वात्रटिका : राधिकेचा फोन

गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो

गुरुनाथ: हं, बोल राधिका

राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे.

गुरुनाथ: का! म्हणून?

राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही. सुखानी नांदू आपण सर्व एकत्र घरात.

गुरुनाथ (कोर्टाचा निर्णय ऐकून, हिचे डोके तर फिरले नाही ना. काहीबाही बडबडते आहे - तिचे बोलणे मध्ये तोडत): राधिका, तू थकलेली वाटते, ऐक माझे, घरी ये मग आपण निवांत बोलू.

राधिका: अहो, तसे काही नाही, मी तर आज एकदम जोश मध्ये आहे. फोन करण्याचे मुख्य कारण म्हणजे, आज रात्री फाईव स्टार हॉटेल मध्ये आपल्या बिजिनेस पार्टनर सोबत रात्र भर मजा करणार. गुड नाईट, माय डियर हसबंड. मजा कर शयाना सोबत.सकाळी भेटूच.

गुरुनाथ भोवळ येऊन पडतो...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कहानीत ट्विस्ट नाही, काही नाही. इतकी बाळबोध गोष्ट आजकाल पहिलीतले पोरसुद्धा लिहील. मजा नाही आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहे ओ ट्विस्ट. मालिकेत फक्त गुरुनाथ आणि शनाया असं लफडं आहे. पटाईतांच्या स्टोरीत शयना आणि शयाना अशा २ नव्या हिर्वीणी आल्यात. नीट वाचा तर खरं. अॅट अ टैम तीन लफडे म्हणजे ट्विस्टंच. नव्या कायद्याचा लैच आधार झाला गुरुनाथजींना, असं पटाईतांना म्हणायचंय का?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरुनाथ आणि शनायाला मजा आल्याशी कारण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता रेल्वेनेही त्यांच्या स्लीपर बोगीला शयानायान म्हणावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

जावं दे ना, पटाईत काका बऱ्याच दिवसांनी आलेत त्यांचं स्वागत करा . आणि मोदींसंघरामदेव सोडून इतर विषयावर लिहिलंय याबद्दल अभिनंदन करा राव.
शेवटी कमेंट मध्ये ते म्हणतात की ही त्यांची पहिली पुरोगामी रचना आहे
यावरून एक लक्षात आले की मोदीसंघरामदेव सोडुनीतर सर्व विषय पुरोगामी या लेबलात ते ठेवतात.
काका वेलकम बॅक हो !!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काका वेलकम बॅक हो !!

येस्स्स!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

तुमच्या रुपककथा आवडतात. पण जरा विस्ताराने लिहा. गोष्ट मोठी झाली की , ती जास्त रंजक वाटेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.