दिवाळी विनोद विशेषांकाचं काउंटडाउन

दिवाळी अंकासाठीचा लेख पाठवा आवाहन अगोदरच झालं आहे पण आजपासून तीन महिन्यांनी दिवाळी म्हणजे काउंट डाउन सुरू करायला हवे. एंजिनाचा भुसनळा सुरू होणार, कनेक्टिंग केबल्सचे प्लग सॅाकेट्समधून दूर फेकले जाणार, विनोदाचे रॅाकेट उचललं जाणार. सुरुवातीला डोळ्यांनी मग दुर्बिणितून, नंतर स्क्रीनवर एक छोटासा ठिपका वरवर अपेक्षित प्रजेक्टाइलवर सरकत जाताना पाहायचे चित्र आताच दिसायला लागलय. थोड्या वेळाने बुस्टर आणि पुढचे नोड्युल किंवा सॅटेलाइट सुरुवातीच्या कक्षेत टेकला की एकमेकांचे हग, हस्तांदोलन, छोटेसे भाषण, आभार वगैरे.

लहानपणापासून दिवाळी अंक हे कथा, लेख, आणि विनोदी व्यंगचित्रे यांचा स्फोट असलेले अंक असा समज होता. आमच्याकडे आईबाबा वाचायचे नाहीत, काका अतिशय आवडीने इतर महिन्यांचे अंकही वाचत असत. चकचकीत चित्राचं पहिलं वरचं पान असायचच. विशेष जाडजूड. वाचनालयाची मासिक वर्गणी भरलेली असायची. त्यातून एक मासिक/पुस्तक मिळायचं. ते बदलून आणायचं काम मीच करायचो. आमच्याकडची आवड ठरलेली नवनीत, अमृत, चांदोबा, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आणि हंस. दोन बिंल्डिंग पलिकडे राहाणाऱ्या काकू ( वकील श्रीकांत भटची आई) त्यांचे पुस्तकही मलाच बदलायला सांगत.
"कुठलंतरी नवीन मासिक घेऊन ये." किंवा " हे मिळालं तर पाहा वगैरे."
दिवाळीच्या आठदहा दिवस अगोदर पुस्तक जमा केले आणि "आता पाडव्यालाच सकाळी ये हं. तेव्हाच मिळेल दिवाळी अंक."
"पण मला दुसरे कुठले पुस्तक चालेल."
"नाही, तेव्हाच घे."

मला काही कळलं नाही. पाडव्याला सकाळी गेलो. ही गर्दी. टेबलावर रंगीत कवरांची मासिकांचे ढिगारे. मग पुजा करून चिठ्ठ्या काढल्यावर जे नाव आले ते अंक देण्यात आले. माझ्या हातात दोन पडले. ते बघून " अमच्याकडे नाही वाचत हे" असं बोललो आणि शेजाऱच्या काकुंनी लगेच तो अंक बदलून घेतला. त्यांचा मला दिला. नंतर भटकाकु म्हणाल्या उगाच बदललास. तर तेव्हा काही कळलं नव्हतं आणि अमच्याकडेही एवढा उत्साह नव्हताच.

त्या सायन स्टेशनसमोरच्या लक्ष्मिबागेतल्या वाचनालयाची स्थिती बिघडायला लागल्याने दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयचे सभासदत्व घेतले. तिथे मासिकांचा आणि त्यापेक्षा पुस्तकांचा संग्रह भरपूर होता. आठवीत गेल्याने थोडे वाचनही वाढलं होतं. दिवाळी अंकांपैकी आवाज, जत्रा, यांवर उड्या पडायच्या. ते आणून पाहिले नक्की काय असतं. विनोदी म्हणून दिलेले लेख हे बरेच नवरा-बायको-संसार यास धरून होते. काही फसलेल्या पाककृतींवर होते. व्यंगचित्रांची पाने पाहून अंक परत करणे एवढेच केले जायचे. "शंभर लाडुंवर एक हातोडा फुकट," किंवा लोचट अनरश्यांवर असत.
बालमासिकांत झोपलेल्या गुर्जिंच्या खुर्चिखाली फटाका लावताहेत मुलं हे चित्र बऱ्याचदा असे. पुढे विनोदी दिवाळी अंकांबरोबरच ज्योतिष,आरोग्य आणि सामाजिक - राजकीय विषयांना वाहिलेल्या अंकांना मागणी वाढू लागली.

