पगार, स्त्री-पुरुष समानता आणि जॉर्डन पीटरसन

जॉर्डन पीटरसन हे नाव कधी जास्त ऐकलेलं नव्हतं. कुठुन तरी युट्युबबाबाने सजेस्ट केलं आणि त्याचे काही विडिओ पाहण्यात आले. या बाबाचे काही मुद्दे मस्त पटले तर काही अजिबात नाही. खरंतर काही ठिकाणी तो अगदी इथल्या अजोसारखा पण वाटला. माणूस अगदी शांतपणे मुद्द्याला धरुन जे शब्दच्छल अथवा गोळीबंद रचना करतो ती खरंच इंप्रेसिव वाटली.

आता या इथे शेअर केलेल्या वरच्या लिंकमध्ये कॅथीबाईंनी यांची मस्त तासू अशा ठरावाने घेतलेली मुलाखत पहा. काका काही म्हणाले की 'म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का...' अशा सुरुवातीने बाई त्यांची अतर्क्य अशी कंन्क्लुजन फेकतात. कधी कधी तर पुस्तक अथवा आधी कुठे म्हटलेली वाक्ये देखील या अशा भडिमारासाठी त्या वापरतात. काका मात्र शांतपणे मुद्देसूद बोलायचा प्रयत्न करतात (बाईंनी बोलू दिले तर अर्थात.)

मुलाखतीतला मुख्य मुद्दा पगारासंदर्भातल्या स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा आहे आणि काका त्या फेवरमध्ये नाहीत हा बाईंचा निष्कर्ष आहे (काकांचा मुद्दा त्याच अर्थाचा पण जास्त सविस्तर आहे). कॅथीबाईंनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी काका जमले तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत हे चित्र चाललेय आणि ट्रांस लोकांसाठी वेगळ्या संबोधनाची चर्चा सुरु होते तेव्हा काकांना एक भन्नाट फुलटॉस मिळतो, त्यावर काकांनी जे फुल टॉस लावलाय तो वाद विवादासाठी अगदी उत्तम नमुना ठरावा (ही चर्चा या इथे सुरु होते.).

एकंदरीत पगारासंदर्भातल्या स्त्री-पुरुष समानतेबद्दलतरी काकांची मतं ६०-७०% सेन्सिबल वाटली. काही बाबतीत ते उगीच ओढून ताणून उत्तरे जुळवत आहेत अथवा तकलादू प्रतिवाद करत आहेत असं वाटलं पण त्याला त्या कॅथीबाईंचा स्वत:चे मत रेटण्याचा अग्रेसिवपणा झाकून टाकत होता.

एकंदरीत डावे उजवे यात काहीच पटत नसले तरी हे असले फड रंगलेले पहायला मजा येते हे नक्की. Smile

[संपूर्ण मुलाखत या इथे ]

field_vote: 
0
No votes yet

समानता हा बकवास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात.. हेच हा जॉर्डन बाबा या चर्चेच्या अनुषंगाने मुद्देसूद आणि सौम्य शब्दात सांगतोय ते आवडलं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

