जगण्यातून उमललेली.... जगताना आकळलेली !!

माझी आवड्ती कविता.... सर्वांसाठी!

कालकुपी

दिशादिशांतुन स्वत:ला विस्तारताना
क्षितिजावर
अनंत लाटा उठतात ...

किनार्‍यावर येताना
आघात
प्रत्याघात
एकमेकात मिसळून
अखेर सर्व एक होतात ...

अंधारलेल्या हृदयाच्या
अदृश्य तळाशी
वर्षानुवर्षं
आतल्या आत कुठेतरी
आजपर्यंत दडून राहिलेली
कालकुपीतील
रक्तांकित अक्षरे पुन्हा जिवंत होतात ...

(मनाचे डोह - गोविंद कुलकर्णी - मौज प्रकाशन - पहिली आवृत्ती: फेब्रुवारी १९८२ - किंमत: रु.१६/-)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चित्राताई, कविता छान आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0