ही बातमी समजली का? - भाग १८९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
---
आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
योग्य.
ते बाळ अंदमानमधली आणखी एक आदिवासी जमात जारवा जमातीतलं आहे. अंदमान-निकोबारच्या आदिवासींबद्दल मधुमाला यांनी काम केलं होतं.
मधुमाला स्त्री असल्यामुळे सेंटिनली आदिवासींना तिच्यावर, आणि तिच्या टीमवर विश्वास ठेवणं सोपं गेलं, असा उल्लेख दुव्यात आहे. एरवी इतर लोकांकडे शत्रू म्हणून पाहणाऱ्या आदिवासींना शत्रुत्व वाटू नये, यासाठी तिनं काय केलं याचंही वर्णन लेखात आहे. या पार्श्वभूमीवर 'त्यांना मदत करूनच सोडेन' छापाची डायरीनोंद करणारा अमेरिकी चू बाणानं मेला, ही गोष्ट मुद्दाम नोंदवून ठेवण्यासारखी.
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत ~~>>
अमची महत्त्वाकांक्षा लघुतमकांक्षा चानेल ओनर होण्याची नसते. मालिकांपुरते उरलो आम्ही. हमो मराठेच्या 'एक लेखक एक दिवस'मध्ये फिरोदिया म्हणतात तुमचे लोक ~~~~. " होण्यास मागत नाहीत.
पुलंवरून पेटायचं कारण नाहीच. आजही कोणताही प्रकाशक पुलं आणि अध्यात्म पुस्तक प्रकाशनात हात घालायला तयार असतो हेच मिशेलिन स्टार.
बाकीच्या आताच्या सक्षम लेखकांनी मालिका पकडल्या. मांडलेकर,दरडे .
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत
>>>इथं लोकं पुलंवरून पेटलीहेत ~~>>
अमची महत्त्वाकांक्षा लघुतमकांक्षा चानेल ओनर होण्याची नसते. मालिकांपुरते उरलो आम्ही. हमो मराठेच्या 'एक लेखक एक दिवस'मध्ये फिरोदिया म्हणतात तुमचे लोक ~~~~. " होण्यास मागत नाहीत.
पुलंवरून पेटायचं कारण नाहीच. आजही कोणताही प्रकाशक पुलं आणि अध्यात्म पुस्तक प्रकाशनात हात घालायला तयार असतो हेच मिशेलिन स्टार.
बाकीच्या आताच्या सक्षम लेखकांनी मालिका पकडल्या. मांडलेकर,दरडे .
अजिनोमोटो ऊर्फ मोनोसोडियम
अजिनोमोटो ऊर्फ मोनोसोडियम ग्लूटामेट हा पदार्थ कसा तयार करण्यात आला त्याचा अति जबरदस्त इतिहास.
https://qz.com/quartzy/1477172/the-persistent-racist-myth-of-chinese-re…
त्यातून हे कळालं की अजिनोमोटो हे त्या पदार्थाचं नाव नसून त्या पदार्थाच्या जगातील नंबर १ उत्पादक कंपनीचं नाव आहे. झेरॉक्स वगैरेसारखाच प्रकार.
लय भारी, अवश्य वाचा.
हाहाहा!
भारतीय संडासच भारी!
https://www.theguardian.com/news/2018/nov/30/bowel-movement-change-the-…
The renowned Mayo clinic is now conducting a randomised controlled trial to see whether the Squatty Potty can ease chronic constipation, which afflicts some 50 million Americans, most of them women, many over 45 years old.
भारतीय संस्कृती --> १ पाश्चात्य संस्कृती --> ०
भारतीय संस्कृती?
मुळात ज्याला तुम्ही "भारतीय संडास" म्हणता (किंवा इंग्रजीत ज्यास squat toilet अशी संज्ञा आहे), त्यात quintessentially "भारतीय" असे काहीही नाही. त्याचा उद्गम अथवा विस्तार दोन्ही "भारतीय" नाही.
मुळात ही संकल्पना सार्वजनिक ठिकाणचे संडास बांधण्याकरिता म्हणून squat toilet इंग्लंडात/युरोपात उद्गम पावली. आजमितीस युरोपात ते कितपत आढळतात याबद्दल कल्पना नाही, परंतु तुरळक आढळत असावेत असे विकीमजकुरावरून वाटते. (तसे क्वचित अमेरिकेतही आढळतात असेही विकीवर वाचल्याचे आठवते; मात्र, आजतागायत अमेरिकेत निदान मी तरी एकही पाहिलेला नाही. असो.)
मात्र, खुद्द युरोपात त्यांची व्याप्ती सार्वजनिक संडासांपुरतीच मर्यादित असो वा आजमितीस अजिबातच नसो, आशियात मात्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला, असे कळते. मध्यपूर्वेपासून ते पार जपानपर्यंत (पक्षी: केवळ हिंदुस्थानातच नव्हे.) हा प्रकार घरगुती संडास म्हणून सर्रास प्रचलित आहे, असे विकी सांगतो.
सबब, हा गोल भारतीय संस्कृतीच्या नावावर नमूद करणे उचित ठरणार नाही, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
इत्यलम्|
१९९६ साली सिंगापूरला गेलो
१९९६ साली सिंगापूरला गेलो होतो तिथे फॅक्टरीत दोन्ही प्रकारचे संडास होते. फरक इतकाच की आपल्याकडे वॉटर ट्रॅप असतो त्यात पाणी (पॉटच्या) मागच्या भोकातच राहते. तर सिंगापूरच्या संडासात ते जिथे आपण पो टाकतो तो भाग पाण्याखाली झाकला जाईल इतके होते. त्यामुळे बहुधा पो पॉटला चिकटण्याची शक्यता रहात नाही. पण आत बसलेल्याला मात्र ते विचित्र वाटते कारण पो एका जागी न राहता इकडे तिकडे हलतो.
फीचर की बग?
अहो ते फीचर नसेल बग असेल... तुंबला असेल तो संडास. सिंगापूरचा असला म्हणून काय झाले?
(पण... पण... पण... सिंगापूर तर जागतिक संडास संघटनेचे मुख्यालय की कायसेसे आहे ना?)
महागडे चित्र
खफवरून इकडे
//
आचरटबाबा
रविवार, 02/12/2018 - 11:44
मागच्या महिन्यात एक(वॅाटरकलर?) चित्र ९०मिलिअन डॅालरसला क्रिस्तीने विकलं. मॅाडन आर्टवगैरे नाहीये. चित्रकार हयात आहे.
चित्र : स्विमिंग पुलात एकजण पालथा पोहतोय पांढरऱ्या चड्डीत, एक बाई काठावर उभी राहून पाहतेय. त्याची आई असावी.
अभ्याचं मत काय?
चिंतातुर जंतू
रविवार, 02/12/2018 - 14:45
आचरटबाबा तुम्ही बहुधा ह्या बातमीबद्दल बोलताय. ते दोघेही पुरुष आहेत आणि चित्रकार (डेव्हिड हॉकनी) गे आहे.//
आता आठवलं मी ही बातमी France24 चानेलवर पाहिली होती. ( चित्र पटकन दाखवलं होतं.) "हयात असलेल्या चित्रकारांच्या चित्रांना मिळणाऱ्या किंमतींत सर्वोच्च."
डेव्हिड हॉकनी
मागच्या महिन्यात एक(वॅाटरकलर?) चित्र ९०मिलिअन डॅालरसला क्रिस्तीने विकलं. मॅाडन आर्टवगैरे नाहीये. चित्रकार हयात आहे.
डेव्हिड हॉकनी सुप्रसिद्ध आहे. किंबहुना हयात चित्रकारांपैकी सर्वात प्रसिद्धही म्हणता येईल. त्यातही पोहण्याच्या तलावाची त्याची मालिका सुपरिचित आहे. त्यापैकी 'अ बिगर स्प्लॅश' हे आता अनेक ठिकाणी ज्याचा संदर्भ घेतला जातो असं iconic चित्र आहे. त्याविषयी अधिक इथे आणि त्याच्या स्विमिंग पूल चित्रांविषयी अधिक इथे.
हे मॉडर्न आर्टच मानलं जाईल.
संडास हा चावून चोथा झालेला
संडास हा चावून चोथा झालेला विषय ( सर्व कोट्या धरून) आहे पण तरीही महत्त्वाचा आहेच.
दोन पावलावर हे फार सुरक्षित स्वच्छ असते. रेल्वेत वर्तमानपत्र (जुने, वाचण्यासाठी नाही) न्यावे लागते. दार उघडल्यावर समोर कोणता संडास येईल सांगता येत नाही. पेपरची फायरवॅाल कुणाच्या मांडीची *** आपल्या *** लागू नये म्हणून. पण पण बायो संडास आल्यापासून तो कागद खाली ढकलता येत नाही. थोडक्यात समबडी शुड गेट डाउन टु ब्रास टॅक्स.
