुळे ट्रेलर बघितला हो बकेट लिष्टीचा. गोरा गोमटा ट्रेलर आहे.

लहानपणी आजूबाजूच्या बहुतेकशा ब्राह्मण बायका मला सुंदर समजायच्या. (भारतीय) गोऱ्या वर्णामुळे. तीनेक वर्षांपूर्वी "तुझं सौंदर्य कमी झालंय, काळवंडलीस" असंही आणखी एका ब्राह्मणानं ऐकवून झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माधुरी नेहमी नेति नेति म्हणायची आता ने ने म्हणते.
( न -विनोद)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत हल्लीच एका माणसाचे शीश्नारोपण झाले म्हणे...

Now that's a bucket list movie I wanna see.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Liberalism is a mental disorder