माझे पोहे

आज मी पोहे करायला घेतले. किती वर्षांनी करत होतो कुणास ठावूक. आईला फोन केला अन् सगळं विचारून घेतलं. मग त्यानुसार पोहे घेतले. निवडले. भिजवले. मग कांदा चिरायला बसलो. 2 चांगले कांदे चिकार वेळाने रडत रडत चिरून झाले. मग स्टो पेटवाय घेतला. गॅस संपला होता ना. मग स्टो पेटवून बघितला. पेटेना. हलवून बघितला. रॉकेल संपले होते. मग रॉकेल भरले. पुन्हा चालू केला पण तरी पेटेना. नंतर पंप उपसून बघितला. वायसर बिघडलेला दिसला. तोपर्यंत हात सगळे काळेमिट्ट झाले होते. वायसर फिरवून बघितला निघता निघेना. मग तसंच खुपसून पुन्हा चांगलं 20 वेळा पंप मारला. तरी पेटेना. पिना खुपसून खुपसून पिन मोडून गेली तरी रॉकेल काय वर येईना. शेवटी स्टो उलटा केला. पुन्हा सरळ करून खसाखसा चांगला 15-20 वेळा पंप मारला. तरी पेटला नाही. फडकं पेटवून त्यात कोंबलं तरी पेटेना. एव्हाना पेटवा-पेटवीच्या उद्योगाला 2 तास झाले होते. शेवटी विचार करूनही पेटेना म्हटल्यावर स्टो सांदाडीत तसाच ठेवून दिला. हात धुतले आणि बेडवर मोबाइल खेळू लागलो...

भिजवलेले पोहे तसेच त्या चाळणीत पडलेले आहेत आणि कांदा सुद्धा तसाच त्या ताटलीत पडून आहे...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्टो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Look what I shared: मराठी विश्वकोश : खंड २० @MIUI| https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/c...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

पेटवणं एक कला आहे. नावंच कासव आहे मग एवढी शिघ्रता कशाला?
होतील की उद्या परवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

हा हा हा... खरंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

विश्वकोश : खंड २० @MIUI| च्या लिंकला " नो सिक्युअरटी सर्टिफ़िकेट " का येते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप स्फोटक आणि विवादास्पद माहितीने भरलाय तो विश्वकोष. त्यामुळे सरकारने जबाबदारी झटकून टाकली आहे. म्हणून security वगैरे काही नाही त्या सायटीला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

खूप स्फोटक आणि विवादास्पद माहितीने भरलाय तो विश्वकोष. त्यामुळे सरकारने जबाबदारी झटकून टाकली आहे. म्हणून security वगैरे काही नाही त्या सायटीला.

कदाचित असंही असेल. मला माहीत नाही. मात्र माहिती स्फोटक हेच जरा स्फोटक वाटतंय. त्यातील माहिती विवादास्पद आहे, ह्यात शंकाच नाही. या निमित्तानं इथं अनेक त्रुटी सांगताही येतील. जसं की, संदर्भग्रंथांचा अपुरेपणा, संदिग्ध व्याख्या-माहिती, नेमकेपणाचा अभाव, लागलीच जोडमुद्द्यांकडे वळण्यातील अवघडपणा, अडलेला शब्द पाहण्याची गैरसोय, मूलभूत माहितीतील त्रोटकता, भाषा वापरातील कठीणपणा इत्यादी. तरीही मराठीतील तथाकथित ज्ञानाचा खजिना म्हणजे ‛मराठी विश्वकोश’ ही धारणा आजही बहुतांश ठिकाणी कायम आहे. मराठी भाषेच्या संवर्धनातील तो एक मैलाचा दगड ठरावा इतका महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून त्याकडे जरूर पाहता येईल. मात्र https://marathivishwakosh.org या नव्या साईटद्वारे उर्वरित अपेक्षांची कितपत पूर्तता होतीय, हे सांगणंही तूर्त धोकादायक ठरू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

मोबाइलमध्ये अशी वार्निंग आली की मी ती साइट उघडण्याचं टाळतो. मोबल्याचा जीव इवलुसा त्यात वाइरसचा बोजा नको या भितीने.
बरं तो विश्वकोश कोणाचा? - १)साहित्य संस्कृती मंडळ वाईचा? / २) केतकरांचा?
---
तसं केतकरांच्या घरावरही मोर्चे आलेले आक्षेपार्ह लेखन केलं म्हणून. ते म्हणाले तुम्ही उलट पुरावे द्या, तशा नोंदी लिहितो. मग काहीच पुरावेबिरावे कोणी देऊ शकलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साईट उघडण्याचा धोका टाळण्यासाठी ‛Marathi Vishwakosh’ हे app वापरता येईल.

बरं तो विश्वकोश कोणाचा?

साहित्य संस्कृती मंडळ वाईचा.

तसं केतकरांच्या घरावरही मोर्चे आलेले आक्षेपार्ह लेखन केलं म्हणून. ते म्हणाले तुम्ही उलट पुरावे द्या, तशा नोंदी लिहितो. मग काहीच पुरावेबिरावे कोणी देऊ शकलं नाही.

हे कधी ऐकून नव्हतो. पुरावे दिलेले सांगितलेही गेले नसतील, असंही असू शकतं. कारण तो काळ पाहता पुरावे हमखास दिले गेले असावेत असा माझा कयास आहे. तसा मी केतकरांचा विश्वकोश कधी वाचायचा प्रयत्न केला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

आईला फोन केला अन् सगळं विचारून घेतलं

पुरानी यादे.. हाय!
सध्या यूट्यूब ही माझी स्वयंपाक-आई आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राम,बुद्ध,जिझस यांबद्दल चरित्रातील उल्लेख या विरोधात होतं. पण उपलब्ध पोथ्या पुस्तकातले आधार घेतलेत म्हणाले केतकर.
--
आपण भाविक नसलेले लोक मनाला फार लावून घेत नाही पण भाविकांना सत्य पचवणे जड जातं. आदरणीयांचं भलंच व्हायला पाहिजे.
-------
आता या संदर्भांत सरकारने अंग काढून घेतलं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बऱ्याच दिवसांनी फोडणीचा पाव केला. मस्त झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको