भारताच्या जीडीपीतला धर्म/श्रद्धांचा टक्का

मला खरंतर या विषयावर पोल काढायचा होता, पण काही तांत्रिक कारणामुळे तो काढता येत नाहीये. तेव्हा चर्चाविषयातच ते प्रश्न सामावून घेऊन त्यावरून काही आकडेवारीचे निष्कर्ष काढण्याऐवजी काहीशी गुणात्मक चर्चा व्हावी ही इच्छा आहे. मला विचारायचा मूळ प्रश्न असा :

"तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीयांनी, तुमच्या किंवा एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नाच्या किती टक्के खर्च निव्वळ धार्मिक किंवा ज्याला श्रद्धा मानता येईल अशा गोष्टींवर गेल्या वर्षभरात केला?"

सगळ्या इन्व्हॉल्व्ह्ड पार्टींचं उत्पन्न लाखांत मोजता आलं तर दर लाखामागे किती हजार खर्च केले? हे झालं गणिती वर्णन. पण नुसतं तिथे थांबता येत नाही.

कारण धार्मिक खर्च म्हणजे नक्की काय? धर्म हा संस्कृतीपासून वेगळा काढता येत नाही. म्हणजे समजा तुमच्याघरी गणपतीचा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी प्रतिष्ठापना, आरास, प्रसाद, आरती वगैरेंसाठी खर्च येतो. त्यातला काही सांस्कृतिक असतो तर काही धार्मिक असतो. म्हणजे प्रतिष्ठापना करण्यासाठी पुजारी, गुरुजी वगैरे लोकांना आपण दक्षिणा देतो. तो सरळसरळ धार्मिक खर्च आहे. समारंभाचे काही खर्च धार्मिक तर काही निव्वळ सांस्कृतिक म्हणता येतात. पण तरीही हे खर्च धार्मिक निमित्ताने होतात आणि त्यातून या परंपरा पुढे जातात. त्यामुळे त्यातले सुमारे दहा ते वीस टक्के हे धार्मिक संस्थांना 'किकबॅक' किंवा कमिशन म्हणून जातात असं म्हणता येईल. दिवाळीचं उदाहरण त्याहून कठीण आहे. कारण अनेक खर्च मौजमजेचे असतात. गोडधोड करणं, नवीन कपडे किंवा वस्तू घेणं हे अधार्मिक खर्च झाले. कारण कधी ना कधी ते करायचे असतात. मात्र लक्ष्मीपूजेसाठी तुम्ही जर पुजारी बोलावला तर त्याला दिलेली दक्षिणा ही पूर्णपणे धार्मिक. कंदील बांधणं, रांगोळी काढणं, फटाके उडवणं हे खर्च बहुतांशी सांस्कृतिक तर थोडेसे धार्मिक म्हणता येतील. नक्की हिशोब कसा मांडायचा हे आपलं आपण ठरवायचं. मी खाली एक यादी देतो आहे, सर्वांना ती पटेलच असं नाही. पण प्रत्येकाने साधारण हिशोब करून टक्केवारी मांडावी अशी माझी इच्छा आहे.

1. देवळाच्या दानपेटीत टाकलेले पैसे - 100% धार्मिक खर्च
2. ज्योतिषाला दिलेले पैसे - 100% श्रद्धात्मक खर्च
3. देवाला/देवीला बोललेल्या नवसासाठी केलेला खर्च किंवा शारीरिक ताप - जवळपास 100% धार्मिक/श्रद्धात्मक खर्च
4. कुठच्यातरी सणासाठी पुजारी/उपाध्याय बोलवून विधी करण्यासाठी दिलेली दक्षिणा - 100% धार्मिक/श्रद्धात्मक खर्च
5. लग्न/मुंज इत्यादी संस्कार - त्यातला पुरोहिताचा खर्च धार्मिक, पण इतर समारंभाचा खर्च 90% - 95% अधार्मिक
6. सोसायटीच्या गणपती उत्सवासाठीची वर्गणी - ही टक्केवारी काढणं कठीण आहे. सुमारे 50% धार्मिक धरायला हरकत नाही.
7. धंद्यातली वधारी, निकटवर्तीयांचा दुर्धर रोग यासाठी बुवा/बाबा यांना दिलेले पैसे - 100% धार्मिक/श्रद्धात्मक
8. सत्यनारायणाची पूजा - पुजाऱ्याचा खर्च 100% तर इतर खर्च साधारण 10% धार्मिक/श्रद्धात्मक
9. एखाद्या तीर्थयात्रेचा खर्च - साधारण 20% प्रवासखर्च, आणि तिथल्या विधींसाठीचा खर्च 100% धार्मिक.

हे आकडे म्हणजे दगडावरची रेष नाही. तुम्ही तुमचे अंदाज वापरून उत्तर द्या.

थोडक्यात विचार करायचा झाला तर एखाद्या गोष्टीसाठी भारतीय धर्मांपोटी होणारा खर्च, जो त्याच गोष्टीसाठी इतर देशांत किंवा धर्मांत होत नाही, तोच खर्च मोजायचा. तेव्हा पुन्हा एकदा मूळ प्रश्न विचारतो.

"गेल्या वर्षभरात तुम्ही (तुमच्या कुटुंबीयांनी), तुमच्या (कुटुंबाच्या) उत्पन्नाच्या किती टक्के खर्च निव्वळ धार्मिक/श्रद्धात्मक गोष्टींवर केला? (एकंदरीत लाखांतल्या उत्पन्नात दर लाखामागे किती हजार?)"

1. पाव टक्का किंवा त्याहून कमी
2. सुमारे अर्धा टक्का
3. सुमारे एक टक्का
4. सुमारे दोन टक्के
5. सुमारे पाच टक्के
6. पाच टक्क्याहून अधिक

तुमचं उत्तर आणि तदनुषंगिक चर्चा यातून सगळ्यांनाच काहीतरी शिकायला मिळेल अशी आशा आहे.

field_vote: 
0
No votes yet

एखाद्या तीर्थयात्रेचा खर्च - साधारण 20% प्रवासखर्च, आणि तिथल्या विधींसाठीचा खर्च 100% धार्मिक.

अगदी हेच्च म्हणायचं होतं. लोक एका दगडात २ पक्षी मारतात. कधीनाकधी पर्यटन करायचेच असते. ती गरजच आहे. पण लगे हाथो, गोंदवले नाहीतर कार्ला जाउन या. पर्यटनचे पर्यटन आणि देवाचीही कृपा Wink
असो.
- पाव टक्का किंवा त्याहुन कमी.
फक्त सठिसामाशी (अक्षरक्ष:: वर्षातुन एकदा किंवा दोनदा) अमेरीकेतील, १५० मैल दुरच्या देवळात जाणे. देवळात अर्चना ($१० - $१५) करणे तसेच पुजाऱ्याच्या थाळीत पाच डॉलर अर्पण करणे.
म्हणजे एकूण - जास्तीत जास्त $४० खर्च वर्षाला.
_____________
१० वर्षात एखादी भारताची ट्रिप होते त्यात कार्ला-महड किंवा गोंदवल्याला मजा म्हणुनच खरं तर जाणं होतं. तो खर्च माहीत नाही कारण मी स्वत: घरच्यांसमवेत गेले आहे पण खर्च केलेला नाही तेव्हा अंदाज नाही. पण हां देवीला दक्षिणा १०१ रुपये. गणपतीला ११ रुपये व महडला, लाडु जे की श्रद्धेपक्षा चोचले म्हणुन घेतले जातात, तो खर्च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

नास्तिकांच्या मेळाव्याला जाण्याचा खर्च यात मोजायचा का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा हा. नास्तिकता हा धर्म नाही. किंबहुना धार्मिकतेच्या पूर्ण विरोधाचा मामला आहे.

तसं तर नास्तिक मेळाव्यांपेक्षा 'स्टार ट्रेक कन्व्हेन्शन' 'स्टार वॊर्स कन्व्हेन्शन' झालंच तर 'माइनक्राफ्ट कन्व्हेन्शन' यांवर लोक जास्त खर्च करतात...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिकता हा धर्म नाही. किंबहुना धार्मिकतेच्या पूर्ण विरोधाचा मामला आहे.

रिचर्ड डॉकिन्सची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याची भाषणं यूट्यूबवर फुकटात उपलब्ध आहेत. तरीही तो भाषण द्यायला येणार म्हणून, त्याला याचि देही याचि डोळा भाषण देताना बघण्यासाठी हजारेक अमेरिकी डॉलर खर्च करणं, आणि वारीला जाणं किंवा धार्मिक कारणांसाठी चारधाम यात्रा करणं यांत काय फरक?

प्रस्थापित देव-धर्म आणि डॉकिन्स स्त्रीद्वेष्टे आहेत, हे साम्य सध्या सोडूनच देऊ.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशा प्रकारच्या पोलमध्ये non-response bias प्रचंड असतो. एकतर ‘ऐसी’ ची प्रतिमा (ढोबळ विधान म्हणून) विवेकवादी-बुद्धिवादी-डावी अशी आहे. त्यामुळे धर्मविधींवर खूप खर्च करणाऱ्यांचं एकूण समाजातलं जे प्रमाण आहे, त्या मानाने ‘ऐसी’च्या सदस्यांमधलं ते प्रमाण फार कमी असणार. आणि नेमक्या ह्याच कारणापोटी असे लोक ‘आपण धर्मविधींवर किंवा ज्योतिषांवर बराच खर्च करतो’ ह्याची जाहीर कबुली इथे द्यायला राजी होणार नाहीत.

पण असो. तुम्हाला हवंच असेल तर माझं उत्तर ‘शून्य टक्के’.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

या प्रश्नाचं उत्तर लांबलचक आहे, पण पाचा उत्तरी सफळ संपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

मुळात, ऐसीवरच्या चार टकल्यांना हा प्रश्न विचारून त्यातून काहीतरी सार्थ मोजमाप होईल ही आशा व्यर्थ आहे, हे तुमचं म्हणणं मान्य आहे. उद्देश काहीतरी मर्यादित त्रुटीचं उत्तर काढण्याचा नाहीच. मात्र तरीही त्यातून येणारी उत्तरं ही पूर्णपणे क्वालिटेटिव्ह नाहीत, किंवा नसतील. कारण त्या उत्तरांतून किंवा ती उत्तरं काढण्याच्या प्रक्रियेतून जो मानसिकतेत बदल होईल तो मला महत्त्वाचा वाटतो. सध्या 'धर्मावर, देवळांवर, उत्सवांवर खर्च प्रचंड वाढलेला आहे' या विधानाचा प्रचंड बहुमताने विजय होईल अशी मला खात्री आहे. पण इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात तो ठेवून 'नक्की किती?' हा प्रश्न विचारणं आणि त्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. डॉल्बीचे आवाज, लायटिंगचा झगमगाट, आणि शहरातल्या देवळांतल्या रांगा वाढलेल्या दिसल्या तरीही ही वाढ नैसर्गिक आहे, मर्यादित आहे का? देवळाच्या गर्दीपेक्षा रेस्टॉरंट्समध्ये होणारी गर्दी वाढलेली आहे का? धर्म/श्रद्धा यापेक्षा आपण शिक्षण/आरोग्यावरचा खर्च वाढवलेला आहे का? ही उत्तरं सामायिकपणे आपण समाज म्हणून कसे बदलत आहोत याचं चित्र जास्त स्पष्ट मांडतात.

माझा अंदाज असा आहे की भारतात साधारणपणे जीडीपीच्या टक्काभर खर्च हा धर्म/श्रद्धा या इंडस्ट्रीवर खर्च होतो. गेली काही दशकं हे चित्र फार बदललेलं नाही, उलट टक्का कमी झाला आहे असा माझा अंदाज आहे. कमी टक्का, तरीही जास्त खर्च, आणि त्यातून डॉल्बी, ढोल, लायटिंगचा परिणाम खूपच जास्त - म्हणून लोकांना ही वाढ वाटते. म्हणजे प्रत्यक्ष बलात्कार कमी होताहेत, पण रिपोर्टिंगचं प्रमाण वाढलं आहे - म्हणून 'बलात्कार वाढत आहेत' असं पर्सेप्शन होऊ शकतं, तसं.

