जाळीदार गवाक्षे

ऐसी अक्षरेच्या सध्याच्या मुखपृष्ठावरील जाळीदार गवाक्ष पाहून याची आठवण झाली-

हे औरंगाबादच्या 'बीबीका मकबरा' मधलं गवाक्ष. फोटो मीच काढलेला आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

हा फोटो मला फाफॉ११.० + विन ७ वर दिसतो आहे.
पण त्याच पीसीच्या आयई९ वर दिसत नाहीये. काय भानगड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरनेट एक्स्प्लोरवर प्रतिमा दिसायला अडचण येते आहे अशी तक्रार इतर काही सदस्यांनीदेखील केली आहे. त्यामागचं कारण किंवा अडचणीवर उपाय मात्र ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

याचा तात्पुरता उपाय सापडला आहे तो असा:
प्रतिमा इथे चढवताना जो एचटीएमेल कोड वापरला असेल त्यात width आणि height असे दोन पर्याय देता येतात. जे पर्याय (width, height किंवा दोन्ही) वापरलेले नसतील त्यांचा कोड काढून टाकणे. आत्तापर्यंत ज्यांना प्रतिमा दिसण्यात अडचण येत होती ते या गोष्टीची खात्री करू शकतील का? (त्यासाठी माझी खरडवही उपलब्ध आहेच.) माझ्याकडे आय्.ई.वर संपादन करून या प्रतिमा दृष्यमान झालेल्या आहे.

शिवाय दर्शनी पानावरील चित्राबद्दलही अशा प्रकारची तक्रार होती, त्याचीही खात्री करून घेता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येथे व मुखपृष्ठावरील चित्रे दिसत आहेत.
सोकाजींच्या धग्यावरील चित्रेही दिसत आहेत्...ईतर धागे उघडून बघितले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! कातरलेल्या प्रकाशाचे 'छाया'चित्र खूपच आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेच शब्द डोक्यात आले होते. मुखपृष्ठावरच्या चित्रातली नक्षी स्वतंत्र अस्तित्व दाखवते, तर या चित्रातली नक्षी पार्श्वभूमी कातरून, झाकलेल्या भागांतून दिसते.

मध्यभागातून फोटो घेतल्यामुळे आत येणाऱ्या प्रकाशाला फाकलेल्या झोतांचा परिणाम येतो. एक गतिमानता जाणवते. काही कॅमेरांमध्ये फोटो काढताना झूम इन करण्याची सोय असते. तसा परिणाम या चित्रात जात्याच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याकडेपण Internet explorer आहे. मला फोटो दिसतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या शब्दांवर क्लिक करा - म्हणजे दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आवडला. कोरलेल्या भिंतीच्या बाहेरून आतल्या बाजूला प्रकाश कमीकमी होत जातो आहे त्यामुळे एक प्रकारची गती आणि टाईम ट्रॅव्हल प्रकारचा परिणाम वाटतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छायाचित्र फार्फार आवडले. चित्राच्या केंद्रभागी असलेल्या प्रकाशाचा तीव्र उतार चित्राच्या कडांकडे घसरत गेल्यासारखा होत असल्याने चित्राला 'सत्यकथे' तल्या कथांप्रमाणे 'टोक' आले आहे. १/१७/२००८ ही चित्रातील खालच्या उजव्या कोपर्‍यातील पिवळी तारीख आयुष्याची निरर्थकता दाखवते. १/१७ म्हणजेच १७/१. कुणी सत्यदेव म्हणतात तर कुणी सत्यनारायण.तारखेचे पिवळेपण चित्राला एक कावीळी उदात्त अध्यात्मिक डूब देऊन जाते. श्रीखंड खावेसे वाटू लागते. चित्राचे खरे यश ते हेच. श्रीखंड.किंवा आम्रखंड. चित्राला 'जाळीदार गवाक्षे' च्या ऐवजी 'देसाई बंधूंचे आंब्याच्या फोडी घातलेले आम्रखंड' असे शीर्षक का देऊ नये? पण पुन्हा तेच. गवाक्ष म्हणजेच आम्रखंड. वा! या सांकेतिकतेमुळे चित्र पुन्हापुन्हा पहावेसे वाटते. आम्रखंड पुन्हापुन्हा खावेसे वाटते. वा!

(नाना, मनावर घेऊ नका. ही केवळ टवाळी आहे. टवाळा आवडे विनोद. एजंट विनोद, विनोद खन्ना, विनोद मेहरा, महर्षी विनोद!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

खास पावसहून देसाई बंधूंचे आम्रखंड येते आहे. (खरेच!) १०० वर्षे आयुष्य आहे तुम्हाला... तारखेचे काय घेऊन बसलात? दररोज आम्रखंड खात खात जगू शकता. त्याला निरर्थक का म्हणता?
(देसायांनी हवाबंद डबे तयार केलेत. शिवाय काही सत्यदेवांनी डायबीटीजवर गोळ्याही शोधल्या आहेत. म्हणून आयुष्य अधिकच सार्थक होत चाललेले आहे.)
मग कधी येता? चापूया! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छायाचित्र खूप आवडलं. टक लावून पाहत राहिलं, की एक सुरेख रांगोळी वेगाने माझ्यापासून मागे खेचली जातेय, आणि क्षणातच वेगाने येऊन चेहर्‍यावर आपटणारेय की काय असा भास होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिडक्या, झरोके, स्क्रिन्स खासच!

सिद्धी सय्यद मशीद अहमदाबाद, बाहेरुन
फोटो - विकीपेडिया


आतून

फोटो जालावरुन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0