टंबलर, यू टू!
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वगैरेंनी आधीच केलेली गोष्ट अखेर आता टंबलरनंदेखील केली आहे -
Tumblr will ban all adult content on December 17th
अडाणी पाण्यात देव घालून?
अडाण्यामागचा दुर्दैवाचा फेरा काही संपत नाही.
Court challenge launched over minister's 'flawed' decision on Adani water trigger
Water is precious on our dry continent, yet Adani wants to take billions of litres of river water every year – nearly as much as all local farmers combined.
अंदमानमधले आदिवासी
अंदमानमधले आदिवासी,पर्यटकांच्या सोयीसाठी विकास इत्यादि सन्डे एक्सप्रेसमधला लेख
ख्रिस्तिएन मिशेल आणि दुबईची राजकन्या
https://timesofindia.indiatimes.com/india/how-a-prince-runaway-princess…
गेल्या आठवडयात ओगस्ता वेस्टलंड प्रकरणातला दलाल च्रिस्तिएन मिशेल ला युएईने भारताच्या स्वाधीन केल. हे करण्यासाठी भारतीय कोस्ट गार्डने घरातुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युएईच्या एका राजकन्येला पकडुन तिच्या बापाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर मिशेलला भारताच्या ताब्यात देण्यात आलं.
सो.गा / रा.गा विरुद्ध का दलाल साक्ष देईल अशी अपेक्षा आहे.
मराठा आरक्षणाविरोधात याचिकाकर्त्यावर हल्ला
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला
शोधा रे कोणीतरी...
https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/rbi-gove…
उर्जीत पटेल कसे inefficient होते, काँग्रेस बरोबर कशी हात मिळवणी केली होती, त्यांच्या आजोबांची / पणजोबांची एकदा नेहरूंबरोबर भेट झाली होती ... शोधा काहीतरी पटकन ...
अब कहा है पालिटिकल पंडित
निकालांच्या दिवशी दिल्लीत एक सभा होत असते आणि बोलणारे साहेब "अब कहा है पालिटिकल पंडित" असं साऱ्या दुनियेभरचा राग चेहऱ्यावर ठेवून विचारत असतात. आज ती सभा सुद्धा झालीच नाही वाटतंय. मी वाट बघत होतो ...
करतारपूर नेहरूमुंळे पाकिस्तानात गेलं, हे त्यांच्या जाण्याच्या ५५ वर्षानंतरही एका पक्षाचा प्रचार असतो. इंदिरा गांधी जाउन ३५ वर्षांनंतरही त्यांनी काय केलं होतं हा त्याच पक्षाचा प्रचार असतो. आता किती दिवस हा असाच प्रचार ऐकणं नशिबात आहे त्या काशीच्या महादेवाला माहित. काशी कोणाचा मतदारसंघ आहे कायनू. आपल्या पक्षाने काय काम केलं हेही प्रचारात सांगता येतं हे कोणी तरी हळूच कानात सांगायला पाहिजे त्या साहेबांच्या.
विनोदबुद्धी
एरवी कर्कश आरडाओरडा करणारे भक्त आणि 'काँग्रेसच्या विधवा' किंवा तत्सम हिणकस गोष्टी भकणारे पंप्र आणि त्यांचे चेले यांच्याबद्दल चकार शब्द न काढणारे न-भक्त, या सगळ्या लोकांबद्दल माझं काहीएक म्हणणं नाही. मात्र एक फेसबुकपोस्ट आवडली.
राको आणि मित्र छोटा डॉन यांनी फेसबुकवर लिहिलंय -
I hate facebook algorithms.
It is showing all posts of Congress winning since today morning, not showing single post of BJP winning on my feed.
ते कळले हो! पण...
गेले काही महिने, ह.पा. नेहरूंच्या नावावर बिल फाडण्याचे प्रकार सुरू होते, विशेषतः निवडणूक-प्रचारसभांमध्ये.
हे नेमके कधी होत नव्हते?
