माझाही वेटलौस- मुक्तचिंतन

प्रथम; मी काही ह्या विषयातला तज्ज्ञ नाही. खालील मजकुरामागे फक्त स्वानुभव आणि इंटरनेट ज्ञान कारणीभूत आहे. बरीचशी वाक्यं सपशेल चूकही असू शकतात. असतीलच. माझा शास्त्रशुद्ध म्हणावा असा घंटा काही अभ्यास नाहीए ह्यामागे. पूर्ण फिटनेस जगताचा मी काढलेला लसावि इथे मांडत आहे.

तरीही, वाढणाऱ्या स्व-विषुववृत्ताचा आकार कमी करण्यासाठी मी ब.रा.च. शोध घेतलेला आहे. एकेकाळी चतुरंगमध्ये कुठल्यातरी लेखात दोन तत्त्वं कोणत्यातरी विलायतीच माणसाने मांडलेली दिसली- दोनच प्रकारच्या गोष्टी खाऊ नयेत: जे तुमची आजी खायची नाही ते, आणि ज्याची व्यावसायिक जाहिरात होते ते.

ढोबळपणे प्रत्येक व्हिडो/वेबपेज/आहारतज्ज्ञ हेच सांगतात की प्रमाणात आणि सकस खा, आणि थोडुसा व्यायाम दररोज करा. शिवाय निरनिराळ्या व्हिडो/सायटींवर ३० दिवसात वजन कमी वगैरे करण्यच्या अघोरी प्रतिज्ञा केलेल्या असतातच. अघोरी ह्यासाठी, की ३० दिवसांत तुमचा स्टॅमिना-शक्ती (थोडक्यात स्नायूंची घनता) खरंच जबरदस्त वाढू शकते. वजन कमी होणं ही जऽरा पुढची पायरी आहे.

मी जाऊन व्यायामशाळेत नाव नोंदवलं. मी पट्टीचा बुद्धीजीवी आहे. साठसाठवेळा जड काठ्या आणि तबकड्या उचलायच्या, इथून तिथे ठेवायच्या हा प्रकार प्रच्च्च्च्चंड बोअरींग होता. शिवाय तिथे जायला लागणारी तयारी वेगळीच. ते अजून कंटाळवाणं, थोडक्यात, तिथे जाणं म्हणजे काही फार आनंददायी प्रकार नव्हता. प्रचंड कंटाळवाणा. नंतर सुमारे एका वर्षाने मी किकबॉक्सिंगची जाहिरात पाहिली. किकबॉक्सिंग मला प्रचंड आवडतं. ते मी शिकायला सकाळी ६ वाजता जायचो. एक तास 'भयानक' व्यायाम व्हायचा. ४० मिनीटे-अगदी दहा सेकंदांचे २-३ ब्रेक घेऊन अविरत तो व्यायाम चालायचा, आणि २० मिनीटे सराव. तो सरावही तितकाच भयानक. पहिल्या दिवशी काही लोकांना चक्कर आली, काहींना उलटी झाली. दुसऱ्या दिवशी निम्मे लोक आले. एका महिन्यानंतर ३ लोक उरले. ४ महिन्यांनंतर मी एकटाच उरलो. मग बाकी लोक नसल्याने त्यातली मजा संपल्याने ते सुटलंच. पण वेट ट्रेनिंग नियमित सुरु होतं.
ह्या महिन्यांत मी जमेल तेव्हढं डाएटींग केलं. ॲव्हरेज भारतीय तरुणांच्या तुलनेत मी अतिशय कमी जंक फूड खातो- साधारण महिन्यातून ३-४वेळा इ. पण इतका व्यायाम करून वजन काही कमी होईना.
मग व्यायाम जात होता कुठे?
माझं पोट बरंच कमी झालं होतं. जुने टीशर्ट घातले की चक्क चांगले दिसत होते. दंड आणि अग्रबाहू साधारण दीडपट रुंदीचे झाले. खांदे रुंद आणि गोलाकार झाले होते. इ. वजन काही हललं नाही. पण मस्त वाटत होतं. आधी रेल्वेचा ब्रिज एकेक पायरी ओलांडत चढला की धाप लागायची. आता पूर्ण ब्रिज, जड बॅगेसकट घेऊन; चढून, परत उतरून ट्रेनच्या मागे थोडं जॉगिंग करुन आत घुसल्यावर लागते. वजन तेव्हढंच आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? तर माझ्या हाडांचं आणि स्नायूंचं (आणि उरल्यासुरल्या चरबीचं) वजन हे तितकंच आहे. पण इतकं ते असताना, माझं आयुष्य सुखी झालंय का? तर हो! मला आधीसारखं धावता येतं, जरा बरा दिसायला लागलो, स्टॅमिना प्रचंड वाढलाय, शक्तीही वाढली आहे, अरे फिर किसको मंगताय वेटलॉस?
(अवांतर: हे शिकवणारा जो मनुष्य होता, तो हे सगळे व्यायाम प्रचंड वेगात आणि अचूक करु शकायचा. त्याचे काही दंड कमरेहून जाड नी पोटावर पन्नास ॲब्ज वगैरे नव्हते. त्याचं वजन वेल विदीन बीएमआय होतं.)
(ह्यानंतर इथल्या एक बीएएमएस, एक एमबीबीएस, एक डाएटीशीअन डिप्लोमाधारी लोकांना विचारलं तर त्यांनीही हेच सांगितलं, की वजन कमी होणं हे ध्येय नसावंच, वर लिहीलेल्या गोष्टी ध्येय असाव्यात, आणि जे झालंय तेच खरंतर व्हायला पाहिजे.)
(अर्थात, एव्हढं किंवा ह्याहून चांगलं स्नायू-वस्तुमान तुम्ही कमावलंत आणि व्यायाम करत राहिलात तर तुमचं वजन कमी होणार हे नक्की. पण त्यानंतरची वाट खडतर आहे. तो तेव्हढा व्यायाम करुन तुम्हाला कार्डीओ केला पाहिजे, (जे जवळपास अशक्य आहे.) असं बरेच ठिकाणी लिहीलेलं आढळतं.)

