उर्फ

मुळ नाव सोडून दुसऱ्या नावानं बोलवण, बोलण, ओळख करून देणं, ओळख असणं किंवा स्वत: स्वत:ला ठेवणं, टोपणनाव, उर्फ नामकरण. फार कष्ट न करता आर्ध्या नावापुढ अर्धा "या" जोडला की झालं काम, आद्या, आज्या, नव्या, अभ्या अन् महिला मंडळासाठी "ॊ" इ इ.. (अपवाद काढायला हैतच मंडळी). पुढचा प्रकार बायोमेट्रिक ट्रेट्सवर, इकबाल, टकलं, चमण, चाँद, घसरगुंडी, नकटं, पोपट, मैना, भोंगा, लाऊडस्पिकर, काळ्या, कावळ्या,पांढरीपाल, इंग्रज, गा(घा)णकोकिळा, चकणं, बांगं, तिरळं, काणं, बचाळं, उकरी, बोळकं, बेडूक, उंट, जिराफ, टंगाळ, बाटूक, ढबरं, चिपाड, लंगड, आंधळं, बहिरं, चिडकं, लाजाळू, हावरं, डजगं, हरीशचंद्र व इतर. जातीवर पण. सामान्य टोपणनावं भाऊ, दिदी, दादा, आण्णा, काका, मामा, मामी, मावशी, सासू, सासरा.. नट, नट्या, खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती ह्यांचे विविध प्रसारमाध्यमांतून होणारे नामकरणं. समाज माध्यमांवर वावरताना ओळख लपवत स्वत:ला ठेवलेली नावं. आडनावावरून जात, गाव ओळखू येण्यासाठी जोडलेली शेपटं..
टोपणनावं वापरताना परिस्थिती बघून वापरले जातात. रागा/लोभात, ओळख/अनोळखी अन् प्रसंगात मत/भावना व्यक्त करायला टोपणनावं उपयोगी ठरतात.
मोबाईलवर टंकायचा कंटाळा आला, ठूतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आजचं ज्ञानदान संपलं, मी पुन्हा येईल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

भांबड आलं