मी भाग्यवान

अलीकडे "राहून गेलेल्या गोष्टी" हे सदर पाहिलं. पण आपल्याला मिळालेल्या म्हणजे लाभलेल्या गोष्टींचीही दखल घ्यावी असं वाटलं. निमित्त झालं आज बऱ्याच दिवसांनी माझ्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका चिणेबाई यांच्याशी फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, बिझी असतेस का खूप, मी सांगायला तोंड उघडणार होते – या सत्रात मी तीन पेपर शिकवतेय, शिवाय डिसर्टेशनसाठी दोनजणी... – धाडकन गप्प बसले. प्रथमिक शाळेत प्रत्येक वर्ग हा एकशिक्षकीच होता. गणित, भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल.. सगळं त्या एकहातीच शिकवायच्या. शिवाय चौथीच्या स्कॉलरशिपसाठीचे वेगळे तासही शाळेतच व्हायचे त्यातही त्या शिकवायच्या. आणि २०१२ साली आम्ही एकदा शाळेत भेटलो होतो, बाईंनाही बोलावलं होतं तेव्हा त्यांनी तब्बल पस्तीस वर्षांनंतरही सगळ्यांना नावानिशी ओळखलं होतं.
विद्यार्थीदशेत शाळा, कॉलेज, विद्यापीठ प्र त्ये क इयत्तेत बहुतेक सगळे चांगले शिक्षक लाभले हे माझं केवढं भाग्य !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

That I do not have to - do not have a particular need to - count - to enumerate - my blessings, हे मी माझे परमभाग्य समजावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या शिक्षणसंस्था, कामाच्या (आणि बिनकामाच्या) ठिकाणीही चांगले लोक भेटले. त्यातही अनेक, बहुसंख्य लोक दखलअपात्र किंवा तापदायक असल्यामुळे या चांगल्या लोकांची किंमत आता तरी समजते.

'लाभले आम्हांस भाग्य...' याची टिंगल करणारी मैत्रमंडळी सापडण्याबद्दलही मी स्वतःला भाग्यवान समजते.

'न'वी बाजूंचा तर विशेष उल्लेख करायला हवा. Wink

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाचवी सहावीपर्यंत सगळे शिक्षक छान वाटत असतात, नंतर दोष दिसायला लागतात एकेकाचे. आठवीत टिंगल टवाळ्या सुरू होतात. काहींंची खरोखर आठवण येते.
मुलांना घडवण्याच्या ओझ्यातून शिक्षकांना मुक्त केलंय ते फार छान झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिक्षकांना सतत विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर असावं लागतं. त्यामुळे त्यांची देहबोलीही तितकीच विश्वसनीय असावी लागते. तेच म्हणायचंय मला, लकबी, टापटीप, नीटनेटकेपणा ते गबाळेपणा हे सगळं सारखं नसलं तरी शिकवण्याची हातोटी, विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करणं, हे मला लाभलेल्या बहुतेक शिक्षकांचं उत्तमच होतं. म्हणून तर आवर्जून या भाग्याचा उल्लेख करावासा वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0