जॉर्डन चे अनेक व्हिडिओज पाहिलेत. माझा एकदम आवडता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पीटरसनकाका आणि मुलाखतकर्ती यांचं एकमेकांशी वाग्युद्ध कसं झालं हे सांगण्यापलिकडे काकांनी काय मुद्दे मांडले हे थोडक्यात सांगाल का? त्यातले कुठले पटले, कुठले ताणलेले वाटले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अक्खी मुलाखत परत ऐकून मुद्दे अधोरेखित करून लिहिण्याइतका पेशंन्स माझ्यात आहे असं मला वाटत नाही. असंही येत्या वीकेन्डच्या खबीब-कॉनरच्या गोंधळात हे अवघडच आहे. जे आवडलं ते मांडलं, म्हन्जे मला चर्चा आणि वादविवादाच्या स्वरुपाबद्दल बोलायचं होतं ते मी मांडलंय.
मुद्दे जमतील तसे मांडतो नंतर पण फक्त आठवणीनुसार काही ढोबळ गोष्टी :
१. गौरवर्णीयांनी ऑप्रेस केलेल्या फक्त स्त्रीया नव्हत्या तर इतर घटक पण होते.
२. पगारातल्या तफावतीसाठी लिंगभेद हा एकच एक घटक मानणे भाबडेपणा आहे. लिंगभेद हा घटक नाही असे नाही पण तोच एकमेव आहे असे मानुन सरसकटीकरण करणे वेडेपणा ठरेल. जॉर्डनकाका हे देखील ठामपणे म्हणतात की स्त्रीया बौद्धिकदृष्ट्या कुठेही कमी नाहीत पण स्त्री-पुरुष या दोन्ही घटकांमध्ये काही (शारिरिक/मानसिक) फरक आहेत ते नाकारता येणार नाहीत आणि ते नाकारून कृत्रिम समानतेचे आग्रह धरणे स्त्रीयांसाठी देखील लॉन्ग टर्ममध्ये तितकेसे फायदेशीर असणार नाही.
३. 'सक्सेस ऑफ आउटकम' : कोणी ठरवून यशस्वी स्त्रीला उच्चपदावर पोहचण्यापासून (फक्त स्त्री आहे म्हणून ) डावलतोय असं नाही (याचं विवेचन आत्ता नीट आठवत नाहीय).
४. संधींची समान उपलब्धता आणि निर्णयाचं स्वातंत्र्य या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. स्त्रीया त्यांना हवे ते प्रोफेशन निवडतील. उदा. (काकांचे मत, माझ्याकडे विदा नाही) सध्या जास्तीत जास्त स्त्रीया मेडिकल प्रोफेशन मध्ये आहेत. पुरुषांपेक्षा जास्त संख्येने आहेत आणि चांगले कामही करत आहेत.
५. अग्रेसिवपणा आणि समजूतदारपणा - या दोन गोष्टी तुमच्या निगोशियेशन मध्ये परिणाम करतात हे नक्की. तुम्ही जितके समजूतदार तितके तुम्हाला नाडले जाण्याची शक्यता अधिक (यातले बरचसं पटलं नाही आणि ताणून विवेचन वाटलं तरी पण अत्ता सगळे मुद्दे आठवत नाहियेत )

माझा आवडता,
४. हा ट्रांन्सजेंडर लोकांच्या एका मागणीबद्दल होता, युनिवर्सिटी मध्ये प्रोफेसरांनी ट्रान्स-विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित संबोधनाने बोलवावे (म्हणजे ही शी ऐवजी झी, हर ऐवजी झर अशी लिस्ट) आणि ही मागणी एक नियमावलीच्या कायद्याच्या स्वरुपात रोल आउट झालीय (अधिक सविस्तर ते उसगावतले लोक्स जाणोत).
काका म्हणे की कोणाला काय म्हणू नये (हेट स्पीच) हे समजू शकतो पण कोणाला कसे संबोधावे हे भाषिकबाबतीत नैसर्गिकरित्या व्हायला हवे आणि असे कायदे करुन नव्हे. ती हुकुमशाहीच्या रस्त्याने जाणारी गोष्ट होते (आणि यावर ते आयडेटिटी पॉलिटिक्स वगैरे आहे) तर कॅथीबाई म्हणे म्हणजे त्यांना हवे ते संबोधन न वापरून तुम्ही त्यांना ऑफेन्ड करायला तयार आहात तर ? त्यावर काकांच उत्तर असं की ' विचार करायला अथवा विचार प्रवृत्त करायला एखाद्याला ऑफेन्ड करायचा थोडा धोका पत्करायला हवा. जसा की तू आत्ता पत्करते आहेस. तू खऱ्याच्या शोधाखातरच मला ऑफेन्ड करण्याचा धोका पत्करते आहेस. ते अस्वस्थ करणारं आहे पण ते तसं असणं हे विचार करणं सुरु राहण्यासाठी गरजेचंच आहे. आणि तू तुझं काम चागलंच करतीयेस की.' कॅथीबाई त्यांच्या पद्धतीने याला ट्विस्ट करू पहात होत्या पण ते स्पीचलेस की काय म्हणतात ते झाल्या क्षणभर.
असो, विस्कळीत आहे पण आठवेल तसं लिहिलं .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

धन्यवाद, हाच मूळ लेख म्हणून जास्त आवडला असता. अजूनही मूळमुलाखत पाहिलेली नाही. मात्र 'ठरवून कोणी स्त्रियांना उच्चपदावर जाण्यापासून रोखत नाहीये' हे पुरेसं पटलं नाही. 'मुलींना शिक्षणाची गरज नाही. त्यांना संसार करता आला की झालं. त्यांना शिक्षण दिलं तर त्या बहकतात.' असा विचार करून पालक मुलींना जेमतेम शिकवतात ते ठरवूनच केलेलं असतं. आणखीन टोकाचं उदाहरण म्हणजे 'स्त्री भ्रूणहत्या'. हे तर मुलींनी उच्चपदावरच काय तर कुठेच पोचू नये यासाठी ठरवून घेतलेले पाऊल आहे. अशी पावलं 'ठरवून' उचलली जातच नाहीत असं कोणी म्हटलं तर ठार चूक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मात्र 'ठरवून कोणी स्त्रियांना उच्चपदावर जाण्यापासून रोखत नाहीये' हे पुरेसं पटलं नाही.

