ती लेस्बिअन आहे?

मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत. माझंही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळाली. माझे क्लासमेट उच्च पदांवर वेगवेगळ्या खात्यात क्लास थ्री पासून ते सुपर क्लास वन अधिकारी बनले होते.
मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करत होतो. सोबतच शेजारच्या गावचा माझा बॅचमेट व जवळचा मित्र नोकरी करत होता.
अगोदर वेगळ्या जिल्ह्यात नोकऱ्या करून एकाच तालुक्यात बदलून आलो होतो. मित्र जिल्ह्याच्या ठिकाणी रहात होता व मी माझ्या हेड क्वार्टर ला रहात होतो. एकमेकांच्या घरी जाणे येणे होत होते. आमचं मुळ गाव दूसऱ्या जिल्ह्यात होते व नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात करत होतो. मी मित्राच्या लग्नाला गेलो नव्हतो. पण आता वहीनींशी ओळख झाली आणि वहिनी बोलघेवड्या, अतिथ्यशिल स्वभावाच्या होत्या. एके दिवशी वहिनींनी त्यांच्या बहिणीला स्थळ बघा असं सांगितलं. ती आमच्याच डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या तालुक्यात काम करत होती. तिचं नाव विजया. विजयाचा घटस्फोट झाला होता. तिचा नवरा डॉक्टर होता पण पटत नव्हतं म्हणून त्यानं तिला सोडून दिले होते.
मी एक-दोन स्थळं सुचवली पण वहिनी आणि विजया यांना आवडली नाही. विजया व तिची एक मैत्रीण महाश्वेता नावाची, जिला सर्व श्वेता म्हणत यांची घट्ट मैत्री होती. श्वेता मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगी होती व ती पण विजयाच्या ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करत होती. या दोघी आमच्याच कॉलेज मध्ये पाच-सहा वर्षांनंतर शिकलेल्या होत्या व नोकरीतही ज्युनिअर होत्या. विजया मुळे श्वेताची ओळख झाली. तिची हकीकत म्हणजे ती लग्नच करायचं नाही या मताची होती. तिचे आई-वडील,भाऊ तिच्या विनंत्या करून थकले होते पण ती लग्न करायचं नाही यावर ठाम होती. जर माझं बळजबरीने लग्न लावलं तर मी दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या घरातून कायमची निघून येईन असं ती आई-वडिलांना सांगत असे. श्वेताचं वय तीस होऊन गेले होते व तिच्या घरच्यांनी लग्नाचा विचार मागे टाकला होता. विजया आणि श्वेता प्रत्येक वेळी बरोबरच असत. दोघींना एकमेकींशिवाय अजिबात गमत नसे. श्वेता तिच्या कार्यालयातील बिनलग्नाच्या मुलींना सुध्दा लग्न करु नका. नवऱ्याची कायमची गुलामी करत रहावे लागते असं ब्रेनवॉशिंग करते हे कानावर पडले होते.
एक दिवस मी जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी गेलो होतो. खूप उशीर होणार होता. म्हणून मित्राला फोन करून विचारले की मुक्कामाला येत आहे. तो आनंदाने या असं म्हणाला. मी काम संपवून त्याच्या घरी गेलो तर तिथे विजया आणि श्वेता दोघीही मुक्कामी आलेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर मी एका खोलीत झोपायला गेलो. मित्र व वहिनी दुसऱ्या खोलीत, तर विजया आणि श्वेता हॉलमध्ये झोपणार होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मी पाच साडेपाच वाजता निघालो तर हॉलमध्ये विचित्र गोष्ट पाहिली श्वेता आणि विजया एकमेकींच्या मिठीत पायावर पाय टाकून झोपलेल्या होत्या. अंगावर पांघरून नाही आणि अशा अवस्थेत गाढ झोपेत होत्या. मी मित्राला आवाज देऊन उठवलं व बाहेर पडून मोटारसायकल चालवत माझ्या घरी आलो.
नंतर महेश हा ज्युनिअर सहकारी आमच्या कडे बदलून आला. तो खूप जॉली आणि हरहुन्नरी गडी होता. त्याच्या बरोबर ट्रेकिंग ला जाणं, दारु पिणं, निरनिराळ्या ठिकाणी खादाडी करणं खूप आनंददायी होतं. लहान असला तरी वाचन दांडगे होते आणि शेरोशायरी सारखे छंद त्याला होते. त्याच्या झायलो गाडीतून सुटीच्या दिवशी लांब लांब फिरायला जात असू. असंच एकदा महेश आणि मी दोघंच फिरायला गेलो होतो. बोलता बोलता मित्राच्या मेव्हणीचा विजयाचा विषय निघाला. तर महेश म्हणाला ती आणि मी बॅचमेट आहोत. तिच्या लग्नाची गोष्ट काढताच तो म्हणाला कॉलेजमध्ये ती कोणत्याही मुलाशी बोलली नाही की प्रेम, मित्र काही नाही. ती आणि तिची मैत्रिण दोघींना सगळी मुलं लेस्बियन म्हणायचे.
आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे विजया आणि श्वेता लेस्बिअन आहेत तर..

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

कथेच्या सुरुवातीचे तपशील कथानकात पुरेसे घट्ट विणल्यासारखे वाटले नाही.

म्हणजे बॅचमधल्या लोकांची सरकारी नोकरीतील टक्केवारी, वहिनींचा स्वभाव -- यांनी वातावरणनिर्मिती, पात्रपरिचय होतो, तो कथावस्तूला खुलवणारा आहे का? तो तसा करता येईल का? वगैरे धागे विणणे अजून पक्केअसायला हवे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गावाकडे असूनही एवढ्या लहान वयात आपल्याला समलैंगिकतेची जाणीव मुलीला असणं म्हणजे बैडैस्यच म्हणलं पाहिजे. ते आणखी विस्तारानं मांडलेलं वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.