जुनी समर्थ

---जुनी समर्थ---

शाळेची घंटा, पिंपळाची सळसळ ।
चिक्कीचा तंटा, वटवाघूळाची पळपळ ।

पायऱ्यांचा वर्ग, प्रार्थनेला उशीर ।
शिरभाते सरचा धपाटा, अन 'कायले केला उशीर?' ।

थंडीची कुडकूड, पावसाचा झिम्मा ।
उन्हातली धाबाधुबी, अभ्यास नेहमी निम्मा ।

समोरचे पोट्टे करे खूप हार्डवर्क ।
समोरचे पोट्टे करे खूप हार्डवर्क ।
अन आमी दाखो इंग्रजीले भुगोलाचा होमवर्क ।

फाले सरची भुमिती गेली डोक्यावरून ।
शेवटी केले गंत पाठ, मार मरून मरून ।

जिवानूच्या विज्ञानाचा नव्हता काई सुमार ,
जिवानूच्या विज्ञानाचा नव्हता काई सुमार ।
पानभरही वाचलं तरी पडला मानूस बीमार ।

काळे मॅडमचा रेडियम, पिहुलकर सरची छडी ।
चोरपगार सरची प्रेसेंटी, अन भेंडे सरची घडी ।

गजुभाऊच्या गाडीवर ह्यो संत्राचे लोट ,
गजुभाऊच्या गाडीवर ह्यो संत्राचे लोट ।
अन घंटाभर खात-खात, खपली ५ची नोट ।

अब्बूची बॅट, एनट्या ची डाइव ।
अन जिंकलोरे मॅच, द्या हाय-फाईव्ह ।

सुट्टीमधे धावत-धावत दुखे बावा कंबर ,
सुट्टीमधे धावत-धावत दुखे बावा कंबर ।
अन दातीर म्हने मी नई खेळत, माझा पहिला नंबर ।

तोडलेल्या ताट्या, मोडलेले बेंच ।
कापलेल्या खिडक्या, मुली घेत रिवेंज ।

सपक्याचा प्लेग, गालीगुद्याची अकड ।
जॉलीची शाई, अन ताश्याची पकड ।

बब्बू म्हने कॅप्टन मी, तुमच नाव जाणार ।
बब्बू म्हने कॅप्टन मी, तुमच नाव जाणार ।
आम्ही म्हनो जाऊ दे रे ! हे दिवस कधी येनार ?

सांगा आज चारान्याचा होते काय इचार?
तवा संतराच्या चार चिरा पोट्टे खाई चार ।

एकमेकायच्या वादात आज कोन नई पडत,
सारे म्हणते जाऊद्याना, जात असनतं उडत!
पन वर्गाच्या भांडणात सारे होते भिडत,
म्हने 'हात लाव फक्त याले, तुले नई सोडत!'

शून्यातूनही रेशीमकीडा सकाळ जशी विनते ,
शून्यातूनही रेशीमकीडा सकाळ जशी विनते ।
समजे कुठे तेव्हा भऊ यालेच फ्रेंडशिप म्हनते ।

समजे कुठे तेव्हा भऊ यालेच फ्रेंडशिप म्हनते

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

कोणत्या चालीत वाचायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तं शैलेश लोढाच्या शायरीच्या चालीवं वाच्ल. बघा जम्तै का

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

कित्ती मस्त आये तुयी कविता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरे मग? मी काय करू त्याबद्दल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भऽ ऽऊ तू शायेत गेयाच न्हाइस?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

शिर्षक मात्र गुगल ट्रांसलेट वापरुन केल्यासारखे वाटतेय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी