कोडे - चवळीचे दाणे

(१) चवळीच्या दाण्यांचे १० पेले आहेत.
(२) प्रत्येक पेल्यात १०० चवळीचे दाणे आहेत.
(३) १० पैकी ९ पेल्यात, प्रत्येक दाणा १ ग्रॅमचा आहे.
(४) १० वा जो पेला आहे, त्यातील प्रत्येक दाणा ०.९ ग्रॅमचा आहे.
(५) तो विशिष्ठ् पेला कोणता ते माहीत नाही. डोळ्यांना कळू शकत नाही.
(६) एक तराजू आहे.
(७) त्या तराजूत फक्त एकदाच वजन करता येते. परत नाही. कारण एकदा वजन केल्यानंतर तो तराजू अदृष्य होतो.

कोडे - तो तराजू वापरुन, तो पेला कसा ओळखाल?
_________________
उत्तर मलाही माहीत नाही. मी प्रयत्नच करते आहे Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वजन ग्रॆममध्ये करता येतं का? तसं असल्यास खूपच सोपं आहे. पेल्यांना क्रमांक द्यायचे आणि तितके दाणे प्रत्येक पेल्यातून घ्यायचे. सर्व दाणे 1 ग्रॆमचे असतील तर वजन 45 यायला हवं. 44.6 भरलं तर चौथ्या पेल्यातले चार दाणे प्रत्येकी 0.1 ग्रॆमने कमी आहे. 44.5 भरलं तर पेला क्र. 5. इत्यादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्या हेच उत्तर असेल की. त्या कोड्यात म्हटले आहे की स्केल आहे. आता तो वजनकाटा असू शकतो हे माझ्या लक्षात आले नाही. मला वाटले की तो तराजू आहे. Sad
____________
त्या लेखकाने हिंटमध्ये असेच म्हटलेले आहे की - वेगळ्या वेगळ्या संख्येचे दाणे वेगळ्या वेगळ्या पेल्यातून घ्या.
__________
राघांचे अभिनंदन. तेही एका मिनिटात उत्तर आले. Smile कौतुकास्पद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0