कॉकटेल लाउंज : बार्ने स्नॅच (Barney Snatch)

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बार्ने स्नॅ (Barney Snatch)

पार्श्वभूमी:

फार वर्षांपूर्वी पूजा भट आणि नागार्जुन ह्यांच्या एका चित्रपटातल्या गाण्यात मालिबू बघितली होती. तेव्हा कॉलेजात होतो त्यामुळे फक्त बघण्यावर समाधान मानून मोठेपणी कधीतरी मालिबू विकत घ्यायची ठरवले होते. Smile

ही मालिबू , नारळाचा तडका (ट्वीस्ट) देउन मस्त गोड चव आणलेली कॅरेबीयन व्हाईट रम आहे. एकदम मलमली पोत (Texture) असतो ह्या मालिबूला. उन्हाच्या काहिलीत 'ऑन द रॉक्स' मलिबू एकदम मस्त थंडवा देते, एकदम गारेगार.

आजचे कॉकटेल हे ह्याच मालिबूचे, वाढत्या उन्हाळ्यवरचा 'उतारा' म्हणून एकदम धमाल आणेल.

प्रकार मलिबू कोकोनट रम बेस्ड कॉकटेल
साहित्य
बकार्डी व्हाईट रम 0.5 औस (15 मिली)
मलिबू कोकोनट रम 0.5 औस (15 मिली)
ब्लु कुरास्सो लिक्युअर 0.5 औस (15 मिली)
ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) 10 मिली
अननसाचा रस
बर्फ
अर्ध्या लिंबाचे काप
स्ट्रॉ
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि लिंबाचे काप घालून घ्या.

आता ग्लासात अनुक्रमे व्हाइट रम, मालिबू आणी ब्लु कुरास्सो ओतून घ्या.

आता ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इफेक्ट यायला हवा.

आता अननसाचा रस टाकून ग्लास टॉप अप करा.
तळाशी लाल, मध्ये निळा आणि वरती पिवळसर अश्या रंगेबिरंगी थरांचा माहोल जमून येईल.

चला तर मग, बार्ने स्नॅच तयार आहे. Smile

रंगीत थरांचा क्लोज अप.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चिअर्स. हा प्रकार वाचून चवीला आवडेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चिअर्स! (आमच्या ग्लासात मॉकटेल असलं म्हून काय झालं?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या टेस्टचा नसला तरी हा प्रकार मला आवडला
कधीतरी नक्की ट्राय करुन पाहीन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ब्लु कुरास्सो लिक्युअर कुठे मिळतं ते सांगु शकाल का हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ब्लु कुरास्सो लिक्युअर कुठे मिळतं ते सांगु शकाल का हो?

पुण्यात कुठे मिळते ते सांगू शकतो.
१. दोराबजी - कॅम्प
२. चौगुले वाइन्स - बाबाजान चौक, कॅम्प
३. मुकेश वाइन्स - बंड गार्डन

लिक्युअर नको असेल तर, ब्लु कुरास्सो सिरप कुठल्याही मॉल मध्ये मिळतो आता.

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चियर्स! एकदा ट्राय करायला हवेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre