डायनोसाॅर पार्क

मह्या आणि मी दोन महिने तयारी करत होतो. फायनली सुवर्णाक्षरात लिहायचा दिवस उगवला होता भेंजो.

प्रत्येकी दोन हजार रूपये नगद मोजलेल्या पन्नास जणांची बस घोलवडजवळ पोचली होती. मह्या उठून उभा राहिला, आणि पब्लिककडे बघत म्हणाला, "कृपया लक्ष द्या. सर्व सूचनांचे पालन करा. कोणीही बसबाहेर उतरू नका. बोलू, शिंकू किंवा खोकू नका."

मी री ओढली, "तुम्ही सही केलेलं नाॅन-डिसक्लोजर अॅग्रीमेन्ट विसरू नका. या अनुभवाबद्दल कोणाशीही बोललात तर दहा लाख रूपयांचे लिक्विडेटेड डॅमेजेस तुम्ही आम्हाला देऊ लागता, हे तुम्ही मान्य केलंय. याला कोणाचीही हरकत असेल तर आत्ताच बसमधून उतरा. तुमचे दोन हजार रूपये आम्ही परत करू."

सगळ्यांनी माना डोलावल्या. त्यांच्या डोळ्यांतील उत्कंठा आणि भीती क्लीअर दिसत होती.

ड्रायव्हरने बस थांबवली आणि सगळे सावरून बसले. समोरचा दरवाजा करकरत उघडला. "वेलकम टू डायनोसाॅर पार्क" मह्या म्हणाला.

बस आत यायच्या आधीच लोक खिडक्यांमधून बाहेर बघू लागले भेंजो. मह्या म्हणाला, "डायनोसाॅर्सचे खूप प्रकार होते. टी-रेक्स टाईपचे मोठ्ठे डायनोसाॅर होते, आणि काॅम्पीसारखे छोटे डायनोसाॅर होते. तुम्ही आता बघाल ते डायनोसाॅर छोटे आणि मध्यम आकाराचे आहेत."

"हे डायनोसाॅर तुम्ही डीएनए गोळा करून बनवलेत का?" एका काकांनी विचारले. "त्याबद्दल बोलायला आम्हाला पावर नाय," मी लगेच बोललो. उगाच जास्त माहिती द्यायची नाही भेंजो.

बस थोडी पुढे गेली आणि ठरवलेल्या ठिकाणी थांबली. "उजवीकडे बघा," मह्या दबक्या आवाजात बोलला. सगळेजण माना उंचावून आणि उभे राहून बघू लागले. एका कुंपणाआड चारपाच एमू होते. कोणी पब्लिक काही बोललं नाही भेंजो.

पाच मिनिटं थांबून बस पुढे निघाली आणि थोड्या वेळाने परत थांबली. "आता डावीकडे बघा," मह्या म्हणाला. पब्लिकच्या माना डावीकडे. दोन टर्की आणि दहाबारा कोंबड्या दाणे टिपत होत्या.

"हा काय नाॅनसेन्स चाललाय?" एक काका ओरडले - अगदी सात्त्विक संतापाने भेंजो. "दोन हजार रूपये घेऊन कोंबड्या दाखवताय?" एक ताई ओरडल्या.

मह्या उभा राहिला आणि म्हणाला, "आम्ही काय बोललेलो? डायनोसाॅर दाखवणार. सगळे पक्षी हे थेराॅपाॅड डायनोसाॅर आहेत. कळलं?"

मी बोललो, "आम्ही अॅग्रीमेन्टप्रमाणे डायनोसाॅर दाखवले. पटत नसेल तर खटला भरा आमच्यावर. पण कुठे बोललात तर लिक्विडेटेड डॅमेजेस लाऊ." मनातल्या मनात भेंजोपण बोललो भेंजो.

पब्लिक कन्फ्युजड् झालं आणि गप्प बसलं. मह्या आणि मी बसमधनं उतरलो आणि ड्रायव्हरला लोकांना परत मुंबईत सोडायला सांगितलं.

"भेंजो कोण बोलतो एमू फार्ममध्ये पैसा नाय?" मह्या म्हणाला आणि मी त्याला टाळी दिली.

मग बाईकवर बसून धाब्याला गेलो आणि तंदुरी डायनोसाॅर खाल्ला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

तुमच्या पार्कात आमच्या पाली मिनिएचर डायनोसॉर म्हणून दाखवता आल्या असत्या. झीरो मेंटेनन्स! उगाच करायचे काय आहेत ते खर्चिक एमू अन् टर्की?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भेंजो, कुठून येतं हे सगळं!!

का कोण जाणे, हे वाचून द अनियनमधला माझा सगळ्यात आवडता लेख आठवला.

Idiotic Tree Keeps Trying To Plant Seeds On Sidewalk
त्या लेखातलं हे वाक्य एपिक आहे -

“Oh, yeah, I can’t wait to see the tree sprouting right up in the middle of 5-inch-thick cement. The dirt’s that way, Einstein.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात?

(जैन ठिबक हे उत्तर अपेक्षित नाही.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माफ करा, शक्तिमान. मी लहानपणी 'आमची माती आमची माणसं' बघितलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग आता डीडी आर्काइव्ज़मधून मागवून बिंजवॉच करा.

आहे काय नि नाही काय? इच्छा असेल, तर मार्ग दिसेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभाळमाया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हान्जो! SmileSmileSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचून आमच्या लहानपणचा 'एक रुपयात दुधी हलवा' वाला ज्योक आठवला. तुम्ही रुपया दिलात की तुम्हाला तंबूत घेऊन जातात. तिथे टांगलेला दुधी असतो. हलवा तेज्यायला हवा तितका!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा मस्त आहे ही गोष्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

तंदुरी डायनोसॉर बाकी भारी जमलाय हां.

देशी, गावरान डायनोसॉरला चव लै भारी असते म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तंगडी की वक्षस्थळे?

(आणि हो. फोटो पाहिजेत. तंगड्यांचे. वक्षस्थळांचेसुद्धा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देशी, गावरान डायनोसॉरला चव लै भारी असते म्हणतात.

चुलीवरचा असला तरच.. या एकदा आमच्या गावी, चुलीवरचा गावरान डायनासोर चारतो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************