मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन

सद्य:स्थितीत बालसाहित्य हे मराठी साहित्यातील सावत्र बाळांपैकी एक. मराठी बालसाहित्याकडे बघितलं तर सध्या काय दिसतं? एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का? ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का? तर माझ्या मते नाही. मुलांवर माहितीचे डोंगर ओतायला किंवा त्यांना आयते तथाकथित संस्कार पाजायला सगळे सज्ज आहेत पण मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांच्यासाठी चित्र, कला, कथा, कविता, गाणी, गोष्टी, खेळ यांद्वारे त्यांच्यासाठी किती निर्मिती होते?

आता यावर नुसते लेख लिहून किंवा फेसबुक पोस्ट टाकून काही होणार नाहीये हे पुरं जाणून आहे - तुम्हीही जाणून आहात. याच विचारांतून या (२०१८च्या) बालदिनाला लहान मुलांसाठी केलेले लेखन प्रकाशित करणार्‍या एक वेबसाइटची घोषणा केली आहे. डोमेन-नेम बुक केलं आहे (www.atakmatak.com) आणि तांत्रिक काम लगोलग चालू झालं आहे. शक्य तितक्या लवकर ही साइट सुरू करण्याचा मानस आहे.

शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी वाचायला/बघायला देण्यासारखे लेखन/दृक्-श्राव्य फिती/खेळ वगैरे बाबी या साईटवर प्रकाशित करायची इच्छा आहे. साइटची कल्पना थोडक्यात सांगायची, तर समकालीन, उदारमतवादी, लिंगाधारित साचे न मानणारं, नवं ताजं, मुलांना आपलं वाटेल असं काही मराठीतून मुलांना मिळावं - मिळात रहावं यासाठी ही साइट असेल.

एकीकडे तांत्रिक काम करताना, इथे दर्जेदार बीजलेखनाचे आवाहन करत आहे. या दृष्टीने तुमची मदत हवी आहे. त्यासाठी काही सूचना:
१. ही वेबसाइट वेगवेगळ्या वयोगटांच्या मुलांसाठी साहित्य प्रकाशित करेल. मुलांबद्दलचे किंवा बालसंगोपन/विकास/पालकत्व वगैरे विषय या साइटच्या कक्षेबाहेर असतील.
२. सदर लेखन/दृकश्राव्य ध्वनिफिती / चित्रफिती (क्लिप्स) monitor.atamatak@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात.
३. शब्दसंख्येची/ आराखड्याची (फॉर्मॅटची)/माध्यमाची मर्यादा नाही. एखाद्या शालेय वयोगटाच्या मुलांना आवडेल/समजेल अशा भाषेत काहीही चालेल.
४. पाठवाल त्या लेखनावर संपादकीय संस्कार होतील ह्याची नोंद घ्यावी.
५. मुलांची साइईट म्हटली, की चित्रांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. तुम्हाला चित्रकलेत गती आणि लेखनानुरूप चित्र काढण्यात रस असल्यास तुमचं स्वागत आहे.

पाठवलेले प्रत्येक लेखन साइटवर येईलच असे नाही. मात्र लेखन पाठवल्याच्या १५ दिवसांत ते स्वीकारले आहे, की नाही ते कळवू.

या लेखनासाठी/चित्रांसाठी आर्थिक मोबदला ताबडतोब देणे शक्य नाही, पण पुढेमागे व्याप्ती वाढल्यास त्याचाही विचार करता येईल. मग, करताय ना मदत?

सध्या लगेच लेखन पाठवू शकत नसाल, तरी दोन प्रकारे मदत करू शकता:
१. आमच्या फेसबुक पेजला लाइक करा व त्या पेजचा फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे प्रसार करा.
२. साईटचं बोधचिन्ह (लोगो) अजूनही ठरवलेला नाही. तुमच्या डोक्यात एखादा लोगो/कल्पना असेल तर कच्चं रेखाटन, वा त्याचं छायाचित्र वरील इमेल पत्त्यावर धाडा.

याबद्दल अधिक बोलायचे असेल तर मला व्यनिमधून संपर्क करू शकता.

सदर आवाहन प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल ऐसी प्रशासनाचे आभार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमचे संस्थळ सचित्र करण्यास मदत करू शकेन. मराठी हस्ताक्षर, सुवाच्य कसे लिहावे इ.वर सचित्र लिखाणही जमेल. पण बालसाहित्य अगदीच हद्दीपलिकडची बाब. असो. तुमच्या कार्यास अनेक शुभेच्छा.
--
आर्थिक मोबदल्याची अपेक्षा (सध्यातरी :P) नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

