<धूम्रपानबंदी : एक पर्यावरणपूरक पर्याय>

प्रेरणा

धूम्रपान करणारी एक व्यक्ती एका महिन्यात सुमारे 30 पॅक सिगरेट ओढते. वर्षभरात साधारण 365. म्हणजेच धूम्रपान टाळण्याची सवय ही दहा वर्षांत 3650 पॅक्सच्या समतुल्य आहे.

धुम्रपान करण्याची गरज भासणाऱ्यांना दर तासाभराने उत्पन्न होणाऱ्या तल्लफीपोटी सिगरेट जाळून तयार होणारा धूर आणि कचरा हा टाळता येण्याजोगा असतो. पूर्वी यासाठी तंबाखू चघळणं किंवा मुळातच फार लोकांनी सिगरेट न ओढणं हे केलं जायचं. पण आता काळाच्या गरजेनुसार आणि वाढत्या जाहिरातबाजीपोटी सिगरेट ओढणारांची संख्या वाढलेली आहे. सिगरेट ही जाळा आणि फेकून द्या या प्रकारात मोडत असल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानीही तेवढ्याच प्रमाणात मोठी आहे. सिगरेट ओढणं सोडूनच देणं हा पर्यावरणपूर्वक पर्याय ठरू शकतो.

सर्वेक्षणानुसार एक धूम्रपानकर्ता त्याच्या संपूर्ण आयुष्यात (50 वर्षं) साधारण 200,000 सिगरेटी ओढून त्यांची थोटकं फेकून देतो. त्याला पृथ्वीवरच्या सर्व धुम्रपान करणारांच्या संख्येने गुणलं तर जी संख्या येईल तितका कचरा निर्माण होत असतो. या सतत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन आणि विघटन करणं खूप आव्हानात्मक आहे. एका सिगरेटच्या पॅकचं पूर्ण विघटन व्हायला शेकडो वर्षं लागतात. अत्याधुनिक सिगरेटींमध्ये 90% तंबाखू असतो. त्यांतून लाखो धुम्रपान करणारांना तसेच त्यांच्या आसपासच्या लोकांना कर्करोग होऊ शकतो. शिवाय वापर करून फेकल्यानंतर तयार होणारा कार्बनडायॉक्साइड हवेत शिरतो. तो अनेक मार्गांनी पृथ्वीचं तापमान वाढवतो. शिवाय तंबाखू तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा, कच्चा माल, व वाहतुक यामुळेही प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर पडते. उत्तम पद्धतीने बनवलेली धूम्रपान-त्यागण्याची सवय बनवण्यासाठी कुठचंच रसायन लागत नाही. एक सिगरेटचा पॅक काही तास वापरून फेकून द्यावा लागतो, तर धूम्रपान-निरोधाची सवय लावल्यास अनेक वर्षं ती वापरून कुठचाच कचरा निर्माण होत नाही.

एक धुम्रपानकारक महिन्याला 30 पॅक वापरतो. म्हणजे वर्षाला 365. म्हणजेच धुम्रपान टाळण्याची सवय ही दहा वर्षांत मिळून 3650 पॅक्सच्या समतुल्य आहे. हा पर्याय केवळ पर्यावरणाच्याच दृष्टीने फायद्याचा नसून आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक योग्य आहे. धुम्रपान टाळण्याच सवय लावण्यासाठी सुरुवातीला काही खर्च येतो - सुमारे 700 ते 1000 रुपये. निकोटीन पॅचसारखी उत्पादनं ऑनलाइनही उपलब्ध आहेत. सुरुवातीला महाग वाटत असलं तरी त्यांची किंमत महिन्याभरात सहज वसूल होते. सिगरेट सोडल्याने फुप्फुसांचा आणि घशाचा कर्करोग टळतो असं डॉक्टर सांगतात.

