आम्हांला सोडून ..........................

ही कविता शेतकरी आत्महत्या या विषयाशी संबधित आहे. जेव्हा एक शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळी त्याच्या घरातील माणसाची स्थिती काय होते ? हे दर्शविणारी ही कविता आहे

आम्हांला सोडून तू गेलास
मागे आठवणींच गाठोड ठेवुन
तुझ्या हट्टापायी तु ओढावलस
अन मागे सगळ्यांना रडवलसं ।। १।।

प्रत्येक फोटोत तू दिसतोस
मात्र गप्प गप्प राहतोस
आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना
अश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।। २।।

तुझ्या अशा अवचित जाण्याने
जगाचं खरच काय गेलं
तुझ्या घरातल्या माणसाच जीवन
मात्र दुष्काळी रान झालं ।। ३।।

तुझ्या आठवणीने मन माझं
शोकसागरात सुन्न झालं
मनात दडवलेल्या शब्दांना जणु
मी आज मोकळ केलं ।। ४।।

कवी :- योगेश रामनाथ खालकर
पंचवटी - नाशिक

field_vote: 
0
No votes yet