बिनबुडाची विधानं पुरुषांनी केली की त्याला कमी विरोध होत असणार आणि स्त्रियांना अधिक. याची तपशिलवार कारणमीमांसा आणि आकडेवारी तेरीज हस्टनच्या 'How Women Decide' नामक पुस्तकात वाचली होती. शिक्षणापासून रोखणं, स्त्रीभ्रूणहत्या वगैरे गोष्टी फारच हिंसक आणि टोकाच्या म्हणायला हव्यात. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात किती स्त्रियांकडे PhD असते आणि किती स्त्रिया उच्चपदांवर दिसतात, याचे आकडेही पुरेसे बोलके असतात.

अर्थात कुणाकडून किती वाचन-अभ्यासाच्या अपेक्षा धरायच्या याबद्दल माझ्या अपेक्षा अत्यंत क्षुद्र आहेत.

अवांतर: तर आमच्या शहरात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे वेगवेगळे meetup समूह आहेत. माझ्या विषयाशी संबंधितही दोन-चार समूह आहेत. या सगळ्या समूहांच्या नावांत women असा शब्द असला तरीही अधिक माहिती लिहिताना सर्व प्रकारच्या अल्पसंख्याक गटांसाठी हे समूह असल्याचं म्हटलेलं असतं. पार्टीछाप कार्यक्रम वगळता जेव्हा अभ्यासाशी संबंधित गोष्टी चालतात तेव्हा सगळ्यांना, गोऱ्या पुरुषांनाही, आमंत्रण असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील वाक्य.
.

अर्थात कुणाकडून किती वाचन-अभ्यासाच्या अपेक्षा धरायच्या याबद्दल माझ्या अपेक्षा अत्यंत क्षुद्र आहेत.

.
.
स्त्रियांकडून असलेल्या पुरुषांच्या अपेक्षा अतिक्षुद्र आहेत असं सुद्धा म्हणावं का ?
.
उदाहरण देतो.
.
आता उदाहरण व तुलना यामधे काही फरक नसतोच अशा भंपक गृहितकावर आधारित प्रतिवाद होऊ शकतोच पण तरीही रिस्क घेतो.
.
क्यालिफोर्निया हे स्त्रियांसाठी (व इतर सपोझेड मायनॉरीटीज साठी - म्हंजे उदा. समलिंगींसाठी) संवेदनाशील, सहृदय धोरणे राबवणारे राज्य म्हणून ओळखले जाते. क्यालिफोर्नियातले रहिवाशी व इतर राज्यातले रहिवासी सुद्धा असं मानतात असं माझं गृहितक आहे. स्त्रियांना क्यालिफोर्निया मधे राजकारणात उतरण्यासाठी कोणतेही कायदेशीर इंपेडिमेंट्स नाहीत. (तसे तर भारतात पण नाहीत. पण भारत हा अमेरिकेपेक्षा अधिक पुरुषप्रधान आहे - असा आरडाओरडा होऊ शकतो.). तर मुद्दा असा आहे की - क्यालिफोर्नियामधे एकंदर लोकसंख्येच्या सुमारे ५०% स्त्रिया आहेत. पण क्यालिफोर्निया मधील विधीमंडलात आणि सिनेट मधे स्त्रियांचे प्रमाण ५०% पेक्षा चिकार कमी आहे. असेंब्ली व सिनेट मिळून सुमारे २४% स्त्रिया आहेत व ७५% पुरुष. म्हंजे पुरुषप्रधान म्हणावे की म्हणू नये ?
.
पण तरीही क्यालिफोर्नियामधील विधीमंडलाने नुकताच असा कायदा केलाय की स्टॉक एक्स्चेंज वर लिस्टेड असलेल्या क्यालिफोर्नियामधल्या खाजगी कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडलावर (म्हंजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) किमान एक स्त्री नियुक्त केलीच पाहिजे.
.
म्हणे पुरुषांच्या मनात जेंडर बायस असल्यामुळे स्त्रियांना संचालक मंडलावर जायला संधी मिळत नाही.
.
.
आता क्यालिफोर्नियाच्या सर्वोच्च राजकीय निर्णयन मंडलात बहुसंख्येने पुरुष असूनही आणि स्त्रिया कमी असूनही क्यालिफोर्नियातल्या पुरुषप्रधान गँगने (म्हंजे संख्याबलाने ओ) कायदेमंडलाने हा निर्णय घेतलेला आहे.
.
केवढा तो पुरुषी अहंकार ?
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रियांकडून असलेल्या पुरुषांच्या अपेक्षा अतिक्षुद्र आहेत असं सुद्धा म्हणावं का ?

