विसरुनी गेलो होतो

विसरुनी गेलो होतो
ना कधी स्मरले
तू उल्लेख करुनी
भान तयाचे आणिले
तू सतत खत पाणी घातले
अन भिन्नतेचे झाड वाढविले
जाणीव करूनी दिली
की मी वेगळा तू वेगळी
पण तत्पूर्वी मज मनी
होते समभाव आपुलकीचे
ना कधी जाणली जात तुझी
धर्म तुझा, वा लिंग तुझे वेगळे
तू सतत बिंबवूनी मनी
वेगळेपण ते हेरले
लावूनी चुरस श्रेष्ठ कनिष्ठतेची
तू विष मनी पेरले
एकाच आईची लेकरे
वैरी कट्टर बनविले
विसरुनी गेलो होतो
तू भान तयाचे आणिले
आता कसे एक करशील
भिन्न झाल्या सर्व दिशा
एकच सूर्य प्रकाश देतो
तरीही आकाश विभागले
सर्व जनासी या देशा

field_vote: 
0
No votes yet