अज्ञाताचा गड चढताना

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी येते
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतीस्तव बसते
उठून, गड बेलाग लांघण्या, पुन्हा कंबर कसते
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढते

जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे अपूर्व दर्शन घडते

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे अपूर्व दर्शन घडते

हे म्हणजे थोडसं असं झालं की हरवलेली वस्तू नेहमी शेवटच्या क्षणीच सापडते.
.
क्षण शेवटचा बनतो कारण साहजिकच तेव्हा वस्तू सापडलेली असते.
_______________
तद्वतच लखलखते दर्शन घडल्याशिवाय विवेकवाद/बुद्धीवादाची वाट संपतच नाही.
जसे विवेकानंद हे बुद्धीवादी होते परंतु रामकृष्ण् परमहंसांनी त्यांना बुद्धीपलिकडील अगम्याचे दर्शन घडविले व म्हणुन त्यांचे समाधान झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0