बेअरलाऊख पेस्टो व पास्ता

अ‍ॅलियम अर्सिनम, रॅमसन्स ,वाइल्ड गार्लिक,ब्रॉड लिव्ड गार्लिक अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या बेअरलाउखच्या जुड्या आठवडी बाजारात साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दिसायला लागतात. ह्या पानांचे करतात तरी काय? असे आमच्या त्सेंटा आजीला विचारले असता तिने सांगितले याची पेस्टो करतात. ही पाने फक्त मार्च,एप्रिल मध्येच मिळतात म्हणून त्याची पेस्टो वर्षभर टिकेल अशी करुन ठेवता येते. हिरव्या रंगाची ही पेस्टो न्यूडल्स, पास्ता,सलाड, सूप इ. मध्ये वापरतात. ही पाने रानात भरपूर उगवतात पण अजून एक दोन प्रकारची पाने अगदी अशीच दिसतात आणि फसायला होतं, ही दुसरी पानं विषारी असतात त्यामुळे रानातून बेअरलाउख आणण्याचा अतिउत्साह न दाखवता आठवडी बाजारातूनच जुड्या घेण्याची सूचनाही केली.

पेस्टो करण्याच्या अनेक पध्दतींपैकी ही एक-
१जुडी वाइल्ड गार्लिक,
८-१० बदामबिया/काजूबिया
१ आक्रोड फोडून
१०-१२ पाइननट्स, २ चमचे सूर्यफूलाच्या बिया, २ चमचे भोपळ्याच्या बिया- (जर ह्या बिया उपलब्ध नसतील तर बदाम/काजू वाढवणे.)
१ वाटी किसलेले पार्मेसान चीज. (जर पार्मेसान उपलब्ध नसेल तर ग्राना पदानो चीज )
६-७ मिरी, १/२ चमचा मीठ, १ चमचा लिंबूरस ( एका फोडीचा रस) ,
साधारण १/२ वाटी सनफ्लॉवर ऑइल
१/२ वाटी ऑलिव्ह ऑइल
वाइल्ड गार्लिकची पाने धुवून एका फडक्यावर घालणे. पानातले पाणी टिपून घेणे.
बदाम, आक्रोड, पाइन नट्स, सुर्यफूल, भोपळा इ. बिया कोरड्याच हलक्या भाजून घेणे.
पाने मिक्सर मधून भरड वाटणे, त्यात ह्या रोस्टेड बिया घालणे आणि परत वाटणे.
मीठ, मिरपूड, चीज ,अर्धे तेल घालणे आणि वाटणे,चटणी सारखे व्हायला हवे.
आता हे मिश्रण वाडग्यात काढून घेणे, उरलेले तेल घालून कालवणे. लिंबाचा रस घालणे.
घट्ट झाकणाच्या बाटलीत भरणे. पेस्टो भरुन झाली कि वरुन परत तेल घालणे.
हवे तेव्हा पेस्टो काढून घेतली की परत तेल घालून ठेवणे म्हणजे पेस्टो टिकते.(आपण लोणचं टिकायला कसे जरा जास्त तेलाची फोडणी वरुन ओततो तसे.)

ही पेस्टो वापरुन अनेक प्रकारच्या रेसिप्या बनवता येतात, त्यातीलच हा एक पास्ता-
२ वाट्या पास्ता(पेन्नं किवा फुसिली), अर्धी वाटी जाडसर किसलेले गाजर, अर्धी वाटी मटारदाणे, २ चमचे बेअरलाउख पेस्टो,
२चमचे ऑलिव्ह ऑइल,१ ते १.५ कप दूध, २चमचे मैदा,चवीनुसार मीठ व मिरपूड, हवी असल्यास एखादी हिरवी मिरची आणि पेरभर आल्याचा तुकडा
पास्ता शिजवून घ्या आणि चाळणीवर टाकून निथळत ठेवा.
ऑलिव्ह ऑइल वर गाजर आणि मटार परतून घ्या.हवी असेल तर एक हिरवी मिरची बारीक चिरुन घाला,आले किसून घाला. मीठ व मिरपूड घाला आणि चमचाभर पेस्टो घाला.
दूधात मैदा विरघळवून घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका. त्यात चमचाभर पेस्टो घालून चांगले ढवळून एकजीव करा.
आता हे मिश्रण परतलेल्या भाज्यांवर ओता व ढवळा. शिजत आले की त्यात पास्ता घाला व एक वाफ काढा.
बेअरलाउख पास्ता तयार आहे. खाताना हवे असल्यास पास्त्यावरही पेस्टो घेता येईल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचलो! आधीच इतालियन आवडीचे त्यात नवनवीन चवींचा पास्ता!
फोटो हाफीसातून दिसत नसल्याने अवेळी भूक लागण्यापासून वाचलो असे वाटतेय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झकास

करुन पाहीन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

>>१/२ वाटी सनफ्लॉवर ऑइल
१/२ वाटी ऑलिव्ह ऑइल<<

मी (करून आणि/किंवा खाऊन) पाहिलेले पेस्टो फक्त एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवलेले होते. त्यांना त्या ऑलिव्ह ऑईलची मस्त चव आली होती. इथे सूर्यफुलाचं तेल अर्धं घालण्यामागे काही विशिष्ट प्रयोजन आहे का? भारतात आणि परदेशात सहज मिळणारं सूर्यफुलाचं तेल रिफाइंड असतं. ते बर्‍यापैकी बेचव वाटलं होतं म्हणून शंका आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाइल्ड गार्लिकची पाने हळदीच्या पानांसारखी दिसत आहेत. आकाराने मात्र बरीच लहान असावीत.

आत्तापर्यंत पेस्टो फक्त विकतचेच खाल्ले आहे. पास्त्यात फारसे आवडले नाही(अर्थातच मी पास्त्यात कधी मिरची-आले टाकले नाही हा नवीन प्रयोग आवडेलही कदाचीत), म्हणून भाजलेल्या कुरकुरीत ब्रेडवर पसरून खाल्ले आहे, पण करून बघायला आवडेल. करताना आवडीप्रमाणे त्यातील तेल, बीयांचे प्रमाण कमी-जास्त करून बघायला आवडेल. कोथिंबीरीची चटणी करतो, त्याप्रमाणे बदामाऐवजी/बरोबर दाणे, डाळं किंवा दही घालून प्रयोग करायला आवडेल.

बाकी फोटो मस्त आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@सानिया,पूर्ण पेस्टो बुडेल असे तेल वरुन घातले आणि थंड जागी(फ्रिजमध्ये )ठेवले तर ते वर्षभर सहज टिकते. हवे तेव्हा काढले की परत आत ठेवताना वर तेल ओतायचे.भाजलेल्या बागेतवर पेस्टो मस्तच लागते.:)
@चिंतातुर जंतु, पेस्टो बनवण्याच्या अनेक पध्दती आहेत. पार्मेसान ऐवजी काही जण इतर कोणतेही हार्ड गोट चीज घालतात तर काही जण चीज न घालता ऑलिव ऑइलचे प्रमाण वाढवतात.
ह्या रेसिपीत जे तेल वरुन परत परत ओततो ते ऑलिव्ह तेलच असते. पेस्टो बनवताना १/२ सूर्यफूल तेल + १/२ ऑलिव्ह ऑइल वापरण्याचे कारण कदाचित ऑलिव्ह ऑइलची किं हे असावे.
आमच्या त्सेंटाआजीच्या रेसिपीनुसार मी पेस्टो गेली २/३ वर्षे बनवते आहे.चव उत्तम येते आहे. विकतच्या पेस्टो सारखीच लागते आणि ती वर्ष-दिड वर्ष टिकतेही आहे.त्यामुळे मग २-३ वर्षे हीच रेसिपी फॉलो करते आहे.
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0