कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2)

मागच्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास (पल्के, अगावेचे फळ, भौगोलिक स्थान वगैरे) बघितला. आता ह्या भागात बघूयात टकीलाचे वेगवेगळे प्रकार. मागच्या भागात बघितल्याप्रमाणे टकीला ही ब्लु अगावेपासून बनवतात. ह्या ब्लु अगावेच्या वापरल्या गेलेल्या प्रमाणामुळे टकीलाचे ढोबळमानाने २ मुख्य प्रकार पडतात.

१. टकीला : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण १००% असते.

२. मिक्सटो : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण कमीत कमी ५१% इतके असते. बाकी उसाचा रस किंवा वेगळ्या ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज रुपातील साखर असते.

टकीला NOM

मेक्सिको सरकारने टकीलावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी टकीलाची मानके ठरवली आहेत त्यांना NOM (NORMA OFICIAL MEXICANA) असे म्हणतत. प्रत्येक बाटलीवर NOM नंबर असावा लागतो. हा नंबर मेक्सिको सरकार प्रत्येक डिस्टीलरीला देते. NOM + हा नंबर टकीलाचे 'ओरिजिनल'त्व ठरवतो.

ह्या ओरिजिनल टकीलाचे मुरवण्याच्या कालावधीनुसार पाच वेगवेगळ्या प्रकारात बॉटलिंग केले जाते.

१. सिल्वर - प्लाटा [Blanco - White | Plata - Silver]

ह्या प्रकाराला Blanco (White) असेही म्हणतात.
डिस्टीलेशन नंतर लगेचच किंवा जास्तीत जास्त दोन महिने स्टील टॅंक मध्ये ठेवून बाटलीबंद केलेली ही टकीला सिल्व्हर किंवा व्हाईट म्हणून ओळखली जाते. म्हणजेच कास्कमध्ये न मुरवल्यामुळे हीचा रंग सोनेरी नसतो. त्यामुळे ह्या टकीलाला १००% अगावेचा गोडवा असतो. कास्कमध्ये न मुरवल्यामुळे अल्कोहोलचा हार्शनेस असतो ह्या टकीलाला. म्हणूनच ह्या प्रकारची टकीला शॉट ग्लासमधून एका झटक्यात रिचवायची असते.

२. गोल्ड - ओरो [Gold - Oro | Young - Joven]

हा प्रकार बनविण्यासाठी ब्लांकोत कॅरॅमल कलर्स, ओक लाकडाचा अर्क आणि वेगवेगळी साखरेची सिरप्स वापरून सोनेरी(ओरो) रंग आणला जातो बाटलीबंद करण्याआधी. ह्यामुळे मुरलेल्या टकीलाचा आभास निर्माण होतो. ह्या जास्त करून मिक्सटो, ५१% अगावे वापरलेल्या, टकीला असतात. अगावे व्यतिरीक्त वापरलेल्या ह्या अतिरीक्त घटकांमुळे अल्कोहोलचा हार्शनेस कमी होतो व ती थोडी स्मुथ होते. टकीलापासून बनणार्‍या कॉकटेल्ससाठी टकीलाचा हा प्रकार जास्त वापरला जातो.

३. रेस्टेड - रेपोसॅडो (Reposado)

ब्लांकोला २ महिन्यांपसून ते जास्तीत जास्त १ वर्षांपर्यंत कास्कमध्ये मुरवूत ठेवून नंतर बाटलीबंद केला जाणारा हा प्रकार सर्वात जास्त विकली जाणारी टकीला आहे. गोल्ड किंवा ओरो ह्या प्रकाराच्या उलट, कास्कच्या लाकडाचे गुणधर्म घेऊन ह्या टकीलाला रंग आणि गंध नैसर्गिकरीत्या प्राप्त होतो. टकीला मुरवण्यासाठी वापरण्यात येणारे कास्क्स अमेरिकन किंवा फ्रेंच ओक लाकडापासून बनवलेले असतात. हे कास्क्स नविन लाकडापासून बनवलेले असतात पण काही कंपन्या बर्बन, स्कॉच आणि कोन्यॅक मुरवण्यासाठी वापरलेले जुने कास्क्स वापरतात. जुन्या कास्कमुळे त्यांच्यामध्ये असलेल्या मुळ मदिरेचा किंचीत स्वाद टकीलाला प्राप्त होतो आणि चव आणखिन मजेदार होते.

४. एज्ड(विंटेज) - अनेजो (Añejo)

१ वर्षापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत कास्क मध्ये मुरवत ठेवून त्यानंतर बाटलीबंद केलेली ही टकीला लाकडाशी जास्त काळ संपर्कात येऊन खूपच कॉम्प्लेक्स होते. ही टकीला खूपच 'रीच' असते चवीला. ह्या प्रकारची टकीला चवीला खुपच कोम्प्लेक्स आणि रीच असल्यामुळे शॉट ह्या पद्धतीने पिण्याऐवजी स्निफ्टर ग्लास किंवा Ouverture Tequila glass ह्यांतून मस्त एक एक सीप घेत अनुभवायची असते.

५. एक्स्ट्रा अनेजो ( Extra Añejo)

हा प्रकार २००६ पासून मान्यता प्राप्त झाला आहे. कमीत कमी ३ वर्ष मुरवत ठेवून मग ही टकीला बाटलीबंद केली जाते. ही अतिशय उच्च दर्जाची टकीला असते त्यामुळे तेवढीच महागही असते.

वर्म टकीला

टकीलाच्या बाटलीमध्ये एक अळी (Worm) असलेली टकीला अ‍सते अशी एक वंदता आहे. पण खर्‍या आणि ओरिजिनल टकीला मध्ये कधीही अळी नसते.

मेझ्कल

अळी असणारी, अगावे (Agave Americana) पासून बनणारी मदिरा असते मेझ्कल. ही मेक्सिकोच्या टकीलाची पाच राज्ये सोडून इतर राज्यांमध्ये बनते. हीला टकीला म्हणता येत नाही कारण ही ब्लु अगावेपासून बनत नाही. Gusano de Maguey नावाची अळी ह्या मेझ्कल मध्ये असते. ही अळी हे एक मार्केटींग गिमीक आहे. ही अळी अल्कोहल कंटेंट किती स्ट्रॉन्ग आहे दर्शवते. जर बाटलीच्या तळाशी असलेली अळी खराब झालेली नसेल तर अल्कोहोल कंटेंट खुपच ग्रेट असे दर्शवायचे असते.
टीपः बाजूच्या चित्रात बाटलीच्या तळाशी अळी आहे.

टकीला पिण्यासाठीचे वेगवेगळे ग्लासेस

टकीला शॉट ग्लास टकीला ओव्हर्चर ग्लास मार्गारीटा कॉकटेल ग्लास

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(क्रमश:)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

__/\__
टकीलाचे इतके प्रकार आसतात हेच मुळात माहिती नव्हते. अनेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विस्तृत परिचय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सोकाजीच्या अभ्यासू स्वभावामुळेच त्याला तिसरा गुर्जी बनवण्यात आल्या गेल्या गेले आहे.

अलिकडेच एका ठिकाणी मार्गरिटा प्यायली, ऑन द रॉक्स. चव आवडली पण थंड पेयांबद्दल घसा फार तक्रार करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण थंड पेयांबद्दल घसा फार तक्रार करतो.

ह्म्म्म, वयोमानापरत्वे हे असले त्रास/तक्रारी वरचेवर वाढतच जाणार गं, काळजी घेत जा जरा आता Wink

- (चिरतरूण) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमालिकेमागची कल्पना, त्यातले लेख- सर्वच आवडले. Smile

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका