बेडूक उड्या - लहान मुलांसाठी यूट्यूब चॅनल

भूमिका बदलतात आणि बदललेल्या काळाची ओळख होते. पालक झाल्यावर लहान मुलांनी ऐकायची गाणी, गोष्टी याचे बदललेले अवतार समोर आले. आता मुलांना वाचायला पुस्तकं कमी आणि बघायला व्हिडिओज जास्त आहेत हे लक्षात आलं. या नव्या डिजिटल माध्यमात असलेलं मराठी बालसाहित्य मात्र पालक म्हणून मला कधी तुटपुंजं वाटलं तर कधी उथळ. कुठलाही दृश्याचा आधार नसताना फक्त एकदा ऐकून पाठ होणाऱ्या कविता, आजही संपूर्ण आठवणाऱ्या गोष्टी, हसत खेळत म्हटलेली बाराखडी, पाढे हे सगळं बदललेल्या डिजिटल माध्यमात पुरेसं उपलब्ध नाही असं लक्षात आलं.

मग आपणच चांगल्या मराठी बालसाहित्याची डिजिटल रुपात निर्मिती का करू नये? असा विचार केला. तेंव्हापासून शोध, वाचन, चिंतन सुरु झालं. मी आणि माझी बहीण, Arnika Paranjape, आम्ही एकत्रपणे या संकल्पनेवर काम करू लागलो. मराठीतल्या गोष्टी, कविता, गाणी, आणि एकूणच चांगली भाषा मुलांच्या कानावर पडावी, त्यांच्या विचारांना चालना मिळावी हा प्रांजळ हेतू होता. त्या हेतूला आज मूर्त स्वरूप आलंय. 'बेडूक उड्या' हा आमचा यूट्यूब चॅनल आजपासून सुरु होत आहे.

या चॅनलवर काय असेल? व्हिडिओ रुपात बालसाहित्य असेल.
गाणी असतील, कविता असतील, गोष्टी, खेळ, गमती असतील
काळानुरूप आणि कालाबाधित; रंजक तरीही विचारप्रवर्तक; मुलांना रमवणारं, आणि खुलवणारं; आठवणीत हरवलेलं आणि नवीन घडवलेलं असं सर्वसमावेशक बालसाहित्य असेल.

तुमच्या मुलामुलींना जरूर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ दाखवा.

चॅनलला आवर्जून भेट द्या, सदस्यत्व घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ येताच तुम्हाला सूचना मिळेल.

https://www.youtube.com/channel/UCxvNbqrI_I9ob9yAILjVwjw/

आमच्या या प्रयत्नाला तुमचा प्रतिसाद मिळेल, प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. या निमित्ताने एक आवाहन करतो. कुणाकडे सामान्यतः ऐकिवात नसलेल्या, अप्रचलित पण विचारमूल्य असलेल्या गोष्टी, कविता असतील, आजी आजोबांनी, आईबाबांनी सांगितलेल्या आठवत असतील, तर मला व्यनि करा. मला तुमची मदत होऊ शकेल. _/\_

- अपूर्व

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अगदी परवाच ते अंकगीत गाणे पाहीले. छान आहे चॅनल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

छानच आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0