विनोद यावर विचार करताना आठवू लागलो की मला समजलेला पहिला विनोद कोणता? पाचवी किंवा सहावीत होतो. शेजारचा मुलगा म्हणाला आज बाल दिन? दोनचार क्षण काही कळलं नाही. नंतर डोक्याला हात लावून हसलो. कोटि! म्हणजे या अगोदर मी कधी हसलोच नव्हतो का? हो ना. पण ते बरेच प्रसंग म्हणजे फजिती होणे आणि ती दुसऱ्याची. लहान मुलांसाठी कुणी घसरून पडला, चिखलाचे पाणी उडाले, वाऱ्याने छत्री उलटी झाली, कुणाचा डबा दप्तरात सांडणे, रस्त्यात बैल उधळल्याने होणारी पळापळ, इत्यादि हसण्याचे प्रसंग. बावळटपणाने इतरांना हसू येणे थोडे अपग्रेडेशन सातवीत. खूप तयारीने शाळेत जावे तर गेट बंद! आज सुटी हे विसरल्याने फजिती.
आठवीनंतर लैंगिक चावट विनोद करणारा किंवा कुठलेकुठले विनोद सांगणारा गर्दी खेचू लागतो. विनोदी कथाही वाचल्या जातात. हळूहळू विनोदाच्या बंदुकितून आपल्यावरही गोळ्या झाडल्या जातात हे लक्षात येतं. "दे लाफ्ट अॅट माइ इक्सपेन्स" म्हणजे काय शेकणे हे कळतं. ग्रुप पिकनिक जाते तेव्हा कुणीतरी सांपल, टार्गेट केलं जातं. त्याशिवाय सक्सेस होत नाही. किंबहुना अशाच पिकनिक लक्षात राहतात.
विनोद कधी व्हायला पाहिजेत तेव्हा होतच नाहीत. नको तेव्हा होतात आणि सगळे हसतात.

चला तर तुम्हाला आठवतं का पहिला विनोद कधी कळला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी वजा दोन महिन्यांचा असेन, तेव्हा मला काहीतरी बोलणं ऐकू आलं. आणि मी एकदम खुदकन् हसलो. तो मला समजलेला पहिला विनोद. कुठचा ते आठवत नाही, पण गमतीदार होता हे आठवतंय. मग मला कान टवकारून विनोदी एकण्याची सवयच झाली. काही दिवसांतच तोंड थोडं मोठं झालं तसा मी मोठमोठ्याने हसायला लागलो. काही वेळा तर गडबडा लोळायचो. मग आईला पोटात लाथा लागायच्या. तिला काय माहीत की हे सगळं माझ्या विनोदबुद्धीपायी आहे ते.

काही दिवसांनी माझा मेंदू थोडा विकसित झाला. मग मला स्वतःलाही विनोद करता यायला लागले. नरम विनोद, फार्सिकल नाटकं, राजकीय विनोद, काळा विनोद, त्यात काही राखाडी छटा वगैरे सगळं करून झालं. शून्याच्या अलिकडच्या एकदोन दिवसात मात्र मराठी विनोदाची सद्यपरिस्थिती यावर गहन विचार करत होतो. अचानक सगळं वातावरण घुसळून निघालं. विनोदाच्या दुरावस्थेबद्दल मी टाहो फोडत असतानाच या जगात प्रवेश करता झालो. माझ्या दुःखाचा अर्थ मी जिवंत आहे असा घेऊन सर्वांनीच आनंद व्यक्त केला. तेव्हापासूनच दुःख हीच आयुष्याची व्याख्या आणि त्या रणरणत्या वैराण वाळवंटात विनोदांच्या फवार्यांची ओअॆसिसं हे वास्तव तेव्हापासून स्वीकारलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरूजींच्या प्रतिसादाला पकाऊ श्रेणी दान करणार्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक वाटले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी दिली.

उगाच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोद कधी व्हायला पाहिजेत तेव्हा होतच नाहीत. नको तेव्हा होतात आणि सगळे हसतात.

"मौत और टट्टी किसी को भी, कभी भी और कहीं भी आ सकती है" हे सुभाषित ऐकून होतो. त्या दुकलीत आता विनोदाचीही भर टाकून तिची त्रयी करायला हरकत नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भर टाकून तिची त्रयी करायला हरकत नसावी.

अखेर मधू मलुष्टेला तिय्या जमला तर. आता सुबकठेंगणीकडे नजर टाकायला हरकत नाही..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला तर तुम्हाला आठवतं का पहिला विनोद कधी कळला.

नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साठी उलटली आणि मला विनोद कळेनासा झाला. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, चला हवा येऊ द्या, अशा उत्तमोत्तम कार्यक्रमांत, बोलावलेले सन्माननीय पाहुणे आणि प्रेक्षक, खदाखदा हंसत असताना मला मात्र जराही हंसू येत नव्हते. त्यामुळे मी जगावेगळा आहे की काय, अशी शंका भेडसावू लागली. नंतर मेंदूच्या तपासण्या केल्यानंतर स्पष्ट झाले, की माझ्या मेंदूतले विनोद समजण्याचे केंद्र नष्ट झाले आहे. कारण आजुबाजूचे लोक तर अगदी गडबडा लोळून हंसत असताना मी उद्विग्न चेहेऱ्याने बसून असायचो.
चित्रपटांत, दु:खी प्रसंग बघितला की पूर्वी मी हमखास रडायचो, डोळे अगदी भरुन यायचे. आता तेही बंद झाले आहे, म्हणजे बहुधा, तेही केंद्र बंद झाले असावे. असो, 'इस रात की कोई सुबह नही'!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

नेमकं, तिरशिंगराव.
चला हवा येऊ द्या किंवा कपिल शर्मा शो यातलं तुम्हाला काय दाखवू? असं बहुतेक तुरुंगातल्या कैद्यांना विचारतील बहुधा.
ठराविक विनोदाला सातमजली हास्य प्रतिसाद द्यायचं आता वय राहिलं नाही. प्रार्थना बेहेरे हहहहहहह करते तेच बरं वाटतं.

विनोद सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्या श्रोतृगणांचं वय हा मोठा मुद्दा आहेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रार्थना बेहेरेच्या आईवडीलांना एक कडक सलाम ! जिथे मुलींनी कसं हसावं कसं बोलावं यावर असंख्य बंधने असतात तिथे एवढं मुक्तहास्य फुलवणारे पालक किती उच्च विचारांचे आहेत हे जाणवते ! मला देखील प्रार्थना बेहरेचं हसू फार्फार आवडतं !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आचरट बाबा , लेख आवडला .
मी काय म्हणतो कि तुम्ही एक लेख का नाही लिहीत अंकात ? विनोदी ?
न बा , मनोबा, ऋषिकेश या हल्ली दुर्मिळ झालेल्या मंडळींच्या स्टाईल मध्ये ? किंवा शुचि मामी स्टाईल ( म्हणजे भविष्यावर (विनोदी ) बोलू काही वगैरे )
आम्ही प्रतिसाद देऊ त्याला .नक्की . कुणाच्या स्टाईल नि लिहिताय ते बघून , म्हणजे भडकाऊ , माहितीपूर्ण किंवा मार्मिक वगैरे .
लिहिणार का ? नाहीतरी इतर कुणी नाही तरी तुम्ही काऊंट डाऊन चालू केलाच आहे , तर तुमचंच पयला लंबर येईल !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्र्टजी तुम्हीही विनोद करताय. एवढ्या कसलं काउंट डाउन अजुन आधी श्रावण मग गणपती नंतर नवरात्र त्यानंतर दिवाळी येणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

हो, पण दिवाळी अगोदर एक महिना लेख हातात पडायला हवेत ना मॅाण्डळाच्या!
शिवाय बऱ्याचजणांचं मेंदुतलं विनोद निर्मिती ग्रहण&प्रसारण केन्द्र बंद झालय ते जागं करायला लागेल!

गंभीर लेख पाडणं हे विश्वाच्या आर्तापेक्षा कठीण असतं.
( विनोदाच्या आठदहा प्रकारांपैकी चिमटे घेणे हाही एक प्रकार आहेच.
१) स्वत:वरच केलेले विनोद,
२) दुसऱ्यावर केलेले विनोद,
३) प्रसंगोत्पात विनोद.
यांचेच अगणित उपप्रकार असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0