Skip to main content

वेगळी

जगणं सगळ्यांसारखं
मन वेगळं.
मग मनाचं दुखणं खुपणंही.
त्यावरची औषधं अनेक.
मनाला न पटणारी
म्हणूनच निरुपयोगी.
मनाच्या तऱ्हा आणि कळा
त्यांचा तेच अर्थ लावणारे
असं वाग असं वागू नको
म्हणून त्यांच्या नियमात घुसवणारे.
सगळे एका रेषेत चाललेत
त्यांचा प्रवास होईलही उत्तम.
पण आकाशात विखुरलेत
काही ढग अस्ताव्यस्त
मनाला चोखाळायचीय त्यांची वाट.
जरी आहे ती खडतर दाट.
नाहीतर मग नुसतंच पसरायचं
रोडावलेल्या समुद्रासारखे.
दुरवरल्या दिपस्तंभांकडे नजर लावून.
काहीही करायचंय.
कसंही करायचंय.
कुणी काही सांगावं का?
तुमचं वेगळं आमचं वेगळं
हे त्यांना पटावं न का?
तुमच्या नियमात आम्ही नाही बसत.
मग मोकळं सोडा आम्हाला.
का उगाच तुमच्यात अडकलेल्या
आमच्या शेपट्यांना
आगी लावत बसलाय.
पेटवून देऊ आम्ही सगळं आकाश.
मोकळ्या न कराल त्या तर!
न वाकवल्या नियमांच्या रेषा
तर त्या तोडल्याही जातील
खात्रीनं.
त्याआधीच समजवा स्वतःला
आहे ती थोडी वेगळी,
वागली ती अशी म्हणून काय
आभाळ फाटलं का?
वेगळ्यांशी वेगळ्या तर्हेनंच
वागलं पाहिजे ना?

- रुपाली

राजन बापट Mon, 02/04/2012 - 08:08

रोचक कविता. "द रोड नॉट टेकन" आदि कविता आणि "डिफरंट ड्रमर" या (जीए कुल्कर्णी यांनी मराठी वाचकांना परिचित करून दिलेल्या) थोरोकृत विधानांची आठवण करून देणारी.

चेतन सुभाष गुगळे Mon, 02/04/2012 - 18:34

वेगळी पेक्षाही विशेष म्हणावेसे वाटते, विशेषतः आजच्या या विशेष दिवशी.