तर मित्रहो, मी माझ्या अल्पमतीप्रमाणे काढलेलं अनुमान हे, की सरळ कॅलरी आत आणि कॅलरी बाहेरचा हा हिशोब आहे. तुम्ही व्यायाम कमी (म्हणजे वर लिहीलेल्या आक्रस्ताळेपणापेक्षा कमी: फक्त चालणं/भरभर चालणं इ. करत असाल) तर तुम्हाला कॅलरी अतिशय कमी खाव्या लागतील.
ह्याचंच एक व्हर्शन म्हणजे दिवसातून दोनदा खाणे.
आता; खाणे ह्या प्रकारात आपल्याला वाटतो त्याहून बराच जास्त मानसशास्त्राचा भाग आहे.
पहिलं म्हणजे आपण फक्त कंटाळा आलाय म्हणून खातो.
दुसरं म्हणजे खरंतर तहान लागली असताना खातो.
तिसरं म्हणजे, काहीतरी पाहत/ऐकत असताना खातो. तंद्रीत आपण भुकेच्या अनेकपट पलीकडे खातो.
चौथं म्हणजे, आपल्या साधारण पदार्थांत अनेक कर्बोदके असतात. जी वरच्या थिअरमप्रमाणे आजीने खाल्लेली असतात. पण आजीचा व्यायामही तेव्हढाच होता हे आपण विसरतो. आजीकडे लादी पुसायला मॉपर किंवा रुम्बा नव्हते, डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन नव्हते, कामाला बाया यायच्या नाहीत. आपण इतक्या सोयीसुविधा वापरुन परत तिच्याइतकी कर्बोदके खात असू, तर अर्थातच विषुव आणि सगळ्याच वृत्तांचा घेर वाढेल नाहीतर काय! ह्याशिवाय दुसऱ्या थिअरमच्या विरुद्ध आपण अनेक वर्षानुवर्षे जाहिरात होत असलेले पदार्थ खातो, प्रच्चंड साखर असलेली शीतपेये पीतो.

