बागकामप्रेमी ऐसीकर - २०१९

ह्यावर्षी अंमळ उशीरच झाला आहे, हा धागा काढायला. आमच्याकडे वश्या आला तेव्हाच साधारण नवी नोकरी, थोडा प्रवास वगैरे गोष्टी घडत होत्या.

ह्या वर्षी केलेल्या काही गोष्टी -

१. चार टोमॅटो आणले. जमिनीत लावले. नोकरीच्या पहिल्याच आठवड्यात दोन दिवस गावाबाहेर जावं लागलं आणि तेव्हाच घरी तापमान शून्याच्या खाली जाणार होतं. काचेची मोठी दोन भांडी होती, ती दोन झाडांवर उपडी टाकली. बाकी झाडांवर पांघरूण घातलं. चारही झाडं टिकली. त्यातही दोनच झाडांचे पैसे देऊन, एका कुंडीत दोन झाडं आहेत हे बघून आणलेली होती.

ह्या वर्षी आतापर्यंत पाऊस अधूनमधून आणि चिकार झाला. आता ऊन तापायला लागलं आहे. आणि पुढचं पुढे. पण हे दोन निराळ्या, गावठी वाणांचे, मोसमातले पहिले टोमॅटो.
टोमॅटो

२. गेल्या वर्षी लावलेली रोजमेरी तणासारखी वाढली आहे. तिच्या आजूबाजूची काही झाडं हलवावी लागली.

३. आमच्याकडच्या दुष्काळी हवेत गवत वाढवणं, गवताला पाणी घालणं जिवावर यायला लागलं आहे. त्यामुळे पूर्ण उन्हात असणाऱ्या पट्ट्यातलं गवत खणून तिथे स्थानिक रानफुलं किंवा रोजमेरी, डाळिंबासारखी आमच्या हवेत, कमी पाण्यावर जगणारी, सदाहरित किंवा पानगळ होऊन टिकून राहणारी झाडं लावण्याकडे कल ठेवला आहे. त्यामुळे ह्या वर्षी काम बरंच कमी झालं.

४. बाकी एशियाटिक लिली आता बहरायला लागली आहे. तिचे आणि रानफुलांचे फोटो जरा हवी बरी असताना काढून डकवेन.

५. चिकार पावसामुळे अवकाळी शेवंतीला बहर आला आहे. एकीकडे ऊन वाढायला लागलेलं असताना ही फुलं बघून गारेगार वाटतंय.

६. घरी सक्यूलंट (मराठी?) लावण्याचे प्रयोग सुरू केलेत.

७. ह्या वर्षी दोनदा मुसळधार पाऊस, वादळं वगैरे प्रकार झाले. त्यात ह्या टोमॅटोंचीही थोडी वाताहत झाल्ये. म्हणून आत्ताच दोन पानं काढून नवी रोपं बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भर उन्हाळ्यात आहेत ती झाडं दगावलीच तर शरद-हेमंतात ह्या नव्या कलमांचे टोमॅटो मिळाले पाहिजेत.

field_vote: 
0
No votes yet

https://lh3.googleusercontent.com/XiLfc51IQR2tQPf3qPjkpwusD845IxwM1_HKuG80PD010GEfdGUCzk--cgQefqLJznm-ki5zHrVQh4NJMiuJnGOAhQ-UFFdxwv79-aS6X9pdjKsZpPPP5g-Q4OJd_n8ficswDkpR5qXOa4u25MombJjEMnxeR6OtL5fsyoXX8baVn-cDjrCgWgl7AAhvIziA6ya5C6WjgoxLUmyv5ocwaMadmHfMQ_PnhBeoWpXnSYNtXGyVKT5oE50OlI6aEKqUmdUMrYDq_hPkP__IQgUNw3j4C1DXHYkMu8wrmBzATZNGn-ZgghU-kOHEkBrBMWL_Y3YobY6wVfJF4X8eToD35T8NfIyuy5ISrwQGhHVFgrJAMlWcjYhh8-S2u1QJHWmU3S0x_Kcmopv38n1CxgNXWK-QlE2VDrblxQvRv8itRch_9e248Bem65_U8rcYf04ZB7RuXGG3H4-yDCBLs8ylddLluxLv_n00v7HCl9T1tDQSPr3artIclUTUankxVaP3OnxOHfQ8oeA_WrwtITbTIx3uerHEAHiKsGHaiaRiVkA1wfyDXPuHX4p1ujBF5Rae6SdUjPMUp7oZyjZ0cbVeB7Eq14wdUClt3FKX7reTI0Tla37oZiCj-eh3H-PTc368S6Z_BR6hnPlQkkaKKF27xyttoe0-g-7h=w834-h625-no

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

डावीकडून दुसऱ्या कुंडीत बोनसाय लावल्यासारखं वाटतंय, खालच्या झाडामुळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता तुमचा अलपान्चो (गिनिपिग) खालच्या ट्राफिकची मजा बघेल.
SmileSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते नाही आले.त्यांना मुलीच्या मैत्रिणीने दत्तक घेतले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

झकास.
-----------
भात कोवळे असताना मुनियांचे लक्ष गेले नवहते, आता एक जोडी येतेय पण उशिर झालाय. तरी तयार दाणे चावून चावून खातात. बुलबुलची जोडी शेव खायला येत असे पण एकदा जाळीत एक जण अडकल्यावर धसका घेऊन येतच नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण एकदा जाळीत एक जण अडकल्यावर धसका घेऊन येतच नाहीत.

