मेकअपरूम मधली कविता

गर्भार राहिलो
वाढू लागलं पोट
उंची वाढली सरळसोट
कणाकणानं कणाकणानं

पारदर्शी पोटाचा आकार
ताणलेला अर्धगोल
डोकावले त्यातून
भरजरी भरजरी
प्रकाशझोळ प्रकाशझोळ

गर्भात वाढवला
चंद्र चंद्र
वेदनेचे सप्तक
मंद्र मंद्र

वेळ भरता , घटिका येता
चंद्राला दिला
जन्म जन्म
धवळप्रकाशी
कर्म मर्म

एक्झॅकटली खिडकीच्या
तावदानातून दिसणाऱ्या चंद्रासारख्याच चंद्राला
थरथरत्या बाहूत घेऊन
निपचित पहुडलो
मेकपरूममधल्या
आरामखुर्चीत
झोपेच्या मेण्यात
निश्चेष्ट निश्चेष्ट
----
हे असलं काही सुचत असताना
काचेच्या तावदानातून
चंद्र आमच्या मेकअपरूम मध्ये
डोकावून पाहतोय

या तात्पुरत्या उभारलेल्या
हॅम्लेटच्या मेकअपरूम मध्ये
नवीनच जॉईन झालेली
लठ्ठ मुलगी सर्व नटांचे
मेकअप संपवून
स्वतःच मेकअपतल्लीन झाली आहे
तिच्या गोलसर चेहऱ्यावर
पावडरीचे थर साचताहेत
आतून हॅम्लेट , होरेशिओ आणि
ऑफेलियाचे संवाद ऐकू येत आहेत!

आपण आपल्या आरामखुर्चीत रेलून
एन्ट्रीची वाट पाहत आहोत ! बस्स !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आपण आपल्या आरामखुर्चीत रेलून
एन्ट्रीची वाट पाहत आहोत ! बस्स !

आवडली. मला वाटतं नटाच्या मानसिक स्थितीचा, एक क्षण टिपून कवितेत बद्ध केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0