वर संदर्भ दिलेला आहेच. तो वाचलात तर समजेल की सगळ्यांकडून समाजाच्या अपेक्षा बऱ्याच जास्त असतात, विशेषतः जेव्हा ते लोक आपल्या पारंपरिक कार्यक्षेत्राच्या बाहेर पडतात. घराबाहेर आणि स्त्रियांच्या शाळा-कॉलेजांतल्या नोकऱ्या वगळता बाकी सगळ्या ठिकाणी स्त्रियांकडून अतिशय जास्त अपेक्षा ठेवतात.

मात्र अनभ्यस्त लिहिणाऱ्या/बोलणाऱ्या आणि विनोदबुद्धी नसणाऱ्या लोकांकडून माझ्या क्षुद्र अपेक्षा असतात.

बाकी उदाहरण वा-वा-चान-चान आहे. विदेतून माहिती मिळवावी लागते, माहितीमधून आकलन तयार करावं लागतं आणि बरंच काही आकळलं की ज्ञान मिळतं, वगैरे गोष्टी समजण्याची अपेक्षा माझंच-बरोबर-आणि-तुझं-चूकच अशा लोकांकडून मी ठेवत नाही.

तुमचं चालू द्या. यापुढे अनभ्यस्त प्रतिसादांवर विनोद सुचेस्तोवर माझ्याकडून प्रतिसाद येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्थात कुणाकडून किती वाचन-अभ्यासाच्या अपेक्षा धरायच्या याबद्दल माझ्या अपेक्षा अत्यंत क्षुद्र आहेत.

Sorry, पण तुमची कमेंट कोणाला उद्देशून होती हे स्पष्ट कराल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

मुख्य देव पीटरसन आणि पुढे त्यांचे भक्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म. मुख्य धाग्यात पीटरसनचं जरा कौतुक केलंय तर लगेच भक्त ? आणि म्हणून लगेच क्षुद्र अपेक्षा वगैरे ?? भलत्याच कंक्लुजिव आणि प्रचंड बरोबर अशा असणार हो तुम्ही. 'तुमचंच बरोबर ' असं न म्हणणारे सगळे भक्त आणि अजून काय काय. हो नि तुम्हीच तेवढ्या चूक बरोबर जाणणाऱ्या नाही का. कै च्या कै.

फक्त एखाद्याचं विवादकौशल्य आवडलं हे म्हणण्यासाठी ही अशी मुक्ताफळं उधळणार असाल तर धन्यच की.

तुम्ही मला म्हणत नसालही कदाचित, पण व्यक्तिश: चर्चा बघताना तो पीटरसन बाबा अथवा कॅथी बाई मला ठाऊक नव्हते, तेव्हा ती आणि तो काय शिकलाय/वाचलाय हे लगेच माहितपण नाही(गुगल करता येइल हे माहितीय) पण तुम्ही फक्त तुम्हाला मत पटलं नाही (ते पण मी विस्कळीत लिहिलंय हे ही सांगतोय) म्हणून समोरचा अडाणी, त्याचं म्हणणं विचारात घेणारे 'भक्त'.? लगेच ??

तुम्ही विडिओ पाहिलात की नाही माहित नाही (विचारत ही नाही). राघा म्हटले म्हणून आठवून काही मुद्दे माडंले की लगेच 'भक्त, क्षूद्र' वगैरे विशेषणं लावून लगेच लायकी काढून रिकाम्या. मुद्दा न मांडता इतरांची लायकी काढत हे असले बोलणाऱ्यांची कीव कराविशी वाटते. मग ते कोणाचेही भक्त असो अथवा स्वघोषित पंडित. ( वाचन अभ्यास हे फक्त 'तुमचंच' असतंय, आणि हो 'तुमचं बरोबर' म्हणणाऱ्यांच एक, बाकी सगळे 'असेच', असं काही आहे का तुमच्या मते ?)

