सात्विक संतापातली नैतिकता

आज आमचे एक मित्र - त्यांची बदनामी टाळण्यासाठी त्यांचं नाव सांगत नाही - यांच्याशी फोनवर गप्पा झाल्या. तेव्हा नैतिकतेचा विषय निघाला. कॉपी करणं वगैरे. त्यावरून आठवलं.

मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होते. सहामाही किंवा असली कायशीशी परीक्षा होती. माझा विषय भौतिकशास्त्र, त्या दिवशी सापेक्षतावादचा (relativity) पेपर होता. भौतिकशास्त्र न शिकलेल्या लोकांसाठी थोडक्यात - relativity आणि Newtonian/Classical mechanics या मेकॅनिक्सच्या महत्त्वाच्या दोन शाखा. वस्तूंचा वेग प्रकाशाच्या वेगाशी तुल्यबळ झाला की सापेक्षतावादाची समीकरणं वापरावी लागतात. वस्तूचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा बराच कमी असेल तर काही गणिती युक्त्या वापरून त्याच सापेक्षतावादाच्या समीकरणांमधून न्यूटोनियन समीकरणं मिळवता येतात. ही न्यूटोनियन समीकरणं आपण शाळेपासून शिकतो.

तर त्या दिवशी सापेक्षतावादाची परीक्षा होती. सापेक्षतावादाची समीकरणं आणि कमी वेगाचं गृहितक धरून न्यूटोनियन समीकरणं कशी येतात ते दाखवा, असा काही तरी प्रश्न होता. मला मुळात सापेक्षतावादाचं समीकरण आठवत नव्हतं. एकदा ते आठवलं की पुढे काय करायचं हे माहीत होतं, पण पहिल्याच घासात माशी!

माझ्या पुढच्या बाकावर वर्गातलाच मुलगा बसला होता. त्याला मी दबकत विचारलं, "काय रे, तुला तो फॉर्म्युला आठवतोय का?"
त्यानं मला न्यूटोनियन समीकरण सांगितलं.

तिथे भर परीक्षेत, मीच कॉपी करण्याच्या प्रयत्नात असताना माझा प्रचंड संताप झाला. पेपर रिलेटिव्हिटीचा आणि हा मला क्लासिकल/न्यूटोनियन फॉर्म्युला सांगतोय! काय समजतो काय हा स्वतःला! आठवीपासून शिकतोय ती समीकरणं मला आठवणार नाहीत का रे भिकारड्या! मला एवढी गयीगुजरी का समजतोस तू!!

भर परीक्षागृहात त्याची गचांड पकडावी आणि 'मला एवढी बावळट का समजतोस तू' याचा जाब विचारावा, अशी अनावर इच्छा झाली होती. कॉलेजातले एक चांगले शिक्षक वडलांनाही ओळखायचे आणि हे सगळं प्रकरण बाबांपर्यंत पोहोचेल एवढ्याच जाणिवेपोटी मी त्याची गचांड धरली नव्हती, हे अजूनही स्पष्ट आठवतं.

त्यानंतर अनेक वर्षांनी आंजाचा शोध लागला. तिथे नंदननं कधी तरी हॅनलॉनचा वस्तरा दाखवला - "Never attribute to malice that which is adequately explained by stupidity."

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आत्ता आठवत नाही पण माझ्या बाबतीतही असे झालेले आहे की अमुक एक विचारलं की लोक काहीतरी 'excessively obvious' सांगुन शहाणपणा मिरवु बघतात. अरे बावळटा माझा प्रश्न वेगळा होता रे म्हणायचही त्राण आपल्यात उरत नाही इतका सात्विक संताप येतो Smile
_________________

Never attribute to malice that which is adequately explained by stupidity

सुपर्ब वाक्य आहे. महा मार्मिक. आणि शांतीप्रदायक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

परीक्षेत बरेचदा आपल्याला येतं ते सांगून टाकू- असं केलेलं असल्याने त्या पोराने बिचाऱ्याने त्याला माहितीये तित्कं सांगितलं असावं..
पण ह्या केसमधे कॉम्प्लेक्स भावना आहेत!
म्हणजे -मुळात परीक्षेचं टेन्शन बाळगून कॉपी करत असल्याची अपराधी भावना मनात असतानाच समोरच्याने केलेल्या अपमानाबद्दल आलेला राग-
तुला परीक्षा चालू असताना ह्या कारणाबद्द्ल राग यायला वेळ होता म्हंजे स्कालर होतीस तू Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला नक्की राग का आला होता, याची बरीच कारणं शोधता येतील. मला पटणारं कारण, मी स्वतःला फार स्कॉलर समजते. (आहे का नाही, ही गोष्ट निराळी.) त्यामुळे एवढं साधं समीकरण आठवत नाही, याचा अर्थ मी पुरेशी घोकंपट्टी केलेली नव्हती त्यामुळे मी मुळातच स्वतःवर वैतागले होते. घोकंपट्टी करून मार्क मिळतात आणि मला ते मिळवायला आवडतात, या संकल्पना स्पष्ट होत्या. ज्याला प्रश्न विचारला त्याला फार काही येत नाही, हे मला माहीत होतं, त्यामुळे अपेक्षा करणंच चूक होतं. मग संताप झाला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मेमरीवर आधारलेली परीक्षा पद्धत बदलायला हवी. फॉर्म्युले समोरच्या फळ्यावर लिहूनच ठेवले पाहिजेत. तुम्ही डोकं कसं चालवता, याचीच फक्त परीक्षा झाली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सहमत आहे.
फक्त पाढे, पावकी, निमकी, अडीचकी, कविता व स्तोत्रे यांची घोकंपट्टी हवी.
बाकी घोकंपट्टी नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

हल्ली मी तोंडी अंकगणितंही करत नाही. जी गोष्ट यंत्र सहज करू शकतं त्यासाठी मी माझी बुद्धी खर्च करणार नाही, या भूमिकेतून. दहापर्यंतचे पाढे आता विसरणं अशक्यच आहे, म्हणून तेवढे वापरते. बास. वार्षिक पगार किती हे सांगितल्यावर महिन्याचा पगार काढायलाही यंत्र वापरते. हातात यंत्र नाही असं सहसा होत नाही, पण अगदीच गरज पडली तर कागद-पेन घेऊन गणित करत बसेन, पण लक्षात ठेवणार नाही.

इंग्लिशमध्ये वाचलेले आकडे, मिलियन, बिलियन, मराठीत लिहायचे असतील, लाख, कोटी वगैरेंमध्ये, तर सरळ लिहून काढते आणि शून्य मोजत जाते.

तीच गोष्ट प्रमाणलेखनाची. शंका आली तर सरळ कोश काढून बघते, लक्षात ठेवण्याच्या फंदात पडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॉपी सारखी अनैतिक गोष्ट करत असताना आलेल्या संतापातल्या नैतिकतेबद्दल बोलणे ह्यातला विरोधाभास चिंतनीय आहे. ह्यात दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे आपण कॉपी करत आहोत ह्यात काहीही चुकीचे नाही अशी निर्ढावलेली मनोवृत्ती असेल तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहिजे ती माहितीआता मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा, आणि ती न मिळाल्यावर झालेला अपेक्षाभंग, समोरचा आपल्याला ढ समजतो अशी ego hurting भावना ह्याने राग येऊ शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे अस्वल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे कॉपी सारखे अनैतिक कृत्य करत असल्याची अपराधी भावना आधीच मनात असल्याने मनस्थिती थोडीशी emotionally vulnerable झालेली असेल तर वर दिलेल्या कारणांमुळे अधिकच राग येऊ शकतो. मग ह्या अपराधी भावनेला आवर घालण्यासाठी स्वतःला moral high ground घेणे उपयोगी पडते. त्यासाठी "मी काही साधी समीकरणे विचारत नाही. ती तर मला येतातच. मी मुळात हुशार आहेच. मी फक्त कठिण समीकरणांसाठीच कॉपी करत आहे, म्हणजे ही अनैतिकता बरीच सौम्य/justifiable आहे" अशी भूमिका घेऊन समोरच्यालाच inferior ठरवणे ह्यातून कॉपी करण्याची अपराधी भावना, आणि समीकरणे न आठवल्यामुळे आलेला inferiority complex काहीसा कमी होत असावा. म्हणजे असा संताप हा काहीसा guilt suppress करण्याचा मेंदूचा mechanism असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्लंडमध्ये शिकत असतानाची गोष्ट. आमच्या बरोबर एक इराणी मुलगा होता.

माझं कागदोपत्री नाव संहिता; इंग्लिश स्पेलिंगनुसार सगळे मला सनहिता म्हणायचे. हा इराणी मुलगा आठवड्यातून एकदा तरी म्हणत असे, "पर्शियनमध्ये सन्हिता असा शब्द नाही, तुझं नाव सॉन्या (सोनिया) असणार." मी त्याच्याकडे बराच काळ दुर्लक्ष केलं.

एकदा थंडीच्या मोसमात बरेच आठवडे ब्रिटिश हवा सुरू होती. झाडांचे खराटे झालेले, ढगाळ हवा, अनेक आठवडे सूर्यदर्शन नाही. त्यात कामात मी अडले होते; बॉस कामानिमित्त देशाबाहेर होता. आयुष्यात काहीच होत नाहीये, या भावनेतून कंटाळा आला होता. दुपारी वैतागून चहा प्यायला गेले, तर हा इराणी तिथेच होता. मी कपात गरम पाणी भरत होते, त्यानं मागून मला 'सॉन्या' अशी हाक मारून काही तरी फुटकळ गप्पा सुरू केल्या.

माझा स्फोट झाला. मी शब्दशः त्याची गचांड पकडली. "काय रे ए महम्मद, मी तुला अब्दुल म्हणते का कधी? माझं नाव संहिता आहे, सॉन्या नाही!" तो अत्यंत गरीब इसम आहे; घाबरला बिचारा.

बाहेर अंधार पडायला लागला होता. माझे दोन मित्र तिथेच दिवा न लावता बसले होते; त्यांनी माझा तमाशा बघितल्याचं मला समजलंच नव्हतं. तो घाबरल्यावर दोघांनीही, "हे सॉन्या" म्हणून हाकाटी सुरू केली. महम्मद आणखीनच घाबरून पळून गेला.

त्या दिवशी संध्याकाळी घरी सार्वजनिक टीव्हीवर आर्नोल्डचा 'रेड सॉन्या' नावाचा सिनेमा लावला. त्यात Sonja असं स्पेलिंग असल्यामुळे माझंही नाव बदलून सॉन्जा केलं. किती तरी दिवस त्या दोघांनीही मला चिकार पीडलं.

चारचौघांत आरडाओरडा का करू नये, याचं कारण मला बरोबर समजलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाप रे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

हाहाहाहा लौल.

आपल्या मित्राला एखाद्या गोष्टीने मनस्ताप होतो आहे हे कळल्यावर ती गोष्ट आवर्जून वारंवार करणे हा एकूणच मैत्रीतला अतिशय हृद्य भाग आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इथे अण्णांची आठवण होणं क्रमप्राप्त आहे.

बरं, त्यात ती 'रेड सॉन्जा'ची डीव्हीडी मीच विकत घेतलेली; ही नोंदही महत्त्वाची. त्या सिनेमात 'दोंत द्रिंक अँद बेक' असा थोर ड्वायलाक आर्नोल्डच्या तोंडी आहे. तोही मला वारंवार ऐकवला जात असे... याच टोणग्यांसाठी पावभाजी करताना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी काय केलं सौ अदिती ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काय केलं सौ अदिती ?

खालच्या उद्धृतातल्या मनस्ताप होत असलेल्या गोष्टीला 'अण्णा'नं रिप्लेस करा अण्णा, मग ऐसीच्या अण्णांवर ऐसीचं किती प्रेम आहे त्याची ग्वाही मिळेल.

आपल्या मित्राला एखाद्या गोष्टीने मनस्ताप होतो आहे हे कळल्यावर ती गोष्ट आवर्जून वारंवार करणे हा एकूणच मैत्रीतला अतिशय हृद्य भाग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अण्णांनी "प्यार दो, प्यार लो" केलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अण्णांनी "प्यार दो, प्यार लो" केलं.

आजकाल सौ म्हणजे सौजन्य. मराठीतल्या सगळ्या 'ब्रेकिंग न्यूज'बरोबर सौ. क्षयझ असा मजकूर देण्याची पद्धत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Xxत , काही कळलं नाही. कोण आहे रे तिकडे ? मला जरा व्य नि करून सांगेल असा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही कळलं नाही. कोण आहे रे तिकडे ? मला जरा व्य नि करून सांगेल असा ?

आदूबाळ :

आपल्या मित्राला एखाद्या गोष्टीने मनस्ताप होतो आहे हे कळल्यावर ती गोष्ट आवर्जून वारंवार करणे हा एकूणच मैत्रीतला अतिशय हृद्य भाग आहे.

अदिती :

इथे अण्णांची आठवण होणं क्रमप्राप्त आहे.

बापट :

मी काय केलं सौ अदिती ?

अदिती :

अण्णांनी "प्यार दो, प्यार लो" केलं.

बापट तुम्हाला अण्णा म्हटल्यानं मनस्ताप होतो असा अलम ऐसीचा दावा आहे. तद्वत अदितीला सौभाग्यवती म्हटल्यानं होतो, असाही एक दावा आहे. त्यामुळे तुमच्यात प्रेमाच्या तलवारींनी पुसटशा वारांची देवाणघेवाण झाली, असं ह्या ठिकाणी ह्या निमित्तानं जाहीर करण्यात येत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऎसन हय का ? तरम्गठीकाय . अण्णा म्हणू नका , सौभाग्यवती प्रीफिक्ष उडेल आपाप.
( हा गुंता इस्कटून सांगितल्याबद्दल रा रा जंतू यांसी धन्यवाद )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला आता रेट्रो धाग्यावर. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा धागा वाचुन लहानपणीची मराठी शाळेतली गोष्ट आठवली.
मराठीचा पेपर थोडा आधी टाकुन वर्गाबाहेर व्हऱ्हांड्यात आलो. दुसऱ्या वर्गात खिडकीपाशी एक मित्र बसला होता.
हळुच खिडकीजवळ गेलो तसा मित्राने पेपरवरचा गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न दाखवला : "गाढवाला गुळाची ...... ....... "
मी: "चव काय?"
मित्र: "हो, पण उत्तर काय?"
मी: "चव काय?"
मित्र: "हो रे, तोच प्रश्न, पण त्याचे उत्तर काय?"
मी: "चव काय, चव काय"
मित्र (आता सात्विक संतापाने) : "अरे XXXX, चव काय ते मला पण माहीत आहे, पण त्याचे उत्तर काय?"
तेवढ्यात शिक्षकांनी येउन त्याचा पेपर घेतला, पण त्याला चिडवण्यासाठी हा प्रश्न पुढे वर्षभर सर्व मित्रांना पुरला.

आता ईतक्या वर्षांनीही तो किस्सा सर्वांना व्यवस्थीत आठवतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी4
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरून आठवलं. आम्ही फर्ग्युसनच्या आवारात आधी तेरा नंबरच्या बंगल्यात राहायचो. तिथे शेजारी शिक्षकांसाठी दोन नव्या इमारती झाल्या होत्या. तिथली मुलंही खेळायला आमच्या आवारात यायची, झोपाळ्यावर बसायची. तर तिथे सात-आठ वर्षांच्या तीन चार मुली बसल्या होत्या त्यात एक बारा नंबरच्या आउटहाउसमध्ये राहणारी एक मुलगीही होती. तिला एकीने विचारलं, तुझे वडील काय करतात ? तर दुसरी थोडी कानकोंडी होत म्हणाली - फक्त हीच मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होती - अगं, प्यून आहेत ते. त्यावर पहिली म्हणाली काय प्यून आहेत पण ? :):)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज आमचे एक मित्र - त्यांची बदनामी टाळण्यासाठी त्यांचं नाव सांगत नाही ?
बदनामी टाळण्यासाठी ? की प्रसिद्धी टाळण्यासाठी ?? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाइफमेंबर नावाची एक मराठी मालिका फर्ग्युसनच्या वातावरणातून/ पार्श्वभूमितून निर्माण झाली होती म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0