निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे

निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे

संसार निर्धार आधार बीजाचे II

बीज बोयी मानव , वात्सल्य केवळ त्या चौकटीत

घृणा वाढे ती सदैव, करी मंथन विद्येचे II

कल्लोळ माजे दुःख होता जीवाला

हर्षात जवळी तो मद्याचा प्याला II

कसा आलो जन्मी , ते अज्ञात सारे

प्रबळ झालो , त्याचे श्रेय लुटे रे II

जननि भासे पापी , जिने जन्म दिधला

तू बीज बोताक्षणी तिला विसरला II

कुठे फेडीशी हे पांग, सांग तू रे वैष्णवा

अनाथ होशी निर्गमनि नरकातसुद्धा II

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL धन्यवाद , आपला प्रतिसाद लाईक्स करण्यात येत आहे आणि सोबत बक्षीस म्हणून एक नवीन कल्पना सादर करण्यात येत आहे ... त्यावर शुचितै आपला " याईक्स अथवा लाईक्स " प्रतिसाद यावं हि नम्र विनंती ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0