अनेक आभार. संस्थळ सचित्र करण्यापासून लेखनापर्यंत सगळ्याच मदतीचे स्वागत आहे आणि आवश्यकताही आहे. लवकरच संपर्क साधतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे मस्तच उपक्रम. हृषिकेशा तू आधी बोललेलास तसे करत आहेस ह्याचा आनंद आहे.
बरंच म्हणजे बरंच काही करु शकेन पण आर्थिक मोबदल्याशिवाय सध्या काहीच करणे जमणार याचे सध्या प्रचंड दु:ख आहे. फक्त शुभेच्छा सध्या देतोय. येत्या काळात काही चांगले घडले माझ्या व्यवसायाच्या बाबतीत तर अवश्य करेन अटकमटकसाठी काम. शुअर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!
हर्कत इल्ले! येत्या काळात तुझ्या व्यवसायाला भरभराट येऊन आम्हाला वेळ देउ शकावास (आणि त्याचबरोबर आम्हीही कामाचा योग्य आर्थिक मोबदला देण्याइतके काही घडो Wink ) अशी सदिच्छा! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उपक्रमासाठी शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी माध्यमासाठी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. या साईटवर लेखन/ डिजिटल साहित्य केवळ मराठीतून असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेशपंत , आपण नेहमी काही तरी नवीन विधायक करायचा प्रयत्न करत असता . अभिनंदन आणि तुमच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिकेशपंत , आपण नेहमी काही तरी नवीन विधायक करायचा प्रयत्न करत असता . अभिनंदन आणि तुमच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा !!

तंतोतंत असेच म्हणतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप चांगला उपक्रम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

आताची मराठी माध्यमातील शिकणारी मुलं केव्हा इंटरनेटकडे धाव घेतात आणि कोणत्या गोष्टींबद्दल उत्सुकता असते ?
अभ्यास/करमणुकीसाठी?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मर्यादित शहरी सर्कलमधील मुलांची मराठीतून ललित करमणूक (कथा, कादंबऱ्या, कविता, गाणी) उपलब्ध नसण्याची मोठी तक्रार आहे. विशेषत: किशोरवयीन मुलांची. त्यात लिंगभेद नसलेले किंवा हल्लीच्या मुलींच्या नजरेतून लिहिलेले किंवा समकालीन नैतिकतेचे भान असणारे बालसाहित्य मराठीत कोणत्याही वयोगटासाठी दिसलेले नाही.

जे बरे म्हणावे असे ललित साहित्य आहे (आवाहनात म्हटलेली बेटं) ती सुद्धा मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणातील शहरी ममव मुलांना डोळ्यासमोर ठेऊन केलेली निर्मिती आहे. बाकी बहुतांश मुलांसाठी काही लोक जमेल तितकं काम करताहेत पण व्यावसायिक निर्मिती शुन्यवत आहे.

अवांतर/समांतर: भागवत अंकातील अमृतवल्ली यांचा इदं न मम हा लेख यासंदर्भात खूप बोलका ठरावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खूप चांगला उपक्रम __/\__

शुभेच्छा !!

मी लिहीलेल्या काही कथा मेल करेन. मानधनाची अपेक्शा आत्ता तरी नाहीये Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार .वाट पाहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नमस्कार .
मी ईशान पुणेकर .
(हे माझे टोपण नाव आहे .
बालसाहित्य मी या नावाने लिहितो. )
लहान मुलांसाठी गेली खूप वर्षे लेखन करतोय .

मला अटक मटक साठी लेखन करायला नक्की आवडेल ..

मी नवीन लेखन तर करीनच पण
जे अगोदर प्रकशित झाले आहे ते ही देण्याची इच्छा आहे .
कृपया कळावे .

सस्नेह
बिपीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडी वर मेल जात नाही . कृपया कळावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही दिवस वैयक्तिक कारणाने इथे डोकावले नव्हते. इमेल चालू आहे, बघायला वेळ झाला नव्हता. आता बघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॅाडकास्ट? गोष्टी ऐकवणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे घोषित करण्यास आनंद होतोय की १ जानेवारी रोजी अटकमटक.कॉम ही साईट सुरू झाली आहे. ठराविक वेळेच्या अंतराने इथे धागे प्रकाशित होत रहातील. आपल्या घरांतील मुलांना यातील लेखन जरूर वाचायला द्यावे व प्रतिक्रिया कळावाव्यात ही विनंती.

त्याचबरोबर परिचित, नातेवाईक यांच्याद्वारे या साईटबद्दल प्रसारास हातभार लावावा असे आवाहन करतो.

साईट प्रकाशित झाली असली तरी वरील लेखन/चित्र आदीबद्दलचे आवाहन लागू आहे किंबहूना अधिक महत्त्वाचे झाले आहे. याची नोंद घ्यावी Smile

साइटचा पत्ता: www.atakmatak.com

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान आहे साइट. पक्ष्यांची माहिती देणारी मालिका सर्वांसाठीच ज्ञानात भर घालणारी असणार असं वाटतं. माहिती ऐकवलीय हे विशेष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0