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

गेल्या वर्षी लावलेली रोजमेरी तणासारखी वाढली आहे. तिच्या आजूबाजूची काही झाडं हलवावी लागली.

थोडी रोजमेरी घरातल्या घरात वाळवणे आणि आमच्यासाठी ठेवणे.

There’s rosemary, that’s for remembrance; pray, love, remember; and there is pansies, that’s for thoughts...
There’s fennel for you, and columbines; there’s rue for you, and here’s some for me; we may call it herb of grace o’ Sundays. O, you must wear your rue with a difference. There’s a daisy. I would give you some violets, but they wither’d all when my father died. They say he made a good end.
― William Shakespeare, Hamlet

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आताही चिकार पाऊस झाल्यामुळे ती पुन्हा तणासारखी वाढणार आहे. पुन्हा कापायची वेळ लवकरच येईल. गेल्या वर्षी लावली तेव्हा जेमतेम वीतभर उंच आणि वीतभर घेर असेल. आता माझ्या कवेत मावणार नाही एवढी वाढल्ये.

आजच सकाळी रोजमेरीच्या काही तरण्या काड्या कापून आपल्या एका आंजामित्राच्या घरी पाठवल्या. (ह्या आंजामित्राचं नाव सांगून उगाच त्या निरागस जिवाला बदनाम नको करायला!)

सावलीच्या भागात गवत वाढवण्याजागी तिथेही फुलझाडं, शोभेची झाडं लावत्ये. त्यांत दोन कोलंबाईन आहेत. कुंडीत लावलेली पॅन्सी आता इतर झुडपांच्या सावलीत हलवता आल्यामुळे ती अजून तरी आहेत. रोज पाणी घालताना एखादं फूल दिसतं. गेल्या वर्षी लावलेल्या शास्ता डेझ्यांपैकी एक जगली. तिच्यासमोर एक वार्षिक झुडूप मोठं वाढलं, त्या सावलीनं डेझीला भर उन्हाळ्यात जिवंत ठेवलं. सध्या तिलाही फुलं आहेत. रानफुलांमधली एंगलमन्स डेझीही तणासारखी वाढली आहे आणि आता तिला फुलं आहेत.

तुझ्या यादीतलं फेनल नाही आणि व्हायलेट्स नाहीत. आफ्रिकन व्हायलेट्स घरात लावायचा विचार आहे.

सध्या ही सगळी फुलं फुलल्येत, आता फोटोचा मुहूर्त शोधायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लवेंडर (वाळलेलेसुधा) नको काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन घरातल्या गच्चीत बाग करायचीय म्हणतेय. बाग म्हणणं जरा ठुसक्या टेकडीला हिमालय म्हणण्यासारखं होईल पण तरीही, तर कुंडीतच घेता येतील अशा आणि पुण्यातल्या हवेत नीट चांगल्या पोसतील, जगतील अशा भाज्या आणि मसाले सुचवा, फुलं लावेनच त्याबद्दल माहीत आहे.
(गच्चीत/बाल्कनीत सूर्यप्रकाश भरपूरच येतो, त्यामुळं ती चिंता नाही आहे, पाणीही बरं आहे, पाऊसही डायरेक्ट लागेल रोपांना.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

सुरुवात करण्यासाठी लाल/हिरवा माठ,अळू आणि पालक.
( उगाच नर्सरीत बियाणे शोधू नका.) भाजीच्या लहान पेंड्या आणून त्यातल्या पाचपाच काड्या /शेंडे स्वच्छ धुऊन एका कुंडीत लावा. तीन दिवस प्लास्टिक पिशवी उलटी झाका.
अळुकुड्या थोडे कोंब असणाऱ्या आणून एका कुंडीत तीन लावणे. सहा पुरे. हे भाजीचे अळू. वडीच्या अळुच्या गड्या कुणाकडून आणाव्या लागतील. एखाद्या लाटमधील अळकुड्या उकडून खाजऱ्या नाहीत हे खात्री झाल्यावरच लावणे.
पालक - मुळे असलेली लहान जुडी आणून त्यातल्या काडया लावणे. लांबट गोल पाने असणारी आणि म्यापवर लोकेशन दाखवतो तशा आकाराच्या लहान पानांची अशा दोन जाती असतात.
मसाला - आले -ज्यास टोकदार कोंब दिसतो तो एकदीड इंचाचा तुकडा
मातीत आड्वा लावणे. कोंबाच्या दिशेने ते वाढते असे कुंडीत कडेला लावणे. आता लावल्यास कुंडीभर व्यापेल तेव्हा सहा महिन्यांनी काढावे.
पुदिना - काळा दर्प येणारी जुडी आणून पाने वापरायला काढून घेऊन काड्या मातीवर आडव्या ठेवून जरा मातीने झाकणे. दोन चमचे गांडुळखत कमाल करेल.
मिरची/टमाटे/झेंडु - तळाशी अर्धी कुंडी शेणखताने भरून वर अर्धी माती व त्यावर चारपाच बिया टाका. झेंडुचे सुकलेले मोठे फूल चुरून टाकणे. रोपे उगवल्यावर एकेका कुंडीत तीनचार ठेवून बाकी काढून टाकणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0