जोर काढुनी पोर काढलं , काट्यावरचं बोर निघालं

जोर काढुनी पोर काढलं

काट्यावरचं बोर निघालं

ऐन उमेदीत रंग दाखवलं

कार्ट सालं क्रूर निघालं

नाना स्वप्नं पाळण्यातली

अश्रूं बनली पापण्यातली

स्मरती कर्मे मागली पुढली

काठी साली कमकुवत निघाली

मी पण देखील हेच केले

उगाच वाही अश्रुंचे नाले

का दोष त्या नशिबाला ?

पुसले का कधी आईबापाला ?

{सिद्धेश्वर विलास पाटणकर}

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रूस बोल्टनचा विलाप..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे रुसेन बोल्ट कोण म्हणायचे ? मी तर पहिल्यांदाच ऐकतोय त्यांचं नाव .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0