तुमच्याबद्दल थोडाफार आदर होता त्यामुळे तर हे बिनबुडाचं जजमेंटल विधान अगदीच आश्चर्यकारक होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

तुम्ही पीटरसनचे भक्त आहात का? मला तरी तसं अजिबातच वाटलं नाही. निदान तो प्रतिसाद लिहिताना तुमच्याबद्दल उल्लेख केला नव्हता. स्वतःवर ओढवून घेऊ नका; इथे इतर भक्त आहेत आणि ते आपल्या भक्तीचं पुरेसं प्रदर्शन करत आहेत.

क्षुद्र हे माझ्या अपेक्षांबद्दल वापरलेलं विशेषण आहे. किंबहुना, त्यातून माझी लायकी काय, हे फार तर समजेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या मते तो गब्बरला उद्देशून प्रतिसाद होता. तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जींना जोरदार सहमती.
मी जॉर्डन पीटरसन चा भक्त बनलो आहे.
तेव्हा तो प्रतिसाद मला लागू पडावाच.
व तो प्रतिसाद जर टीकात्मक असेल तर ती टीका मी आनंदाने स्वीकारेन.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेन्शन कशाला घेतोय गुर्जी पण उगी जाता-येता जजमेंटल कमेंटी कशाला मारायच्या असं वाटतं. हे भक्तगिरी इतकंच चूक.
पण असो, असतो एकेकाचा स्वभाव.

त्याव्यतिरिक्त 'संशयाचा फायदा' गृहित धरून हे ही म्हटलंय की,

तुम्ही मला म्हणत नसालही कदाचित, पण व्यक्तिश: चर्चा बघताना तो पीटरसन बाबा अथवा कॅथी बाई मला ठाऊक नव्हते, तेव्हा ती आणि तो काय शिकलाय/वाचलाय हे लगेच माहितपण नाही पण तुम्ही फक्त तुम्हाला मत पटलं नाही म्हणून समोरचा अडाणी, त्याचं म्हणणं विचारात घेणारे 'भक्त'.? लगेच ??

पीटरसन अथवा गब्बर मला माहित नसताना मी त्या दोघांना फक्त मला न पटणारी मतं मांडली म्हणून 'अडाणी' ठरवायचं ?
बरं, मला अपेक्षित असं वाचन केलं म्हणजेच ते अभ्यासू होणार ? बरं हे दुसऱ्या बाजूने झालंय का ? इथे माझ्यासारख्या बाहेरून बघणाऱ्याला तरी गब्बर (इथे) अथवा पीटरसन (मुलाखतीत) असे काही करतोय असं दिसलं नाही.

गुर्जी, सॉरी पण तुम्हीपण कधी कधी पक्षपातीपणा करता बुवा. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

इथे पक्षपातीपणा काही केला आहे असं वाटत नाही. अदितीच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर नाही. तिने जे लिहिलं आहे त्याचा रोख तुमच्यावर नाही, एवढंच सांगण्याचा माझा प्रयत्न होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमक्या माणसाचं सगळं आणि सर्वथा योग्य असं म्हणणारे भक्त. ६०-७०% मतं पटतात यात भक्ती आलीच कुठे? चिकित्सा नाकारली जाते तेव्हा भक्ती येते. 'अमक्या माणसाचं काही म्हणणं पटतं, काही पटत नाही' यात मुळात चिकित्सा केली आहे, हे स्पष्ट दिसतं. चिकित्सा करून अगदी सगळी मतं पटली तरी ती भक्ती ठरत नाही; कारण तेच, चिकित्सा.

त्यापुढे, कोणा गणंगानं काही(ही) म्हटलं, तर ते आपल्या अंगाला लावून का घ्यायचं? जॉर्डन पीटरसननं काही म्हटलं तर ते मी माझ्या अंगाला लावून घेत नाही. त्याच्या भक्तांनी काही म्हटलं तरीही अंगाला लावून घेत नाही. तसं माझं म्हणणंही अंगाला लावून घ्यायची गरज काय?

आपल्याला कोणी तरी जोखतात, तसं आपणही इतरांना जोखू शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.