उन्मनी

मनी नांदती तरल कवडसे
धूळरेखल्या किरण-कणांचे
मंद धून नादतसे तेथे
धूप-केवडे वळसे उठवत!

मंद धून तम कुरतडणारी
क्षणोक्षणीच्या मात्रा मोजत
सूर-शब्द-उर्मींच्या वेणा
येत उसासत (की आवेगत?)

उरल्या स्वरतालांच्या कैफा
वळणावर जणु विरत सावली
दिवा शांतवित जशी उरावी
वात एकली जळत, उणावत

नाद घड्याचा की मातीचा?
काय आगळे असेल उत्तर?
प्रश्नांचा का हवाहवासा
दरवळ निर्मम असा अनाहत?

यत्न मानवी तृप्त होत वा
दैवभोग होती बलवत्तर
मात्र गोचिडी इच्छांना ह्या,
मरणांती ना अंत साहवत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चुकून 'छोट्यांसाठी' सदरात पडली कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0