बरं, आता आपण समजूया की वरीलपैकी आपण काहीच्च करत नाही. तरीही आपण जास्त खातोय बा. मग काय करायचं? तर सरळ उपास करायचे. आपले उपासही एकेक दिव्यच. ते असो. बाकी उपवास, दोनदाच्च खाणं, इंटरमिटंट फास्टिंग, हे काही नवीन नाही, आणि ह्याहून एक्स्ट्रीम प्रकार आहेत. तुम्ही एकदाच खायला बसलात की जातायेता जे दळण चालू असतं ते होत नाही आणि त्या निमित्ताने रिकाम्या कॅलरीज पोटात जात नाहीत.
आता, ही बाबही चिंतनीय आहे. बुद्धिजीवी लोकांचं स्ट्रेस-इटींग हे होतंच असतं. शिवाय ताण-तणाव चिंता वगैरे पाहिल्यास जास्त खाणं वगैरे साहजिक आहे. शिवाय, इतक्या वर्षांची सातत्याने खात रहायची सवय मोडायची कशी?
तर मोडू नये. बऱ्याच ठिकाणी हे वाचायला मिळालं, की उलट तुम्ही बऱ्याच कालावधीनंतर खायला लागलात की शरीराची; कर्बोदके चरबीरुपाने जपून ठेवण्याची प्रक्रिया खरंतर सुरु होते. मग हे टाळण्यासाठी उलट वारंवार- पण सकस खावं, म्हणजे उर्जाही मिळत राहते. भुकेने जडणारे आजारही होत नाहीत. ह्याबाबत हा आणि हा, हे दोन व्हिडीओ मस्त आहेत. हा माझा फिटनेसबद्दलचा अत्यंत आवडता युट्यूबर. त्याचे बाकीचे, तयार उत्पादनांबद्दलचे, नाश्ता आणि त्यातल्या उर्जेबाबतचे व्हिडीओही पहावेत. त्यानेही अघोरी दावे केले आहेत जरा क्लिकबेटसाठी म्हणा, पण ते बरेच परवडले. (पहा म्हणजे कळेल! :P) हे झालं डाएटबाबत. बाकी कॅलरीज खर्च करण्याबाबतीत सांगायचं झालं, तर; घरी करण्यासाठीच्या व्यायामाचे असंख्य व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहेत, ते पहावेत. उदाहरणच द्यायचं तर हा एक पहा.

आपल्या बुद्धीजीवींसाठी, उपवासांमधलं, व्यायामांमधलं गुपीत काय आहे; की तुमच्याबरोबर हे करणारे खूप लोक असले, की तुम्हालाही हे करत राहण्याची ऊर्जा मिळत राहते. नाहीतर ते ३० दिवसांत वेटलॉस पाहून, आणि आपले काहीच रिझल्ट न दिसत असलेले पाहून परत डिमोटीव्हेट झालेले तुम्ही परत स्ट्रेस-इटींग करता, व्यायामाची टाळाटाळ करता, नको त्या गोष्टी खाता आणि सगळे कष्ट फोल ठरतात. तसंच कॅलरी खर्च करण्याचं. तुमच्या बरोबर चालणारे/धावणारे मित्र, जिम पार्टनर/मित्र इत्यादी असतील तर तुमचा प्रवास आनंददायी होतो आणि मुळात हेच ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक जिममध्ये लिहून लिहून अतिक्लिशे झालेलं वाक्य- Fitness is not a destination, it's a pursuit of life. त्याचा मथितार्थ इतक्या कष्टांनंतर कळला!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Jeet selal
Gaurav Taneja

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

प्रकटन आवडलं रे बाबा.
मला वजन वाढवण्यासाठी खूप प्रयास करावे लागले. वजन कमी करण्याइतकच वाढवणे अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वजन कमी करणे ह्या विषयावर शारीर पातळीवर करण्यासाठी अनेक उपाय पद्धती असल्या तरी मानसिक पातळीवर "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे घोषवाक्य माझं जास्त आवडतं आहे. लेख चांगला आणि पुष्कळसे गैरसमज दूर करणारा आहे. धन्यवाद !!!
अजून एक शारीरिक वजन आणि सामाजिक वजन याचं काही गुणोत्तर कुणाला सापडलं आहे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

