रात्रीला पंख फुटले

रात्रीला पंख फुटले

अन ती गेली उडून

दिवस बिचारा काम करून

गेला थकून भागून

शोधू कुठं अन जाऊ तरी कसं ?

हि अर्धवट नोकरी सोडून

विचार करुनी वेडा झाला

मग्न गेला बुडून

वैनतेया सांगे विनवून

कामिनीस आण शोधून

खगराज चहू भ्रमण करुनि

आला निरोप घेऊन

गरोदर आहे यामिनी

सांगे तात बनलात आपण

गळून पार अर्धा झाला

जमीन गेली सरकून

कोण देईल सुट्टी मजला ?

कोण ठेवेल धरती झाकून ?

उडणारा बोजवारा आठवून

हात पाय गेले गळून

शिस्तीत नोकरी केली असती

तर नसते लागले माझे

नको तिकडे ध्यान दिले

आता उचला दोघांचेहि ओझे

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहाहा आणि कोण पोर होणार म्हणे रजनीला/निशेला/यामिनीला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हां रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल Smile
कळलं कळलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरुडासाठी, वैनतेय हा शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुचितै आणि अर्थ बरोबर घेतलात .. मानलं तुम्हाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0