एक यशस्वी उद्योजिनी - आभा करंदीकर

काही लोक जवळचे संबंध असूनही अपरिचित राहातात तर काही अगदी चुटपुटत्या ओळखीतूनही चटकन मनाला कळतात. शाळेपासून वगैरे ओळख नाही आमची, पण जेवढी काही ओळख आहे तेवढ्यात एक परिचित आत्मियता जाणवते. किंबहुना मला हेसुद्धा आठवत नाही कि मी तिच्याशी पहिल्यांदा केव्हा बोलले. जेव्हा कधी बोलते तेव्हा तिच्यातील चांगुलपणा चटकन कळून येतो. फेसबुकवर, फोनवर आमच्या गप्पा झालेल्या आहेत. या दिवाळीत आम्ही पहिल्यांदा भेटू. I am looking forward to it is an understatement .

आभा करंदीकर हे नाव कदाचित तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल. ही माझी मैत्रीण इंटिरिअर डेकोरेटर आहे व घर आकर्षक बनविणे ते कॉर्पोरेट क्षेत्रात इंटिरिअर डेकोरेशन या विषयात तिने जम बसविलेला आहे. परवाच एका 'उद्योजिनी' या नात्यातील तिची एक छानशी मुलाखत ऐकली. तिच्या परवानगीने ती येथे टाकत आहे. फक्त माझी मैत्रीण म्हणून मी टाकलेली नाही, खरंच अतिशय प्रेरणादायी आहे. जरूर ऐका.

गेली २३ वर्षे ती या क्षेत्रात असुन, १३ नॅशनलाइझ्ड बँका , जर्मन कंपनीज व अन्य अनेक कंपन्यांच्या ऑफिसेसने तिचे काम डिस्प्ले केले आहे. या मुलाखतीत तिने स्वतः:चे अनुभव तर मांडलेले आहेतच, पण त्याचबरोबर घरात कशाप्रकारचे रंग बरे वाटतात तर दुकाने, ऑफिसेस अशा क्षेत्रात कसे रंग खुलतात याच्याही काही टिप्स दिलेल्या आहेत. माझा असा समज होता कि इंटिरिअर डेकोरेटर्स हे इकडून तिकडून शोभेच्या वस्तू आणून मुळात असलेल्या फर्निचरवर मांडून सजवतात Biggrin पण तसे नसून हे काम बरेच मेहनतीचे आहे असे, ही मुलाखत ऐकल्यानंतर लक्षात आले. प्लायवूड आदि कच्चे सामान घेऊन, कारागिरामकडून वेळेत काम करवून घेणे हे सोपे काम नाही. क्वचित उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतातील कारागिरांबरोबर काम करताना आलेले अनुभवही आभा मांडते.

मला अतिशय आवडलेले काही मुद्देच जर सांगायचे झाले तर, व्यवहारातील चोखपणा, शिस्तबद्धता, हाती घेतलेला प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची कसरत, कामाचा एकंदर आवाका व त्याचे प्लॅनिंग अशा काही मुद्द्यावर तिची मते ऐकण्यासारखी आहेत. शिवाय अनेकांना खूप काही हवे असते पण त्यांचे तितके बजेट असतेच असे नाही. अशा वेळी त्यांना समजावून सांगावे लागते. नाही म्हणता येणे हे देखील कौशल्याचे काम असते.

तिने, छान टिप्स दिलेल्या आहेत.

https://drive.google.com/file/d/1s9aDfWbHSS0d_ITImi202kQuHhby9so0/view

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐकली मुलाखत.
तर तुमचा इथला वेळ मजेत जाणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय 'च्रट्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

एक अवांतर शंका.

उद्योजक चे स्त्रीलिंग उद्योजिनी कसे काय होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

त्या मुलाखतीमध्ये हा शब्द ऐकला आणि मग तोच वापरला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

मला उद्योगिनी ऐकू आलं. बाकी रेडिओवरच्या मुलाखती एकसुरीच असतात.
टिव्हीवरच्या सह्याद्री अथवा इतर डीडी चानेलच्या मुलाखतींमध्ये दोन तत्त्व पाळली जातात - मुलाखतकार सरकारी निवडलेला /ली असतो त्याच्यावरच सतत कॅम्रा ठेवायचा, त्यालाच बोलू द्यायचे. उत्तर गुंडाळण्याचे पूर्ण अधिकार तो वापरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... उद्योजक हा मुळात स्त्रिलिंगी शब्द आहे. आणि पुरुष उद्योजकांना उद्योजकोबा म्हणायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.