सिगरेट सोडण्यासाठी अशा उत्पादनांचा सोपा पर्याय उपलब्ध असूनही भारतासारख्या देशात त्यांचा म्हणावा तितका प्रचार झालेला नाही. बऱ्याच धूम्रकर्त्यांना असं काही उपलब्ध असतं हेसुद्धा माहीत नाही. अजूनही औषधांच्या दुकानांत ही सिगरेट सोडण्याची औषधं उपलब्ध नाहीत. काही सांस्कृतिक समजींमुळेही उदासीनता आहे. या विषयावर धूम्रकर्ते उघडपणे बोलणं टाळतात. बऱ्याच जणांना सिगरेट सोडण्याची काहीशी भीती आहे. मात्र दोन ते तीन आठवड्यांच्या वापरांनंतर सवय होते पण त्यासाठी सुरुवातीला थोडे प्रयत्न करावे लागतात. इंटरनेटवर याबद्दल व्हीडियो आहेत, तसंच अनेक धूम्रकर्त्यांनी वर्षानुवर्षं वापरून त्याबद्दल यूजर गाइडही तयार केलेली आहेत. शंका असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरचाही सल्ला घेऊ शकता. गेली काही वर्षं याबद्दल माहिती असूनही मी स्वतः गेल्या काही महिन्यांतच या पर्यायांकडे वळलो आहे, पण दुर्दैवाने अजूनही पूर्णपणे कन्व्हर्ट झालेलो नाही. भविष्यातली पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अधिकाधिक धूम्रकर्त्यांनी लवकर या पर्यायाकडे वळायला हवं आणि इतरांनाही प्रोत्साहित करायला हवं.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

ठीक आहे की.

आजूबाजूच्या लोकांना धुराचा त्रास होऊ नये, त्यापासून आजार होऊ नयेत, हा मुद्दा धूम्रपानविरोधी चळवळीत कार्यक्षम आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान न करण्याबाबत बरेच लोक या मुद्द्याने पटले. आणि खरोखर पटले (फसून पटले नाहीत.)

जर कोणाच्याही स्वायत्ततेला धोका नसेल, तर असा समाजहिताचा मुद्दा विचारात घेणे ठीकच आहे. कोणी प्राथमिक म्हणून विचारात घेईल, प्रचाराला घेईल. कोणी दुय्यम म्हणून विचारात घेईल, किंवा घेणारही नाही. ज्या-त्या उपभोक्त्याची आणि प्रचारकाची स्वायत्तता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'इतरांना धोका' हा मुद्दा एखाद्या ओळीतच आलेला आहे. 'पर्यावरणाला धोका' हा मुद्दा मांडल्याचा मी तरी पाहिलेला नाही. सिगरेटमुळे होणारा कचरा हा सॆनिटरी नॆपकिन्सपेक्षा किमान दुप्पट असूनही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"इतरांना त्रास" हा माझा वाढीव मुद्दा आहे.
एक शक्यता अशी आहे, की हा लेख "रेडुक्टियो आद् आब्सुर्दुम" प्रकारचा नाही आहे. असे असेल तर जितके उदात्त हेतूचे नवीन मुद्दे संवादात आणता येतील, तसे संवादाला पोषकच आहेत.
आणखी एक शक्यता अशी आहे, की हा लेख "रेडुक्टियो आद् आब्सुर्दुम" प्रकारचा आहे. म्हणजे लेखाच्या अंती वाचकाला असे वाटावे की उदात्त हेतूने वैयक्तिक फायदेशीर गोष्टीचा प्रसार करणे ॲबसर्ड आहे. तर धूम्रपानाबद्दल प्रत्यक्ष अनुभव दाखवतो, की असे घडते. म्हणजे जी काही ॲब्सर्डिटी लेखातून भासते, ती भासमानच आहे, कारण प्रत्यक्ष अनुभव हा काल्पनिक विचारप्रयोगापेक्षा सज्जड प्रमाण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे वैयक्तिक फायदा विरुद्ध सामाजिक फायदा इतकं जनरलाझेशन नाहीये. पर्यावरणाचा विनाश हा विशिष्ट मुद्दा आहे. सार्वजनिक जागी धूम्रपानाला बंदी झालेली आहे. तरीही 'धूम्रपान थांबवा' अशा आवाहनांत फक्त वैयक्तिक फायदे सांगितले जातात. (हे योग्यच आहे.) पण सिगारेट्ससाठी जाळलं जाणारं घनद्रव्य हे सॆनिटरी नॆपकिन्ससाठी वापरल्या जाणार्या घनद्रव्यापेक्षाही जास्त आहे. तरीही 'सिगारेट्स ओढणारे पर्यावरणाचा नाश करतात' असे लेख दिसत नाहीत. पर्यायी 'सिगरेट सोडल्याने तुमचा खूप फायदा होईल ' म्हणणारे लेख खूप दिसतात. अदितीच्या लेखात या संदेशाच्या भिन्नतेविषयी तक्रार होती. ती अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोंडात (किंवा आणखी कुठे) सिगरेट घुसवली तर मग ती जागा इतर गोष्टी सारण्यासाठी रिकामी राहात नाही. तुम्हाला याचं वैषम्य वाटत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१)सिगरेटपेक्षा विडी बरी नाही का?
पानात गुंडाळलेला तंबाकु, दोनचार झुरके मारून टाकून देतात. जरा बरं वाटतं त्यांना.
२) तंबाकुच्या पानांना कितीवेळा प्रक्रिया करतात त्यावर कडकपणा असतो.
३) टेस्लामालक pot,weed,tobaco ओढतो म्हणून त्याच्या फॅक्ट्रीचे आडिट करणार NASA. त्याचे रॅाकेट,मोड्युल वापरणार नाही. तंबाकु अवकाशात जाईल या भीतीने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जी , गुर्जी ... तुमची सुटली तर सुटल्या वर सांगाल का प्लिज ...
म्हणजे या हीविषयी तुम्हाला गुर्जीपण देता येईल.
अरे काय चाललंय ?
धनंजयराव, तुम्हीपण ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जी व्यक्ती वैयक्तिक नुकसान धडधडीत दिसत असून - कळतं पण वळत नाही या अवस्थेत असेल - तिला पर्यावरणाबद्दल उपदेश करून काय होणार ? त्या कारणासाठी कोणी सिगरेट सोडेल ही आशा करणंच चुकीचं आहे. त्यातल्या त्यात पॅसिव्ह स्मोकिंगचे जिवलगांवर दुष्परिणाम वगैरे कळवून घेण्याची शक्यता बरीच असेल.
(खडीवाले वैद्यांनी माझ्या बाबांना काय एवढं सुनावलं मला खरंच माहिती नाही, पण जवळजवळ चेनस्मोकर बाबांनी तीन दिवस प्रचंड चिडचिड करत पण सिगरेट संपूर्ण सोडली, अगदी कायमची. आणि किती छान वाटतंय आता असं ते आवर्जून सांगू लागले इतरांना). तुम्हालाही सुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खडीवाले वैद्य हे श्री श्री प्रकाश गुरू घंटाल बाबा बंगाली* किंवा Quitters inc* इतकेच परिणामकारक दिसतात.
* पहा: नो स्मोकिंग नामक उत्कृष्ट चित्रपट किंवा वाचा स्टीफन किंगची Quitters inc कथा.
================
सिगरेटचा पर्यावरणावर काहीही परिणाम होत नाही. कदाचित सिग्रेट प्याल्याने माणसं मरतात त्यामुळे लोकसंख्या कमी होते. तुरूंगातल्या कैद्यांना, अतिरेक्यांना, फिदाइन बाँबर्सना, थेट्रात चित्रपट पाहताना बोलणाऱ्यांना, चर्नी रोडला उतरायचं असूनही अंधेरीपासून दरवाजात आता उतरतो का मग असं करणाऱ्यांना, जेवताना म्चम्चम्च आवाज काढून खाणाऱ्यांना -- अशी आपापल्या शत्रूंना भरपूर सिग्रेट पिऊ द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पान खाणे म्हणजे थुंकणे हे प्रथम बंद व्हायला पाहिजे. ती गाणीसुद्धा. बस स्टँड, रेल्वे स्टेशनं यांची दोन दिवसांत वाट लावतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करंट पुडी बद्दल काय विचार आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

आमचा ९ वर्षाचा मुलगा यावरच दोन दिवसांपूर्वी बोलत होता. शाळेत "निसर्ग -संवर्धन" असा जो तास असतो तिथे चिरंजीवांनी सिगरेट ओढणे बंद करा असा सल्ला दिल्याची बातमी आहे. थोडक्यात काय ! जगभरातील कानाकोपऱ्यात सानथोर असा विचार करू लागतील तर हवा शुद्धीकरण प्रक्रिया सत्वर सुरु होईल कदाचित !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed