सुंदरी चिचुंद्री निघाली

असं किती दिवस अजून, फक्त बघायचं ,

म्हणून ठरवलं निदान डोळे तरी मारायचं

जाणूनबुजून एकदा गाठली तिला

चांगलाच मारला सणकून डोळा

भडकून तिनं लाखोली वाहिली

चारचौघात बोलली " उंदीर साला "

पुढची शेपटी मागे नेली

मी पण बोललो मग " चिचुंद्री साली "

प्रेमदूधात मिठाचा खडा पडला

दूध गेलं उडत , शिव्यांचा सडा पडला

वाग्युद्धध ते असेच चालले

पशूप्राण्यांचे दिले दाखले

नक्की कोण कुठल्या वंशाचा

कुत्रा मांजर डुक्करहि आले

अशी भांडली,अशी भांडली

उभी आडवी तिनं चड्डी फाडली

प्रेमाची सुरुवात डोळ्याने झाली

पण ... पण ... साली

सुंदरी चिचुंद्री निघाली

सुंदरी चिचुंद्री निघाली ..........

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लोलच लोल. आपण तुमचे फ्यान आहोत सिविपा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी बी फॅन हे त्यांचा आजपसून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटलं सुंद्रीची*१ धाकली चिचुंद्री*२ यावर कविता आहे.
-
*१ मागे आरसा लावलेला रॅाकेलचा दिवा. साधारण नारळापेक्षा थोडा लहान असतो.
*२ हाच दिवा चिकूएवढा असल्यास चिचुंद्री.
पुर्वी लग्नात जे हंडे, डबे, दिले जायचे माहेरकडून त्यात सुंद्रीही असायची. किंवा लग्नात एक सुंद्रीपण मिळाली नाही अशा गप्पा होत.
---
हाक मारलीत सुंदरी, नाही म्हटल्यावर चिचुंद्री? अँ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाक मारलीत सुंदरी, नाही म्हटल्यावर चिचुंद्री? अँ?

च्रट्जी, त्यांना ऊंदीर म्हटल्याने त्यांनी तिचे नामकरण चिचुंद्री केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

उभी आडवी तिनं चड्डी फाडली

ह्या मास्टरपीस कवितेत हा जो काही आहे तो हॅप्पैंडींग की स्याडैंडींग?
(ता. क. ही कविता इतकी उच्च पातळीची आहे की हिला 'औपरोधिक ५ तारका' बहाल करण्यात आलेल्या आहेत. ती खोली गाठते, पण तीच तिची उंची!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

ह्या मास्टरपीस कवितेत हा जो काही आहे तो हॅप्पैंडींग की स्याडैंडींग?

खी: खी:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

http://aisiakshare.com/node/6831 हे नाही का वाचलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

नुकतेच निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा आपल्या निरोप समारंभाच्या मनोगतात म्हणाले नाहीत का की, “एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या इतिहासावरून करू नका. इतिहास कनवाळू किंवा क्रूर असू शकतो.व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या कर्म आणि विचारांवरून केले पाहिजे...” वगैरे,वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

ही कविता त्या कवितेचा पूर्वार्ध आहे हे माहित नव्हतं...
छान छान. पौगंड का काय त्या अवस्थेत म्हणे व्यक्ती पुढे कशा घडणार ते स्पष्ट होतं असं कायसं अस्तं बा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

फाडली एवढं कळलं. पण कुणाची? स्वत:ची का उंदराची? त्यावरुनच, हॅप्पैंडींग की स्याडैंडींग, ते स्पष्ट होईल !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

यात काही नव्या बाजु द्रुगोच्चर व्हायच्या आहेत आइ लव युसह.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद देणार्यांचे मनपूर्वक आभार . मला काहीच सुचत नाही आहे . आबा , यडमाठराव, आचरटबाबा, शुचितै ,१४टॅन, नील लोमस, कासव, तिरशिंगराव आणि इतर वाचकांचे खूप खूप आभार .
आबा , मला आपला श्रीगणेशा प्रतिसाद आज स्वप्नवत वाटतोय . मागल्या तीनेक वर्ष मीही आपले लेख वाचून काढले आणि वाचनखूण साठवून ठेवल्या . आबा मीही फ्यान हाय बरं का तुमचा , लक्ष राहू द्या आणि अशीच मायाहि .
काही दिवस मी बाहेर होतो त्यामुळे लगेचच प्रतिसाद देता आला नाही त्याबद्दल दिलगीर आहे . आबा , थोडासा धास्तावलोय आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं , पण हरकत नाही , कधी लिहिताना खालीवर झालं तर माफी असावी . भविष्यातली माफी आत्ताच मागून घेईन म्हणतोय .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0