यातलं पर्सेप्शन काय आणि सत्य काय यावर लोकांनी विचार करावा म्हणून ही मांडणी केलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव टक्क्याहून कमी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

धाग्याचा उद्देश नाही कळला.
---
धार्मिक आचरण - (प्रवास,खाणे,फुले,सजावट,दान,गुरुची बिदागी यासाठीचा ) खर्च हा एकूण मौजमजेचा खर्च याचे प्रमाण हा प्रश्न योग्य होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित हा लेख वाचत असताना अशा प्रकारे माहिती संग्रहित करण्याची कल्पना आपल्याला सुचली असावी. धर्मकारणाचे अर्थशास्त्र (वा आर्थिक व्यवहार) हा नेहमीच अभ्यासकांचा दुर्लक्षित विषय असावा. कारण धार्मिक व्यवहारातील आर्थिक देवाण घेवाणीत पारदर्शकता नसल्यामुळे वस्तुनिष्ठ आकडे मिळण्यात अडचण येत असावी. किंवा अभ्यासकांना सामाजिक, ऐतिहासिक किंवा मानसिक विषयातील आर्थिक व्यवहार जास्त महत्वाचे वाटत असावेत. परंतु सामाजिक (व आर्थिक) व्यवहारात होत असलेल्या धर्माच्या वाढत्या प्रभावामुऴे काही (तुरळक) अभ्यासक याकडे लक्ष देवू इच्छितात.

काही वर्षापूर्वी पश्चिम बंगालमधील धार्मिक खर्चासंबंधीचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. त्यां लेखकाच्या सर्वेक्षणानुसार त्या राज्यात 1991 साली 1782873 लहान मोठी देऊळे होती. व 2001 साली त्यात 35 टक्क्यानी वाढ होऊन ती संख्या 2398650 झाली. मुळात पश्चिम बंगाल तुलनेने जास्त सुसंकृत व साम्यवादावर भर देणारे राज्य असूनसुद्धा ही वाढ लक्षणीय होती. इतर राज्यात ही वाढ आणखी मोठ्या प्रमाणावर असणार.

आपल्या देशातील धार्मिक खर्च मुख्यत्वे करून कौटुंबिक पातळीवर घरोघरी व यात्रास्थळी व सामाजिक पातळीवर गल्लोगल्ली होत आहे. आणि हा खर्च मुख्यत्वे करून मानसिक समाधान, आरोग्यरक्षण व आर्थिक भरभराटीसाठी केला जातो, असे सांगितले जाते. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे (त्या काळी) प्रति वर्षाकाठी प्रति माणशी 2000 रु घरातील आचरणासाठी, 180 रु,गल्लीतील वर्गणीसाठी, 100 रु यात्रास्थळी , व 50 रु धर्मदानासाठी खर्च होत असे. 2001 सालच्या सुमाराची ही आकडेवारी असून आता ती नक्कीच फार मोठ्या प्रमाणात वाढली असावी.

केरळातील पद्मनाभी, गुरुवायूर व शबरीमला मंदिर, महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा, कोल्हापूर महालक्ष्मी, व तुळजापूर अंबाभवानी यांची देवळं, मुंबई सिद्धीविनायक मंदिर, तमिळनाडूमधील मीनाक्षी मंदिर, दिल्ली येथील स्वामीनारायण मंदिर, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, जम्मू-काश्मिरमधील वैष्णोदेवी व अमरनाथ मंदिर, ओडिशातील जगन्नाथ मंदिर, गुजरातमधील सोंमनाथ मॆंदिर, काशी येथील विश्वनाथ मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर इत्यादी यात्रास्थळाना लाखोंनी भेटी देत दानपेटीत सोने-नाणे, (बेहिशोबी, काळा-पांढरा) पैसा टाकून त्यांना आगर्भ श्रीमंत करण्यात आले आहे. व त्यांची मालमत्ता हजारो नव्हे तर लाखो कोटींच्या हिशोबात मोजले जात आहे. याच बरोबर नवसाला पावणारे लालबागचा राजा व दगडूशेठ हलवाई गणपती सारखे काही दिवसाची देवळसुद्धा अती श्रीमंत होत आहेत.

या सगळ्या आर्थिक उलाढालीला 'राँग आयडिया ब्रेन में ठोक दिया' असे म्हणावयास हरकत नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! या प्रश्नाचा प्रत्यक्ष कोणी अभ्यास करून काहीतरी विदा मिळवलेला आहे हे वाचून बरं वाटलं.

2001 साली घरटी सव्वादोन ते अडीच हजार रुपये असा हिशोब दिसतो आहे. यातलं खरोखर धार्मिक/श्रद्धा किती आणि आनुषंगिक किती हे ठरवावं लागेल. 'आचरण'मध्ये पूजा करणं, भोजनं घालणं, विशिष्ट सणांना मिष्टी आणणं वगैरे गोष्टी होतात असं गृहित धरतो. थोडक्यात त्यातलं सुमारे निम्म्याहून अधिक सांस्कृतिक/उपभोज्य आणि उरलेलं धार्मिक/श्रद्धाद्धिष्ठित मानायला हरकत नाही. असाच हिशोब लावायचा तर अगदी स्थूलमानाने वर्षाला 1000 रुपये दर घरटी धार्मिक खर्च मानता येईल. तो त्या काळच्या उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे 1% आहे. एकंदरीत भारतातले लोक धर्मासाठी सुमारे एक-सव्वा टक्का उत्पन्न खर्च करतात या माझ्या अंदाजाला पुष्टीच मिळते.

बाकी देवस्थानांचं उत्पन्न 'लाखो कोटी' असतं याबद्दल मी साशंक आहे. भारताचं जीडीपी साधारण 4 कोटी कोटी रुपये इतकं आहे. त्यातलं सर्वाधिक उत्पन्न आहे सर्वात मोठ्या पाचदहा हजार कंपन्यांचं. त्या उत्पन्नाच्या दशांश टक्क्यापेक्षा जास्त खर्च धर्मावर करत नाहीत. सरकारचं उत्पन्न जीडीपीच्या 20 टक्के असेल. तेही जेमतेम कवड्या खर्च करतं. त्यामुळे 'लाखो कोटी' ही अतिशयोक्ती वाटते, 'हजारो कोटी' सहज शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीडीपी वगैरे शब्द फारच अमूर्त आहेत. ते समजत नाहीत.

( गब्बर आता येणार नाही असं वाटलं मला ८-९ तारखेच्या झालेल्या संवादातून, आइवरी टावर रिकामा पडला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Sad होय मलाही तसेच वाटते. मी फेसबुकवर एक मेसेज पाठवला पण उत्तर शून्य!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

आमच्या पुण्यात फुकटात पुण्य कमवायचे हजारो मार्ग आहेत. तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, ओंकारेश्वर, कसबा प्रभृति मंदिरांत फुकटात जाता येतं. बडवे नसतात. दर्शन मिळतं वर दृष्टिसुखही. त्यामुळे माझ्यासारखा माणूस शून्य खर्चात साता जन्मांची पुण्याई कमवतो!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हाहाहा पुण्यात रहायला खरच पुण्य लागतं. आय मिस पुणे SadSad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

उत्तर अर्थातच शून्य टक्के.
पण या आधीच्या वर्षांत, जी वर्गणी सक्तीने द्यावी लागली, त्याचा समावेश मी पन्नास टक्क्यांतही करणार नाही. कारण, आमच्या कुटुंबाला काही त्रास होऊ नये, खाली पार्क केलेल्या गाडीचे, कुणी नुकसान करु नये, म्हणून दिलेली ती खंडणी होती.
काही वर्षांपूर्वी, मी चारधाम बघून आलो. त्या ट्रीपचा खर्चही मी यांत धरणार नाही, कारण तिथे मी वा माझ्या कुटुंबाने, कुठलाही धार्मिक विधी केला नाही की दानपेटीत, एक पैसाही टाकला नाही. उलट, केदारनाथला गेल्यावर सगळे ज्या मंदिरात जातात, त्याला वळसा घालून, मागच्या बाजूचे फोटो काढायला प्रथम गेलो. देवळांत आंत गेलो पण खर्च केला नाही. प्रत्येक ठिकाणची मूर्ती मात्र अगदी नीट निरखून पाहिली. आणि ती निरखेपर्यंत वेळ मिळावा आणि ऑड मॅन म्हणून ओळखले जाऊ नये, म्हणून हातही जोडले, पण त्यामागे भाव शून्य होता!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

+१०० सहमत आहे.

गेली चार वर्षे सोसायटीचा सेक्रेटरी असल्याने सर्व "सांस्कृतिक" कार्यक्रम आयोजित करतो. गणपती समोर देवीसमोर आरती करतो. सत्यनारायणाच्या पूजेला हजर राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्व आयोजन करून दिले आहे चारपाच वर्षं पण चौरंगापुढे फक्त पेढे उचलण्यापुरता जातो. प्रसादाचे महत्त्व पटले असल्याने तो ग्रहण करतो. होय महाराजाच्या वेळेस केटरिंगवाल्याकडे जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केदारनाथ भेट , मला असाच विचार भीमाशंकरला पडू शकतो. पण दुसऱ्या आतल्या कप्प्यातून आवाज येतो की अरे हे देऊळ आहे,भाविक सतत येतात त्यामुळे वाहने,हॅाटेले आहेत. तुझी राहण्या जेवणाची सोय होते. अन्यथा ही भटकंती अवघड झाली असती.
थोडक्यात इथे होणारा खर्च मौजमजा न म्हणता धार्मिकच झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयाला अनुलक्षून मला दोन तीन गोष्टी आठवताहेत.
एक, बहुधा आशा बगे यांची कथा होती, एका बिहारी कामवाल्या बाईच्या उपासतापास करून आबाळ करून घेऊन आजारी पडणाऱ्या आणि वर व्रत पूर्ण करू न शकणं हे आपलंच पुण्य कमी पडलं म्हणून स्वतःलाच दोष देणाऱ्या बाईची.
दुसरी कथा होती की शाळेतल्या बाईंच्या तोंडून ऐकलेली त्यांच्या कामवालीची गोष्ट, ती अशी की आधी ती बाई तुळशीपत्रं इ. गोळा करत हिंडायची आणि देवाला नेमाने एक हजार एक पत्री वाहायची वगैरे. मग तिची कामं वाढली आणि तिने या गोष्टींवरचा वेळ कमी केला.
त्यावरून अलीकडे देऊळ सिनेमातही गिरीश कुलकर्णीचं पात्र त्याच्या आईला – ज्योती सुभाष – विचारतं, तू देवदर्शनाच्या वस्तू विकायला लागल्यापासून किती वेळा स्वतः देवळात गेलीस, शेवटचं कधी गेली होतीस वगैरे.
अंधश्रद्धा, मर्यादित श्रद्धा, सवडीची श्रद्धा, श्रावणातल्या कथांत ऐकलेली खुलगाभर दुधाची गोष्ट, आणि कोणत्याही देवळात तासतास रांगा लावून विकत घेतलेलं समाधान, नामस्मरणात, भजनी मंडळांत घालवतात तो वेळ... केवढा तरी पट आहे धार्मिक असण्याचा. त्यात आर्थिक खर्चाबरोबरच धार्मिक कर्मकांडावर – देवळात जाण्यासकट - किती काळ खर्च होतो आणि तो वेळ व/वा पैसा अर्थार्जनाच्या कोणत्या टप्प्या आधी किंवा नंतर निव्वळ प्राथमिकता बनतो हेही पाहायला पाहिजे.
Oh My God सिनेमात श्रद्धेच्या बाजारावर चांगला प्रकाश पाडला आहे. त्यात 400 कोटीची विमारकमेची Act of God या सबबीखाली नाकारलेली देणी कानजी लालजी मेहता खटला भरून जिंकतो. शेवटी सर्व धार्मिक स्थळे मिळून ते पैसे द्यायचं ठरवतात आणि अर्धांगवायूचा झटका येऊन कोमात गेलेल्या कानजीलाच देवत्व बहाल करून एका वर्षात 450 कोटी वसूल करण्याचा घाट राजकारणी व सर्व धर्माचे धुरीण घालतात.
ऋण काढून सण साजरा करण्याची वृत्ती दिसते तशी ऋण काढून देवधर्म करण्याची वृत्ती दिसत नाही ही त्यातल्या त्यात बरी बाब म्हणायची (की हा माझा गैरसमज आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला. पैशांपलिकडे काही गोष्टी असतात हा मुद्दा पटला.

मात्र त्याचबरोबर 'आजकाल धर्माचं अवडंबर माजलं आहे.' या विधानात या वैयक्तिक श्रद्धा आणि त्यांसाठी घेतलेले कष्ट यांऐवजी त्यावर होणारी उधळपट्टी, झगझगाट आणि दणदणाट यांचीच उदाहरणं दिली जातात. म्हणून मूळ प्रश्न, की खर्च होऊन होऊन होतो किती? कारण हा झगमगाटाचा खर्च दिसतो, डोळ्यावर येतो. घरातले लोक दिवसातनं दोन तास भजन, कीर्तन, देऊळ, ध्यान, प्रार्थना याऐवजी फेसबुक-ट्विटर करत आहेत हा फरक दिसत नाही. माझ्या मते आपण काहीतरी व्यक्तीगत देवपूजेत तल्लीन होण्याऐवजी ते कष्ट आउटसोर्स करून उत्सव घडवून आणण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. याला धार्मिकता वाढली आहे म्हणायचं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या वैयक्तिक श्रद्धा आणि त्यांसाठी घेतलेले कष्ट यांऐवजी त्यावर होणारी उधळपट्टी, झगझगाट आणि दणदणाट यांचीच उदाहरणं दिली जातात.

दणदणाटामुळे हृदयविकाराचा झटका येऊन माणसं मरतात, आजारी पडतात, वगैरे. तो खर्च, अर्थव्यवस्थेचं नुकसान यात मोजणार का कसं?

गणपतीच्या मंडपांमुळे रस्त्यांना खड्डे पाडले जातात. ट्रॅफिक अडकून खोळंबा होतो. या सगळ्यात अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल दसऱ्याची सुटी होती त्या निमित्त काही आप्तांना बोलावून जेवणाचा बेत केला. सुट्टी दसऱ्याची होती (म्हणजे धार्मिक). पण जेवू घालणारे आणि जेवणारे यांचा धर्माशी काही संबंध नाही. जेवणात बाजारातून काही पदार्थ आणले होते. सुमारे २०० रु नेहमीपेक्षा जास्त खर्च झाले. हे धार्मिक की सांस्कृतिक की सामाजिक खर्चात धरणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

1. देवळाच्या दानपेटीत टाकलेले पैसे - 100% धार्मिक खर्च- शून्य
2. ज्योतिषाला दिलेले पैसे - 100% श्रद्धात्मक खर्च- शून्य
3. देवाला/देवीला बोललेल्या नवसासाठी केलेला खर्च किंवा शारीरिक ताप - जवळपास 100% धार्मिक/श्रद्धात्मक खर्च- काकूने बोललेला नवस ती बेडरिडन झाल्याने फेडू शकत नव्हती म्हणून मी गावी जाऊन देवीला अभिषेक केला. खर्च - प्रवासखर्च धरून सुमारे १० हजार रु, (७ माणसे).
4. कुठच्यातरी सणासाठी पुजारी/उपाध्याय बोलवून विधी करण्यासाठी दिलेली दक्षिणा - 100% धार्मिक/श्रद्धात्मक खर्च- शून्य
5. लग्न/मुंज इत्यादी संस्कार - त्यातला पुरोहिताचा खर्च धार्मिक, पण इतर समारंभाचा खर्च 90% - 95% अधार्मिक- मी कोणाचे लग्न अजून लावले नाही. त्यामुळे अजून तरी शून्य. पुढे मुलीचे लग्न करायची वेळ आली तर भटजीचा खर्च होईलच.
6. सोसायटीच्या गणपती उत्सवासाठीची वर्गणी - ही टक्केवारी काढणं कठीण आहे. सुमारे 50% धार्मिक धरायला हरकत नाही.- सरासरी १०० रु दरवर्षी- ही मी सेक्रेटरी नव्हतो तेव्हाही देत असे.
7. धंद्यातली वधारी, निकटवर्तीयांचा दुर्धर रोग यासाठी बुवा/बाबा यांना दिलेले पैसे - 100% धार्मिक/श्रद्धात्मक- शून्य
8. सत्यनारायणाची पूजा - पुजाऱ्याचा खर्च 100% तर इतर खर्च साधारण 10% धार्मिक/श्रद्धात्मक- शून्य
9. एखाद्या तीर्थयात्रेचा खर्च - साधारण 20% प्रवासखर्च, आणि तिथल्या विधींसाठीचा खर्च 100% धार्मिक.- शून्य (सॉरी चिपळूणला जाताना एकदा परशुराम मंदिरात १०० रु दिले).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विषयाला सोडून प्रतिसाद दिल्याने ट्रोल झाले आहे माझे.
पुढे चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0