वजन कमी करणं हा प्रकार आधी मानसिक पातळीवरच सुरू करावा लागतो. आपलं वजन, खरं तर अंगावरची अनावश्यक चरबी, कशामुळे वाढतात किंवा कमी होत नाहीत, हे शोधण्यासाठी आधी बौद्धीक कष्ट करणं. नंतर नको ते आणि नको तेवढं खाणं कमी करणं, शरीराची गरज किती आणि काय याचा अंदाज घेत राहणं आणि या सगळ्यांत सातत्य बाळगणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेसिकली सातत्य अतिशय महत्त्वाचे आहे. Sad

- (विषुववृत्तपीडित) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखादा जर का १) एका तासात तीन किमि सहज चालू शकतो, २) सतत दोन तास चालू शकतो, ३) चार मजले सहज चढू शकतो तर त्यास वजन कमी करण्याची आवश्यकता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादा जर का १) एका तासात तीन किमि सहज चालू शकतो, २) सतत दोन तास चालू शकतो, ३) चार मजले सहज चढू शकतो तर त्यास वजन कमी करण्याची आवश्यकता नाही.

हे सगळं मी करु शकतो. एवढेच काय, हिमालयन ट्रेकिंगही करु शकतो, तरीही मला वजन कमी करण्याची आवश्यकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कालच बऱ्या अर्ध्याला माझं मत सांगत होते. विंबल्डन बघत होतो आणि येलेना ऑस्तपेंकोला प्रथमच खेळताना बघितलं. त्यानं सहज विचारलं, "हिचं वय काय असेल?"

माझं मत, "ही विंबल्डनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्ये. म्हणजे चिकार व्यायाम करत असणार, व्यवस्थित खात असणार. तरीही तिचे गाल फुगीर आहेत. फार तर २२ वर्षांची असेल. ते बेबीफॅट आहे. त्याउलट तिच्याशी खेळणारी अँजेलिक कर्बर पाहा. तिचा चेहरा एकदम V आकाराचा आहे. ती तिशीची असणार."

दोन्ही अंदाज बरोबर होते.

---

मीही बऱ्यापैकी व्यायाम करते; तरीही अंगावर अनावश्यक चरबी आहे. चरबी निराळी, वजन निराळं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चरबी निराळी, वजन निराळं.

परफेक्ट. काहींचे वजन बऱ्यापैकी जास्त असते पण प्रायमरिली हाडे आणि स्नायूंचे असल्याने प्रोब्लेम नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरेच विचार लोकांनी व्यक्त केले आहेत वजन कमी करण्याबद्दल - मी माझे एक मत बनवलय. सुस्तपणा नसणे आवश्यक आहे. परदेशी लोकांनी दिलेली उंची- वजन आकडेमोड डोळेझाकपणे का स्विकारायची?

शाळेत सहावी सातवीत योगासने होती आणि ती मी भराभर करत असे, कोणी पाहुणे शाळेत आले की प्रात्यक्षिकाला मला बोलवत. मयुरासनही करायचो॥ पण तेव्हाही मला योगासने केलीच पाहिजेत असं कधीच वाटलं नाही. हा एक साधुलोकांसाठीच व्यायाम आहे जागच्याजागी करण्याचा, सामान्य काम करणाय्रा जनतेसाठी नाही याबद्दल तेव्हापासून ठाम विचार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परदेशी लोकांनी दिलेली उंची- वजन आकडेमोड डोळेझाकपणे का स्विकारायची?

समजा, असेच काही कोष्टक (केवळ उदाहरणादाखल) मनुस्मृतीत आढळले असते, तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोटावर असणारी चरबी अनावश्यक आणि घातकही असते यात परदेशी लोकांच्या वजन-उंचीच्या गुणोत्तराचा काही संबंध नाही. याउलट मांड्या-बुडावर असलेली (प्रमाणात असणारी) चरबी उपयुक्त असते.

