पितृृृ"पक्षी"

माझा कावळा अत्रंगी
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो

माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो

माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो

पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
तीळतर्पणाची माझ्या
आज नको वाट पाहू

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile छान. कावळा प्रचंड हुषार पक्षी आहे. प्र-चं-ड!!
आवडता पक्षी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गूंज रहे हैं डूबते साये शाम की खुशबू हाथ ना आये
गूंजती आँखों की नशिली बोलियाँ, बोलिये सुरीली बोलियाँ
https://www.youtube.com/watch?v=6YYqC-T8H8Y

ह्या पक्ष्यावर मी ही बेहद्द फिदा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... कविता बरी वाटली. ऑफबीट आहे थोडी, पिंड फोडणे वगैरे गोष्टींचा ज़िक्र करते, परंतु म्हणूनच रोचक आहे. (कवीच्या तीळतर्पणाचा उल्लेख विशेष दिलखेचक.)

पण अर्थात, या सर्व केकावरील आयसिंग म्हणजे कविताविषयातील उत्सवमूर्ती. कावळा! पर्सनॅलिटी असलेला टग्या पक्षी. कधी कोणी कोणालाही उपद्रव न देता रस्त्यातून आपल्याच तंद्रीत चाललेला असेल, तर वरून येऊन विनाकारण टपलीच काय मारून जाईल. स्वतःचे शेणाचे घर पानशेतच्या पुरात वाहून गेल्यावर निर्वासित म्हणून चिऊताईच्या घरात घुसून, तिच्याच पिंपातले चणे हादडून वर खाल्ल्या पिंपात हागून काय ठेवेल.

किंबहुना, माझ्या हातात जर असते, तर मी कावळ्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी नेमला असता. (कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याकारणाने, आजमितीस जोरावर असलेल्या हिंदुत्वरक्षकांचाही यास पाठिंबा मिळावा - गेला बाजार आक्षेप असू नये - अशी अपेक्षा आहे.)

- (ष्टेकप्रेमी) 'न'वी बाजू.

..........

याचा अर्थ 'कवीने कोणासाठी तरी केलेले तीळतर्पण' असा घ्यायचा नसून, 'कवीसाठी कोणीतरी केलेले तीळतर्पण' असा घेणे अपेक्षित असावे, असे (परस्पर) गृहीत धरून मोकळा होतो.१अ

१अ घ्या! खास तुमच्यासाठी तळटीपसुद्धा आणली.

किमानपक्षी, काऊचिऊच्या गोष्टीच्या आमच्या आजीने सांगितलेल्या आवृत्तीचा शेवट तरी असाच व्हायचा. अर्थात, आमची आजी आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेली (आणि त्यातही कऱ्हाडे ब्राह्मण), त्यामुळे... चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचून डोले पानावले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली. किंचित टंग इन चीक मौजमजा असल्यामुळे बहुतांश अगोड मलई बर्फीसारखी वाटली.

पिंडाचं कडवं छान जमलेलं आहे. खड्याशी खेळण्याचा संबंध मी खडे टाकून पाणी वर आणण्याशी लावला, पण पुढच्या दोन ओळी त्या संदर्भात बसत नाही.

'घडा अर्धाच पुण्याचा
खडे टाकून भरतो'

सारखं काहीतरी मला सुचलं.

तेरा आकडे मोजण्याचाही संदर्भ कळला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

= स्मशानात अंत्यविधी चालू करण्यापूर्वी एक मिळेल तो खडा उचलला जातो. हा जीवखडा पुढील "दिवस- पाण्यात" परलोकगमनेच्छु मृृृताचे इहलोकात प्रतिनिधित्व करतो.
"दिवस-पाण्या"च्या संदर्भात तेराव्या दिवसाला खास महत्व आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. मी एकंदरीत 'कावळा' या व्यापक रूपकातून अर्थ लावत होतो. तुम्ही त्याचा जास्त टोकदार आविष्कार 'मर्तिकाचा कावळा' असा कविताभर वापरलेला आहे. हे कळल्यावर कवितेचा अर्थ जास्त धारदार झाला माझ्यासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0