बोले तो, निवडणूक प्रचारसभांमध्ये हा प्रकार नवीन असेलही कदाचित, परंतु या विशिष्ट गोटात एनीथिंग अँड एव्हरीथिंग दॅट इज़ (पर्सीव्ह्ड टू बी) राँग विथ इंडिया, त्याचे बिल नेहरू-गांधी घराण्यावर फाडण्याची परंपरा अगदी अनादि काळापासून नाही, तरी गेला बाजार नेहरू (/नेहरू-गांधी घराणे) असल्यापासून आहेच की. त्यात नवीन ते काय?
अगदी पार नेहरूंनी काश्मीर प्रश्न यूनोत नेल्यापासून ही बोंब चालू आहे.
मला लहानपणी डबल डेकर बसचे फार
मला लहानपणी डबल डेकर बसचे फार अप्रुप होते. जे मी भरपूर उपभोगले. पण एक राहिलंच. एक सिंगल आणि एक डबल अशा दोन बशी फोर्टात कोर्टाच्या पुढे कुठेतरी उभ्या असायच्या ( बहुतेक टेलि कम्यु टावर इमारतीसमोर?) त्यात कँटिन होते आणि त्यात बसून खायचे होते. पण बाबा म्हणायचे अरे ते फक्त बिएसटीच्या डायवर कंडक्टरांसाठी आहे.
मला डबल डेकर बस बघायला, प्रवास करायला ( वरती पुढच्या शिटवर) फार आवडतं.
( लघुनिबंध संपला.)
मलाही
अजूनही डबलडेकरच्या सगळ्यात पुढच्या शिटेवर बसण्यासारखं दुसरं सुख नाही. सांताक्रूझ ते कुर्ला (आणि उलटही) ३१३ नं. बस अजूनही डबलडेकर आहे. ही बस फ्लायओव्हरवरुन वगैरे जात असल्याने अजूनच मज्जा. तशीच कुलाब्यालाही, बहुतेक ३ नं. असावी. ही कँटीनवाली बस पाहिलेली नाही. शोधायला पाहिजे.
या बशीचा म्हणजे टपले नसलेल्या
या बशीचा म्हणजे टपले नसलेल्या बशीचा - इनका भी बडा नाम है। क्रिकेट,फुटबॅाल टीम जिंकल्यावर याच्या डेकावरूनच मिरवणूक काढतात॥
प्राइवेट वाहन म्हणून महागड्या गाड्या असतील पण डडे बस नसते.
पर्यटन - शहरफेरीसाठी हीच बरी. आता जर्मनीने रस्त्यावरून पाण्यात पोहणारी तयार केली आहे तशी मुं मनपाने घेतली आहे म्हणतात पण डॅाकच मिळत नाही. चालायचंच.
लोक वाढदिवसाला बुक करतील, केक कापत फिरवतील शहरात, समुद्रात -
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
छोट्याछोट्या गमतीत लपलेलं असतं.
दोनचार टकले ग्यालरीतून पाहून आपल्याला हात करतील, त्यानाही हाय!!
डब्बल डेकर
सिप्झ ते अंधेरी स्टेशन अजून ही डबल डेकर चालते. काही २०३ (पोयसर आगार ते जुहु चौपाटी) आहेत. एकदा मी आणि मयत्रीण कयानी मधून बाहेर पडलो आणि दादर ला जायला टॅक्सी शोधत होतो, समोर सिग्नल वरून सुट्लेली वरळी ची बस दिस्ल्यावर त्यामागे वेड्या सारखे धावून पकडून वरळी ला गेलो. फक्त वर्च्या मजल्यावर बसून मुंबई पहायच्या वेडेपणासाठी... :) महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी मस्त दिसलं.
कॉलेज ला असताना पावसात त्या वरच्या सीटवर बसून मस्त पाऊस अंगावर घेउन येण्यासाठी मी आणि माझ्या मित्राने बस स्टॉप वर दिड तास डबल डेकर ची
वाट पाहण्याचा शहाणपणाही केलाय.
बिना टपाच्या निलांबरी च ज्याम कौतुक आहे मला, स्पेशली वरळी सी फेस च्या समोरुन जाते ती तेव्हा तर तिच्यात बसायला जीव चाल्लेला म्हणालात तरी हरकत नाही... लौकरच जाईन.
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
छोट्याछोट्या गमतीत लपलेलं असतं.
हायफाय यासाठी...!
तपशीलवार लेख सध्या जमणं कठीण
तपशीलवार लेख सध्या जमणं कठीण आहे, पण तूर्तास हा जुना लेख.
