Skip to main content

झगामगा, माफी मागा

माफकच पैसे बँकेत ठेवायचा विचार आहे. त्यानुसार आजपासून रोज फुरसतीच्या वेळेत खर्च सुरू केला आहे. ज्या गोष्टींच्या जाहिराती फेसबुकवर दिसतील, पॉर्नोग्राफीक फोटो लावलेले असतील, जे सतत डोक्याशी खिटखिट करतील अशाच वस्तू विकत घेतल्या जातील. खेरीज ज्या वस्तू अनेक वर्षं गरजेच्या होत्या - पण अजिबात जाहिराती करत नाहीत - अशा भाज्या, फळांनाही वगळलं जाईल. कळावे किंवा कळू नये.

अंगावर मोजकेच केस ठेवण्याचा विचार आहे. त्यानुसार आजपासून रोज फुरसतीच्या वेळेत शेव्हिंग सुरू केलं आहे. जे केस समोर दिसतात, जे कापायला खर्च खूप होतो आणि जे केस काळे आहेत असे केस आधी कमी करणार आहे. खेरीज, जे केस अनेक वर्षं साथ देऊन आहेत - पण त्यांच्याबद्दल लोक काँप्लिमेंटा देत नाहीत - असे काही लांबसडक उमेदवारही शेव्ह करणार आहे. कळावे.

घरात मोजकेच बटाटे ठेवण्याचा विचार आहे. त्यानुसार आजपासून रोजच्या कालवणात थोडेथोडे बटाटे घालणार आहे. ज्या बटाट्यांचा आकार आवडणार नाही, ज्यांना मुळं फुटलेली नाहीत, जे बटाटे माझ्यावर खुन्नस ठेवून आहेत असे बटाटे आधी खाणार आहे. खेरीज जे बटाटे अनेक महिने घरात पडून आहेत - पण अजिबात मुळं फुटलेली नाहीत - असे काही म्यूटेटेड बटाटेही खाणार आहे. कलोअ.

सध्या खूप रोग झाले आहेत. त्यांतल्या काही रोगांसाठी उपचार घ्यायला सुरुवात करणार आहे. यांतले काही जन्मापासून माझी सोबत करत आहेत. पण त्या रोगांमूळे मला फार सहानुभूती मिळत नाही, म्हणून त्यांच्यावर उपचार घेत आहे. त्यांनी कृपया ते मनाला लावून घेऊ नये. कळावे, मुंमब्री.

सध्या खूप कपडे झाले आहेत. त्यांतले काही मला होईनासे झाल्यामुळे मी ते काढून टाकणार आहे. त्यांनी मनाला अनेक वर्षं साथ दिलेली असली तरी आता शरीराशी त्यांचं भांडण सुरू झालेलं आहे. त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नये. कळावे. मात्र काही वर्षांनी पुन्हा तुमची गरज पडेल तेव्हा मी नाक घासत तुमच्याकडे येईनच. पुन्हा एकदा कळावे किंवा कसंही.

घरात खूप शब्द झाले आहेत. त्यांतले काही मी लहानपणापासून वापरत आहे. मूर्ख, आचरट, बिनडोक अशा शब्दांची सध्या गरज नाही. भिकारचोट, चुत्या आणि मादरचोद या शब्दांनी कामं सहजसाध्य होत आहेत. तेव्हा काही शब्दांना बेदखल करणार आहे. त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नये. ही विनंती मान्य न केलीत तरी हरकत नाही. या भिकारचोट शब्दांचा मला काहीही उपयोग नाही. त्यांनी कृपया हे व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये. कळावे. जरा तरी राग असावा किंवा असू नये किंवा कसंही.

हेडफोनमध्ये खूप गाणी झालेली आहेत. त्यांतली काही आता ऐकत नाही. त्यांतल्या काही गाण्यांनी तरुण वयात, ब्रेकपनंतर खूप साथ दिलेली आहे. पण मी सध्या चार लोकांशी डेटींग करत असल्यामुळे मला या गाण्यांची गरज उरलेली नाही. सध्या मी म्हातारवयीन लताबाईंच्या आवाजातल्या 'अनदेखा अनजाना सा पगला सा दिवाना सा' या गाण्यांत आनंदी आहे. पण इतरांनी राग मानू नये. कळलं का? ('आली रे, साली रे, दिल की दिलवाली लेकिन मुंह खोले तो गाली रे!)

सध्या खूप पुस्तकं वाचायची बाकी आहेत. त्यांतली कवितांची पुस्तकं माझ्याकडे गेली दहा वर्षांपासून पडून आहेत आणि मी ती वाचण्याची शक्यता बरीच कमी आहे. मात्र सध्या रद्दीला बराच भाव आल्यामुळे ती आणि ‘म’पासून सुरू होणारी पुस्तकं विकूून लायपोसक्शनसाठी पेसे जमा करणं हा माझा हेतू आहे. त्या पुस्तकांनी कृपया हे व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये.

आप कन्व्हिन्स हो गये या फिर मै और लिखू?

चिमणराव Sun, 03/06/2018 - 17:19

कन्व्हिन्सच.
घासून पुसून योग्य तेच ठेवायची जपानी पद्धत ( kizen) आवडली आहे.
आंब्याची पेटी रिकामी ( फक्त पेंढा आहे) माळ्यावर टाकलेली ती आज टाकणार.

'न'वी बाजू Sun, 03/06/2018 - 08:43

(१) काय चावले?
(२) मुंमब्री म्हणजे काय?

गवि Sun, 03/06/2018 - 09:48

कधीपासून होतंय असं? काही काळजी नको. यावर उपचार आहे. घाटकोपरला एक ओळखीचे वैद्य आहेत. फक्त एका हातोड्याने निदान करतात. हाताला गुण आहे. सर्व होईल ठीक.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 03/06/2018 - 17:16

In reply to by गवि

तिरशिंगरावांना फॉरम्याट जमलाय. तुम्हालाही जमेल.

फेसबुकवर असता का? तिथल्या पोस्ट्स बघितल्या नाहीत का? - खूप मित्र झाल्येत. माझ्याकडे लक्ष न देणाऱ्या लोकांना काढून टाकणार आहे. खुन्नस ठेवू नये, माफ करावे... असलं कायतरीच! झगामगा, माफी मागा.

गवि Sun, 03/06/2018 - 19:48

In reply to by 'न'वी बाजू

नुसतं बोलून काय फायदा नबाशेठ. माझ्या मूळ प्रतिसादाला खवचट श्रेणी आणि त्याखालच्या प्रतिसादाला पकाऊ दिल्यास काही अर्थ आहे.

तिरशिंगराव Sun, 03/06/2018 - 10:04

शंभर वर्षे पूर्ण झाली.आता वाचन होत नाही. त्यामुळे साठवलेली पुस्तके काढून टाकणार आहे. सुरवात, खांडेकर, फडके यांच्यापासून करावी म्हणतो. त्यानंतर अत्रे, चि.त्र्यं., कुरुंदकर .... याक्रमाने पुस्तके काढीन. लेखकांनी आऊटडेटेड झाल्याबद्दल खंत करु नये. यापुढे केवळ ऑडिओ बुक्स ऐकण्यांत येतील.