भग्न शिल्पांतून भटकत

भग्न शिल्पांतून भटकत एकटे कुणी भूत रात्री
बरळले, "इहलोक नश्वर, शेवटाची येथ खात्री
भोगुनी उपभोग उरते शून्य केवळ मर्त्य गात्री
क्षणिक येथे तेज, अंती घोर तम प्रत्येक नेत्री"

चांदण्याच्या कवडशाने भग्न शिल्पे उजळली
ध्वस्तता उधळून, अंतरी साचलेले बोलली,
"निर्मितीच्या अदय तृष्णेनेच आम्हा घडविले,
आज जरी भंगून हे अवशेष विजनी विखुरले
सर्जनाच्या सिंचनाने अजुनी आम्हा भारले

निर्मितीच्या गारूडाची भूल भिनते शाश्वत
तेच या इहलोकीचे अन सर्जनाचे ईप्सित"

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

छानच आहे कविता अन आशय़

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कवितेत एक सर्जन सारखासारखा‌ येतो. पहिल्या ओळीत कवितानायक भूत आहे, असेही कळते. बॉच्ड सर्जरीचा बळी?

सर्जनाच्या सिंचनाने अजुनी आम्हा भारले

निर्मितीच्या गारूडाची भूल भिनते शाश्वत

सर्जनाने नेमके काय शिंपडले, की भूल वगैरे भिनू लागली? क्लोरोफॉर्म???

('शाश्वत भूल' बोले तो क्लोरोफॉर्मचा लईच ओव्हरडोस झालेला दिसतोय.)

(पण सर्जन स्वतः का क्लोरोफॉर्म शिंपडतोय? त्याच्याकडे स्वतंत्र अॅनेस्थेटॉलॉजिस्ट नाही? क्वॅक!)

तेच या इहलोकीचे अन सर्जनाचे ईप्सित

अर्थात! भूल देणे हे सर्जनाचे ईप्सित असणारच. नाहीतर मग काय भूल न देताच ऑपरेशन करायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ3

(जरी)जुने इनोद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0