जीनियस इन कॉपी पेस्ट
खरं तर ह्यात आश्चर्य वाटावं असं काहीच नाही, तरीही -
मराठीत कॉपी पेस्ट
https://www.ndtv.com/india
https://www.ndtv.com/india-news/army-chief-bipin-rawat-on-difficulties-…
He cited logistical reason also behind not posting women on frontlines. "Our orders are that a lady officer will get a hut in the COB, then there are orders that we have to cocoon her separately. She will say somebody is peeping, so we will have to give a sheet around her," General Rawat said.
The Army Chief questioned whether a women officer with commanding responsibilities can stay away from her post for long? "I am ready, it is not that army is not ready (for combat role for the women). Will she command? Okay, so now I make her a commanding officer. She is commanding a battalion. "Do I put a restriction on her to say that in that command tenure you will not be given maternity leave? If I say that, there will be ruckus created," he added
अजूनही काही गोष्टी न बोलता अध्याहृत सोडलेल्या दिसतात.
असा विचार करुन ही गोष्ट पुढच्या पन्नास वर्षांतही शक्य होणार नाही.
आधारद्वारे युजर व्हेरिफिकेशन
आधारद्वारे युजर व्हेरिफिकेशन करण्याचे रिलाअन्स जिओने प्रथम चालू केले. आताही सिमकार्ड हे केल्याबरोबर ताबडतोब चालूच होते. ( त्यासाठी खर्च साठ लाख वार्षिक हा फी धरून असणार)
जिओने चालू केल्याने इतरांनाही ती पद्धत अमलात आणण्याशिवाय पर्याय नव्हता.
मग एवढे सर्व केल्यावर हे प्रीपेड सिमकार्ड काश्मिरसह नॅार्थईस्टमध्ये चाललेलेच पाहिजे॥ बिलिंग पोस्टपेडची अट का? त्यात काय कंपनीचा माणूस घरी येऊन पत्ता बरोबर आहे का तपासतो?
विनोद जुना आहे खरा, परंतु...
...अर्धवट सांगितलात.
संपूर्ण विनोद असा आहे:
दूरदर्शनवर रविवारचे रामायण चालू असते. (तेच ते रामानंद सागरवाले.) लंकादहनाचा एपिसोड असतो. पाहायला एक अमेरिकन, एक मुसलमान, आणि एक सरदारजी.
तिघांनाही एपिसोड (आणि त्यातला तो हनुमान) प्रचंड आवडतो. आणि मग हनुमान आपलाच होता, हे सिद्ध करण्याची तिघांत अहमहमिका सुरू होते.
"ते ही-मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन वगैरे आमचे सुपरहीरो आहेत, तसाच आमचा हॅनूमॅन." - अमेरिकन.
"छट बे! वो उस्मान, सुलेमान, रहमान वैसे हमारा हनुमान." - मुसलमान.
यावर सरदारजी फक्त हसतो.
बाकीचे दोघे त्याला विचारतात, "हसायला काय झाले?"
सरदारजी म्हणतो, "एक तो दूसरे की बीवी के लिए तीसरे की लंका जलाने वाला, और फिर उस के लिए ख़ुद की पूँछ को आग लगवाने वाला, सिर्फ़ एक सरदार ही हो सकता है."
खा, प्या आणि तंगड्या वर करून ...
https://www.esakal.com/desh/naseeruddin-shah-says-he-fears-his-children…
समाजातलं "विष" सिलेक्टिव्हली दिसतं सरांना. Whataboutery नाही. पण ही नाटकं in any case उठून दिसतात.
सोपे आहे.
गोहत्येवरून (किंवा गोहत्येच्या नुसत्या संशयावरून, किंवा (हा अमक्या गटाचा आहे, तेव्हा) याने गाय मारली/खाल्ली असेलच(/यानेच गाय मारली/खाल्ली असेल), अशा निव्वळ अॅझम्पशनवरून) आपल्या मुलांचा खून होऊ शकतो, अशी भीती जर तुम्हाला वाटू लागली, तर तुम्हीसुध्दा अशीच बोंब माराल. तूर्तास तुम्हाला अशी भीती वाटत नाही, म्हणून तुम्ही ती मारत नाही, इतकेच.
ज्याचे जळते, त्याला कळते.
त्यात झालेय काय, की सध्याचे सरकार आल्यापासून अशा घटनांना ऊत आलेला आहे, किंवा गेला बाजार त्यांचे प्रमाण वाढलेले आहे. (आणि/किंवा, दुष्ष्ष्ट हलकट लिबरल फेक मीडिया अशा घटनांना अंमळ जास्तच प्रसिद्धी देतात. खरे तर रूटीन म्हणून असल्या बातम्या दडपल्याच पाहिजेत. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नव्हे.) त्यामुळे त्यांना वाटले असेल तसे.
आमच्या देशातसुद्धा सध्याचे सरकार आल्यापासून काही प्रकारच्या घटनांना ऊत आलेला आहेच. (किंवा आमच्याकडचीही दुष्ष्ष्ट हलकट लिबरल फेक मीडिया आजकाल अशा घटनांना अंमळ जास्तच प्रसिद्धी देते, म्हणा ना! खरे तर रूटीन म्हणून दडपून टाकल्या पाहिजेत असल्या बातम्या! कुत्रा माणसाला चावला तर इ.इ.) बिगरपांढरे बिगरख्रिस्ती म्हणून आम्हालाही थोडीफार भीती वाटतेच, म्हणून आम्हीही त्याबद्दल थोडीफार अशीच बोंब ठोकतो. बहुतांश बिगरलिबरल पांढऱ्या ख्रिस्त्यांना तशी भीती वाटत नाही (किंबहुना त्यांना काहीच वाटत नाही), म्हणून ते बोंबलत नाहीत. तसेच आहे हे.
तर सांगण्याचा मतलब, ज्याला ज्याचा त्रास जास्त होतो, त्याबद्दल तो बोंबलतो, नि ज्याचा त्रास होत नाही किंवा तुलनेने कमी होतो, त्याबद्दल बोंबलत नाही. हे सिलेक्टिव असणे हे साहजिक आहे. जावे त्याच्या वंशा...
बरोबर. तत्सम संदर्भ मी तपासत
बरोबर. तत्सम संदर्भ मी तपासत नाही पण नेट-लेखांतले आहेत.
सध्याच्या आठवड्यातल्या या दोन बातम्या वाचून इथे लिहिलं. ( बातम्यांची लिंक टाकली नव्हती.)
मी विंडोज लुमिया फोन वापरतो,अजून चालतोय म्हणून. ( ओएस 8.1होती ती त्यांनी 10 अपग्रेड करून दिली.)IE11चा EDGE झाला. काही गोष्टी आणि अॅप्स चालत नाहीत कारण काय तर फोनसाठी दिलेली ओएस, त्यातले वर्शन अगदी तळागाळातले आहे. -Anniversary Udate 1607. त्याचे अपडेट्स ( Word आणि Excelचेही) दर महिन्याला येत असत ते सप्टेंबरपासून बंद केले. ( माझ्याकडे पीसी कधीच नव्हता आणि अजूनही नाही.) फोनातली छोटी रॅम ही लिमिटेशन आहे अन्यथा ओक्टोबर अपडेट 1809 सुद्धा मिळाली असती असा गोड गैरसमज.
तर हे सर्व वाचनातूनच कळलं.
विचित्र निर्णय
https://venturebeat.com/2018/12/21/indian-government-to-intercept-monit…
या निर्णयामुळे आउटसोर्सिंग धंद्यावर टाच येऊ शकते. पण ग्यानबाचे अर्थशास्त्र कोळून प्यायलेले सरकार या गोष्टीचा विचार करून निर्णय घेत नाही.
डेव्ह एगर्स
ह्या पार्श्वभूमीवर रोजच्या खाजगीपणाच्या आपल्याकडूनच नियमितपणे होणाऱ्या भंगाविषयी डेव्ह एगर्स काय बोलला हे लक्षात घेण्यासारखं आहे.
फ्रँक रिच आणि ट्रम्प सरकार
फ्रँक रिच यांच्या मते ट्रम्प सरकारचा अंदाधुंद कारभार आता रिपब्लिकनांनाच फार काळ सहन होणार नाही.
सेंटिनलींशी संपर्क करणारी संशोधक
मधुमाला चट्टोपाध्याय या संशोधिकेनं १९९१ सालात अंदमानच्या सेंटिनली आदिवासींशी संपर्क प्रस्थापित केला होता. त्याची कथा. वरच्या चित्रात, मधुमाला तीन महिन्यांच्या सेंटिनली बाळासोबत.