जुनं घर

नवीन रंग द्यावे घराला
म्हणून डबे घेऊन आलो
कुलपी दरवाजा बघून जरा बिचकलो,
माझंच घर ना हे?
पण हिय्या करून लोटलं आत
नी उंबऱ्याच्या सवयीने अलगद उचललं पाऊल
पण नव्हताच मुळी तो पायाखाली!
होती फक्त काळी फरशी, गार स्पर्शाची.

धुरात घुटमळणारी भिंत कुठेशी
सरकत गेली कोपऱ्यात.
आणि खिजवत
आपले पोपडे दाखवत म्हणाली
खरवडशील का आपल्या हातानं?
होतास कुठे इतके दिवस?
नव्या नजरेनं पहातो आहेस आज मला
जुन्या माळ्यावरच्या रद्दीसारखा!
इथल्या रंगांचे पापुद्रे सोडवताना
झिजतील तुझी नखं आणि
कुठला रंग उसळेल अखेर रक्तात
हे मीही नाही जाणत!

किती झाल्या अशा रंगसफेद्या?
नी कुणासाठी थांबला का पावसाळा
कधीतरी?

कान देऊन भिंतींना चाचपले कोनाडे,
विरल्या स्तोत्रांचे प्रतिध्वनी आणि
विझत्या गोत्रांचे क्षीणसे कण्ह पडले कानी.
तुटल्या जानव्यांचे धागे चिवटसे दिसले
गुंडाळलेले, पुडीला जीर्ण तपकिरीच्या!
गृहशोभिकेची रद्दी पदर पाडुन उभी मौजेने
गर्दीत सत्यकथेच्या.
धुळीच्या वर्खाखाली दडलेली तसबीर
कुण्या गंगाभागिरथीच्या लग्नातली,
वंशावळीला उपयोगी!

आरशाची अलमारी सताड उघडी
पैठणीची जर दिमाखदार
लोळत जांभळ्या धुळीत.
आरशात दिसलं
रंग माझाही रापलाय आता,
पोपडे माझेही उडताहेत,
भिंत सोलतेय माझेच पापुद्रे
नखं उडालेल्या बोटांनी चुन्याच्या
दिसले पदर काही, नी दृष्टीआड झाले
माझेच मला त्वचेखालचे.
आधीचा उनाड पिवळा, गुलाबी, मग मवाळ पिस्ता
नी आता निळा, केशरी.
रंग चढताहेत जुन्या रंगांवर
वारूळ चढतंय हळुहळू अंगावर.

घर विविध रंगांचं, जुन्या भिंतींचं
तुळयांचं, तसबिरींचं
खोल खिडक्यांचं
मोठ्या पडवीचं
घर रंगाऱ्याचं.
घर माझं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गंगाभागीरथी हे वृद्ध विधवा स्त्रीचे बिरुद आहे. जसे ती. सौ. अजुनी लिहिलेले आढळते तसे ती. गं.भा. असा मायना असे.
बाकी कविता छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माहीत नव्हते. माहितीबद्दल, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ताम्हणकरांचा 'गोट्या' वाचला नाहीत काय कधी?

(छ्याः! आजकालच्या पिढीचे वाचन म्हणजे...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याच अर्थानी वापरलाय तो शब्द.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत मोलाची माहिती दिलीत.

(म्हणजे, मला अगोदरच होती, परंतु तरीही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

या कवितेतून कविला काय सांगायचं आहे असा प्रश्न पेप्रात ( परीक्षेत )आला की अमची भंबेरी उडायची. पाठ केलेल्या प्रश्नोत्तरांपेक्षा वेगळाच.
मग या उत्तरांकडे शेवटी येऊन सुरुवात करायची ~ " जुन्या घराच्या भिंतींना रंग देणं वाटतं तेवढं सोपं नाही हे कविच्या लक्षात येतं. त्यात आणखी घर मनुष्यरूप घेऊन बोलू लागतं. कवी विचार करतो की रंगाच्या दुकानातून रंग कोणता विचारल्यावर दुकानदाराने चुना, डिस्टेंपर, पालिसपेपर, ब्रश सांगितले पण हे सांगितलेच नव्हते."
घर रंगवायचे तर कष्ट आणि मानसिक तयारी लागते हेच कविला या कवितेतून सांगायचे आहे."
टिरिंग टिरिंग. "चला भराभर उत्तरपत्रिका बांधा, (आणि निघा)" पर्यवेक्षक बाई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0