सिंधुआज्जींचे वीकेंड होम

शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यामुळे सिंधुआज्जी आणि स्लाॅथ्या नेहमी वीकेंडची वाट बघत असतात. "दूरदेशी गेला स्लाॅथ्या, आणि सिंधुआज्जी" टाईप दौरे नसतात तेव्हा मनीमाऊ, काकाकुवा, फिशटॅन्कमधले मासे, सुहासिनी, तरस बल्बा, पाणचेतक, ......, पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा हे सगळेच आर्जवून आणि आवर्जून सिंधुआज्जींच्या वीकेंड होमला जातात.

टुमदार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एका उत्तुंग गावात सिंधुआज्जींचं वीकेंड होम आहे. वाऱ्याची झुळुक आली की अंगणातले बाओबाब डोलू लागतात, आणि त्यांच्यावर राहणारे शाखामृग आणि शहामृग बोलू लागतात. पुरेशी पार्किंग स्पेस असल्यामुळे सिंधुआज्जीही तिथे गेल्या की खूष असतात.

घरामागे धोत्र्याची शेती आहे. उपरिर्निदिष्ट वाऱ्याची झुळुक आली की अवघे शेत जांभळी निळाई मिरवत लेफ्ट-राईट-लेफ्ट करते.

एका बाजूला आमराई आहे, आणि स्लाॅथ्यासाठी खास बांधून घेतलेली मधाची पोळीदेखील आहेत. ("रोजरोज पोळी शिकरण" हा स्लाॅथ्याचा आवडता मेनू आहे.)

पाणचेतक, ...., पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा यांना डुंबण्यासाठी सिंधुआज्जींनी एक पर्वतदुहिता बांधून घेतली आहे. फिशटॅन्कमधल्या माशांनाही तिथे हवापालट करता येतो. आणि बुद्रुक बाजूला सुहासिनी आणि तरस बल्बा यांना शिकारीसाठी मोकळे रान आहे.

पश्चिमेला पक्षीघर आहे आणि काकाकुवा आल्यावर सर्व उडुगण "काकाकुवा मला वाचवा" असे चीत्कारत त्याचे स्वागत करतात. आणि पंचक्रोशीतील बिळांतील आणि पिंपांतील उंदीर मनीमाऊला बघून "माझ्या मनीचे हितगुज सारे" वगैरे गुंजारव करू लागतात.

विजेच्या तारांचा उपद्रव नको म्हणून सिंधुआज्जींनी ऊर्जेसाठी एक वातचक्की बांधली आहे, आणि वाऱ्याची दिशा समजावी म्हणून घरावर एक पवनकुक्कुटही बांधला आहे.

अशा शांत ठिकाणी आपले वीकेंड व्यतीत करून सिंधुआज्जी आपल्या बॅटरी रिचार्ज करतात, आणि धकाधकीच्या जीवनाचा सामना करण्यासाठी पुन्हा मुंबईला येतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अंगणातले बाओबाब, त्यावरचे शाखामृग आणि शहामृग...
अहहाहाहा
एकूणच सर्वच भारी.
हॉटेल ट्रान्सिल्वेनियाच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंधुआज्जी ही एक आख्यायिका आहे का? उगम कुठे? ब्रम्हे राहतात त्याच शहरात राहतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मस्थळ ठाऊक नाही. सध्या वास्तव्य मुंबई आणि 'काॅर्न टिक्की' हा तराफा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0