मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

field_vote: 
0
No votes yet

व्हिसा की व्हिजा ? कोणता उच्चार बरोबर आहे ? आम्ही ममव असल्यामुळे अजून तर्खडकरांमधेच अडकलो आहोत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फ्रेंचाळले आहे हे नक्की. थोडी मास्तरकी करते -
क-ग, च-ज(च्य ज्य), ट-ड, त-द प-ब तसेच स-झ या कठोर आणि मृदु व्यंजनांच्या जोड्या आहेत. यातील प्रत्येकी पहिला ध्वनी हा स्वरयंत्रातील स्वरतंतूंचे (vocal cords) तरंग न उठता निघतो तर दुसरा तरंगासह. एका प्रकारच्या ध्वनीच्या सान्निध्यात दुसरा ध्वनीही त्या धाटणीचा उच्चारला जातो. पाहा - cats v/s dogs क, ट -- स, ड, ग -- झ.
v हा मृदु आहे. (त्याचा कठोर जोडीदार f) phकार नव्हे.
आता ज चा उच्चार झला जवळचा होणार हे माझ्या लिहिण्यात गृहीत होतं, चमचा - झबले मधील दोन्ही उच्चार कठोर आहेत. झ z इतका मृदु नाही. व्हिझा लिहिता आले असते, असो. मराठीत परभाषेतले तत्सम शब्दांचे उच्चार तत्समच दाखवता येण्यावर मर्यादा आहे हेच खरे.
[जाता जाता बिचाऱ्या j / ज या अक्षराने काय पाप केलंय कोणास ठाऊक, मुका बिचारा कुणीही हाका अशी त्याची अवस्था -- या अक्षराचा सुटा उच्चार इंग्रजीत जे (मराठी माध्यमाच्या शाळेत हटकून जहाजातला जे), फ्रेंचमधे जी, (ज like in pleasure) जर्मनमधे या, स्पॅनिशमधे (खोता / होता) बंगालीत ज ही ज आणि य ही ज...]

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावात राजे, राणी, श्रीमंत वगैरे लावण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला 'वसुंधराराजे' हे नाव फार रोचक वाटतं; आगरी स्त्रिया 'मी आलो होतो' वगैरे भाषा बोलतात आणि चांगल्या खमक्या असतात, तसं वाटतं.

नावात काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१८५७ नंतर जितके संस्थानिक गादीवर शिल्लक राहिले ते सर्व देशाशी गद्दारी करून आणि ब्रिटिशांशी हातमिळवणी केल्यामुळेच शिल्लक राहिले असं यांना सुनवायला पाहिजे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कसली गद्दारी,कसला पराजय?
--
मोठा शत्रु उभा ठाकतो. दोनच पर्याय असतात आणि निर्णय घ्या हे सांगायला तो एक वकील पाठवतो.
अगोदर ब्रिटिशांशी दोस्ती करणारे ,त्यांच्शी तह करून नमते घेणारे गद्दार? नंतरचे , त्यांची प्रजा आता नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा, वागळे अजून ॲक्टिव्ह आहेत म्हणायचं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातल्या सामान्य जनतेच्या मनांत राजेशाही इतकी रुजली आहे की, असला विरोध करुन ती नाहीशी होणार नाही. खऱ्या अर्थाने लोकशाही रुजायला , अजून शंभर वर्षे तरी जातील असं वाटतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे राजे तेच, ज्यांनी ते पद स्वपराक्रमाने मिळवले. त्या महापुरुषाच्या वंशात जन्म होणे यात कसलेही कर्तृत्व नाही. जन्म कुठेही होवो, त्याचे तुम्ही काय करता यावर सगळं अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाजी राजे शहाजी च्या वंशात जन्माला आल्याने त्यांना HEADSTART मिळाला असे वाटते का? भोसले आणि जाधव घराण्यांतील "हजारयांची" बेरीज साठेक हजारी जात होती. याचा फायदा अनुयायी मिळवायला नक्कीच झाला असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्युटन्स लॉ ऑफ मोशन, न्युटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. पण आइनस्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं म्हटलं जातं. आईन्स्टाईन्स लॉ ऑफ रिलेटिव्हिटी का नाही म्हणत? अजुन ती थिअरीच आहे का? बरीच कंफर्मेशन तर मिळाली आहेत रिलेटिव्हिटीची. तरी अजुन थिअरीच का म्हणायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्ही सायन्सवाले, विशेषतः फिजिक्सवाले नसलात तर असा प्रश्न पडणं योग्य आहे.

एनिवे.. फिजिक्सपर्यंत न जाताही, लॉ म्हणजे फक्त असलेल्या / दिसणाऱ्या नियमाचं निरीक्षण करुन नोंदवणं.

थियरी म्हणजे ती घटना त्या नियमानुसारच का घडतेय याची कारणमीमांसा शोधणं आणि मांडणं. ती जास्तीतजास्त सुसंगत असली म्हणजे ती चांगली थियरी. पण ती कधीच लॉ बनू शकणार नाही. कारण संकल्पनाच वेगळ्या आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत लॅपटॉप विकत घेऊन भारतात घेऊन जातांना टॅक्स रिफंड मिळतो का? मिळत असेल तर त्यासाठी काय करावं लागतं?
माझ्याकडे Costco ची receipt आहे. अजून काही लागेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही कल्पना नाही. सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टॅक्स रीफंड? किस खुशी में, भाई?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुशी काही नाही, पण अमेरिकेत जर लॅपटॉप विकत घेतला आणि काही दिवसांच्या आत (६०?) जर तो दुसऱ्या देशात घेउन जायचा असेल तर त्यावर लावलेला टॅक्स परत मिळतो असं माझ्या मॅनेजर साहेबांनी (ते थायलंडचे आहेत) सांगितलं. पण डिटेल्स त्यांना माहित नाहीत. एअरपोर्ट वर गेल्यानंतर विचार असं त्यांनी सांगितलं. इथे लोकांना माहिती असेल म्हणून विचारलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0