सुस्तपणा थंडीत जास्त येतो, पण स्नायूंची झीज लवकर भरून येते. उन्हाळ्यात सुस्तपणा कमी येतो पण स्नायू लवकर भरून येत नाहीत. जिथे टोकाची हवा असते, तिथे हे आणखी तीव्रतेनं समजतं. मुंबईत एवढे हवेतले बदल होत नाहीत.

ठरावीक व्यायाम किंवा ठरावीक आकार अशी मोजकी आणि सरसकट परिमाणं वापरून आरोग्य मोजता येतं, हे मला पटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पोटावर असणारी चरबी अनावश्यक आणि घातकही असते यात परदेशी लोकांच्या वजन-उंचीच्या गुणोत्तराचा काही संबंध नाही. याउलट मांड्या-बुडावर असलेली (प्रमाणात असणारी) चरबी उपयुक्त असते.

उलट मी तर वाचले होते, की (१) बुडावरची चरबी ही पोटावरच्या चरबीच्या तुलनेत (अ) (हृद्रोगसंभवाच्या दृष्टीने) अधिक घातक आणि (ब) घालवायला अधिक अवघड असते, तथा (२) पुरुषांत पोटावर तर बायकांत बुडावर चरबी वाढण्याची टेंडन्सी अधिक असते, म्हणून.

अर्थात, माझी माहिती ही (१) 'परदेशी' स्रोतावर आधारित तथा (२) सांगोवांगीची असल्याकारणाने ऑपॉप डिस्कौंटेबल असूही शकेल म्हणा!
...........

बोले तो, अमेरिकन. म्हणजे (माझ्या दृष्टीने) टेक्निकली स्वदेशीच. परंतु तरीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोटावरची चरबी घातकच.

बुडावरची चरबी किती आहे, त्यानुसार ती घातक आहे की नाही हे ठरणार. त्यातही तुम्ही म्हणता तसं बायकांच्या अंगावर अधिक चरबी असणंही नॉर्मल. त्यापुढे बॉडी टाईप वगैरे गुंतागुंत.

मुद्दा असा की बीएमआय आणि अनावश्यक चरबीचा संबंध फार नसतो. बीएमआयचा इतिहास शुद्ध वैद्यकीय नसून विमासंबंधित आहे. ते आकडे 'चान चान' असले तरीही अंगावर अनावश्यक चरबी असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नबा, उंची-वजनाचा तक्ता ( आदर्शवगैरे) मनुचा असता तर हा मुद्दा -
मनु म्हणजे फार मागे गेलात. तरीही तो तक्ता परदेशींचा नसून 'आपल्याकडचा' हे तुलनेसाठी धरल्यास मी म्हणेन की मनुऐवजी मौर्यकालापासून ( संदिग्ध रामायण महाभारतही सोडा) अधिक वजनदार व्यक्तीच युद्धासाठी लागत. पन्नाशीनंतर त्यांचे काहीही होवो.
आता दुरूनच गोळ्या घालता येत असल्याने माणसे मारण्याची वृत्ती फक्त जोरकस हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>मुद्दा असा की बीएमआय आणि अनावश्यक चरबीचा संबंध फार नसतो. बीएमआयचा इतिहास शुद्ध वैद्यकीय नसून विमासंबंधित आहे. >>

नेमकं.
म्हणजे विमावाल्यांना काही आकडेमोडीसाठी तक्ते( फार्मुले) लागतात. या कामासाठी गणितातला e सुद्धा वेठीला धरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणितातल्या eबद्दल पहिल्यांदाच ऐकलं. मात्र तो आकडा 'नैसर्गिक' असल्यानं उलट 'अय्या, विमावाले खरंखरं गणित शिकले तर' असं वाटलं क्षणभर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गणितबिणीत शिकत नाहीत, मारट्युअरी रेट काढायचा e वाला रेडिमेड फार्मुला वापरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0