रस्त्यावरची भांडण

प्रत्येकाची घर/शाळा/ऑफिस सोडून रस्तात/रेल्वेत/विमानात भांडण होतातच. काही वेळा वेळ मारामारीवर येते. मला असे तीन वेळा अनुभव आलेत. तुमचे पण अनुभव वाचायला आवडतील.
प्रसंग १ कॉलेज
एप्रिल महिन्याच्या कडक दुपारी मी एकटाच कॉलेजहुन बस स्थानक का कडे परतत होतो. तेव्हा रस्तात माझ्यापेक्षा वयाने जरा मोठे आणि शरीराने जास्त मोठी अशी दोन मुले आडवी आली. बहुतेक ती लोकल असावी, तोंडात गुटखा आणि हातात टच स्क्रीन फोन. (तेव्हा बहुतेकांकडे 0 ते ९ *# वाले मोबाईल असायचे)
मला अडवून विचारणं सुरु केलं की तू माज्या आते की मावस बहिणीच्या मागे का लागलास? इ इ.
तो पर्यंत मी कुठल्या मुलीच्या मागे लागलो नव्हतो. मलापण उत्सुकता वाटली कोण आहे ती अप्सरा. त्यानी त्याच्या मोबाईल वर फोटो दाखवला अप्सरा माझ्या ओळखीची नव्हती, मी नकार दिला. तिथे आमची सौम्य बाचाबाची झाली. मला माहित होतं ही दोघ ऐकणार नाहीत. तेवढ्यात एक सायकलवाला तिथून निघून गेला. लगेच मी दोघांना म्हणालो तो बघ सायकलवाला माझ्या ओळखीचा तो आता लगेच हॉस्टेल वर जाऊन माझ्या मित्रांना घेऊन येईल. ते तुम्हाला सोडणार नाहीत. आणि मी काही तुझ्या बहिणीला ओळखत नाही. आणि सरळ चालता झालो, पुन्हा मागे वळून बघितलं नाही.

प्रसंग २ बंगळुरू रेल्वे स्टेशन ते मॅजेस्टिक बस स्टेशन ला जोडणारा भूमिगत रस्ता.
सुट्टीच्या दिवशी ७०₹ चा BMTC चा पास काढून शहर भर फिरायचा माझा बेत असे. असंच एकदा खाली विनाकारण फिरत असताना एका गॉगल वाल्या पोराने मला बोलावून घेतलं आणि विकत घेण्यासाठी गळ घालू लागला माझ्या हिंदी वरून बहुधा त्यानी अंदाज घेतला व म्हणाला बंबाई से हो क्या.…? आणि एक चष्म माझ्या हातात दिला, आणि म्हणू लागला 100 का आपको 50 देता हू. मी तो परत देऊ केला पण त्यानी नकार दिला, आणि मलाच किंमत लावायला सांगितली. रागात मी चष्मा त्याच्या पाटीवर टाकला. तेव्हा तो मुलगा भांडायला लागला. बहुधा तो १०-१५ वयाचा असावा. मी त्याच्या छातीला पकडून मागे ढकलून दिलं, पण तेवढ्यातच त्याचा कोणी भाई तिथे हजर झाला बहुतेक तो सुद्धा तिथेच कुठंतरी विक्रेता असावा. पोरानी भाई ला सविस्तर सांगितलं. भाई उंच धिप्पाड मुसलमान होता त्यांनी शांत पणे विचारल क्यू नही खरीदना.? मी म्हणालो नही खरीदना मतलब नही, पैसा नही मेरे पास ये चायना का माल लेनेको, येहीच जबरदस्ती बेच रहेला हे. अचानक पणे त्या भाईने माझ्या पोटावर एक जोरात बुक्का मारला. आणि म्हणाला १००₹ दो गॉगल लो नाहितो पुरा पैसा लेंगा. मी ५००₹ देऊन ४०० चीसुट्टे आणि तो फडतूस चस्मा घेऊन घरी आलो.

प्रसंग ३
करीआकु मार्केट दार एस सलाम
रविवारच्या दिवशी मित्राच काही सामान घ्यायला बाजरात गेलो, भयंकर गर्दी असल्याने आम्ही पाच जण मुंग्यांच्या रांगेप्रमाणे चालत होतो. तेवढ्या आमच्यातला एका मुलाचा हात एका भिकरिसदृश प्राण्याने पकडला आणि स्वहिलीत बडबडू लागला आम्ही लगेच रांग तोडून त्याचा हात सोडवू लागलो २-३ मिनिटात तो हात सोडून निघून गेला आणि ५ मिनिटांनी आमच्यातला एकाला समजलं की त्याचा मोबाईल गायब आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

...हे सगळे आम्हांस सांगण्याचे प्रयोजन?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि तेही "मौजमजा" म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि म्हणाला १००₹ दो गॉगल लो नाहितो पुरा पैसा लेंगा. मी ५००₹ देऊन ४०० चीसुट्टे आणि तो फडतूस चस्मा घेऊन घरी आलो.

ये सब क्या हो रहा है! ही बळजबरी आहे. मी याचा निषेध करते व भकुंना पूर्ण सहानुभूती दाखवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको