सजले अंतर

नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर

दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर

विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर

काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर

प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर

मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...

- कुमार जावडेकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कायमस्वरुपी वियोग ... सुंदर कविता
.

दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर

अतिशय सुंदर उपमा. पागोळ्यांचा आवाज फार गोड असतो. आमच्याकडे पागोळ्या नसतातच एकदम आयसिकल्स् अर्थात बर्फाचे सुळे असतात.
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSjfIPGPV1ACun0Af6wG3BVcr2B5IMCAH3mVENvU1afawR_4e2l

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

सुंदर विश्लेषण आणि चित्र...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपले म्हणजे मूळ कविचे (तुमचे) विश्लेषण ऐकायलाही आवडेल.
मला मात्र आज ही कविता वाचताना फार उदास वाटले. बाबा आठवले. बाबांना आईबद्दल काहीसे असे वाटत असू शकते. त्यामुळे मी या कवितेशी तादात्म्य (आयडेंटिफाय) पावू शकले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

मला अभिप्रेत असलेला अर्थ -

गझलेत (किंवा कवितेतही) 'तू' हा एकाच वेळी अनेकांना उद्देशून असू शकतो. उदा. प्रेयसी आणि देव.

ही कविता देवाला उद्देशून आहे असा विचार करून बघा.

शेवटया कडव्यात हे स्पष्ट केलंय की तो वेगळा कुणी नाही तर आपल्याच अस्तित्व किंवा प्रवासाठी लाभलेला श्वास (प्रेरणा) आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको