कातरवेळ

सडा शिंपाया अंगणी
रहाटाची कुरकुर
निवणाऱ्या भुईवर
चंद्रकिरणांची जर

दार मिटल्या खोपटी
पिल्ले वासल्या चोचींची
धूरभरल्या खोलीत
रिती ओली बाळंतीण

गंध पुसट पुसट
खोल देवराईतले
तळी साचे कळशीच्या
शिळे पाणी उरलेले

मोहफुलांच्या पाकळ्या
कोण विखरून गेले
रुतलेली अंतरात
त्याच्या भासाची सावली

ज्योत होई वरखाली
चरचरे वात ओली
काजळीशी कंदिलाच्या
चाले पतंगाचे गूज

पाही कोसळती उल्का
रात्र मिट्ट अवसेची
मंतरल्या राऊळीची
घंटा दूर निनादत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कातरता उतरली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. रिती बाळंतिण .... हा शब्द का माहीत नाही पण अंगावर काटा आणतो.

ओली बाळंतिण हा शब्द वेगळा आणि रिती बाळंतिण हा शब्द वेगळा.
________

निवणाऱ्या भुईवर
चंद्रकिरणांची जर

वाह!!! फार सुरेख उपमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0