फोनवरच संभाषण (संपूर्ण)

प्रथम कथा पूर्ण करायला बराच वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व. संपूर्ण कथा खालील संस्थळावर प्रकाशित केली आहे. आभार.

विरंगुळा (फोनवरच संभाषण)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ब्लॉगवर टाकण्याऐवजी इथेच टाकली असती तर वाचली असती... असो. पुलेशु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा वाचली. एकंदर लिखाण प्रवाही , प्रसंगी उत्कंठावर्धक कसं ठेवावं , वाचकाला शेवटपर्यंत रस वाटेल अशा पद्धतीने लिहिण्याची जी काही तत्त्वे आहेत त्यांचा अंगिकार प्रस्तुत कथेमधे झालेला आहे असं कुणीही म्हणेल. मलाही व्यक्तिशः तसं वाटलं. या अंगाने कथा वाचनीय झालेली आहे.

मात्र, विवाहबाह्य संबंध , त्यातली लैंगिकता, नात्यामधला चोरटेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा नात्यांमधे गुंतवून स्त्री किंवा पुरुष काय साध्य करतात किंवा कुठल्या स्वरूपाच्या तृष्णेच्या पूर्ततेच्या आशेने अशा स्वरूपाचे संबंध तयार होतात याचा शोध कथेतून घेण्याचा प्रयत्न पुरतेपणी केला गेला आहे काय ? विवाहित स्त्रीला टेलिफोन करून शेवटी फोनसेक्स ची मागणी करणारी व्यक्ती काहीशी एकांगी - कामपूर्तीच्या एकाच एका ध्येयाने पछाडलेली आहे असं दिसतं. माणसं अशी एकपदरी नसतात. काहीतरी हवं असण्याला अनेक पदर असतात. स्त्रीपुरुषांच्या संबंधामधे लैंगिक समागमापेक्षा बर्‍याचदा एकमेकांच्या सहवासाची ओढ अधिक दिसते. जरी ते संबंध लैंगिक स्वरूपाचे असले तरी, त्यातला समागमाचा भाग अगदी थोडा किंवा या फोनसेक्स नाट्यामधे दाखवला आहे तसा नसतो देखील. मग व्यक्तींना या नात्यांची ओढ का असते ? या ओढीमागे चोरटेपणाची भावना का असते ? ज्या नात्यांमधे चोरटेपणा नसतो तेथे लैंगिकता ही पूर्णपणे गैरहजरच असली पाहिजे काय ? लैंगिक समागम हा लैंगिकतेचा एक निव्वळ भाग आहे हे या कथेतून मांडणं शक्य होतं काय ? या आणि अशा प्रश्नांचा मागोवा अशा स्वरूपाच्या लिखाणातून घेता येतो. तो तुझ्या पुढच्या प्रयत्नांमधे घेता यावा अशी माझी सदिच्छा आहे.

कथेवरची टीका म्हणजे दोषदिग्दर्शन नव्हे. कलेकडून एकेका वाचकाच्या अपेक्षा असतात. मी माझ्या अपेक्षांचंच वर्णन वर केलं. त्या अपेक्षांची पूर्ती म्हणजे कथेची इतिकर्तव्यता नव्हे हे मी नमूद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

<<कथा वाचली. एकंदर लिखाण प्रवाही , प्रसंगी उत्कंठावर्धक कसं ठेवावं , वाचकाला शेवटपर्यंत रस वाटेल अशा पद्धतीने लिहिण्याची जी काही तत्त्वे आहेत त्यांचा अंगिकार प्रस्तुत कथेमधे झालेला आहे असं कुणीही म्हणेल. मलाही व्यक्तिशः तसं वाटलं. या अंगाने कथा वाचनीय झालेली आहे.>>

धन्यवाद मुक्तसुनीत. तुमच्याकडून अशी प्रतिक्रिया मिळावी याचा खूप आनंद झाला.

<<मात्र, विवाहबाह्य संबंध , त्यातली लैंगिकता, नात्यामधला चोरटेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा नात्यांमधे गुंतवून स्त्री किंवा पुरुष काय साध्य करतात किंवा कुठल्या स्वरूपाच्या तृष्णेच्या पूर्ततेच्या आशेने अशा स्वरूपाचे संबंध तयार होतात याचा शोध कथेतून घेण्याचा प्रयत्न पुरतेपणी केला गेला आहे काय ? >>

ही कथा आहे एका सामान्य स्त्रीची. तिच्या आयुष्यात तिचा जुना मित्र येतो आणि तिच्या मनात या भावना उद्दीपित करतो. ती जरी संस्कारी स्त्री असली, तरी मोडर्नही आहे. त्यामुळे जे घडतंय ते चांगलं की वाईट असं तिच्या मनातलं द्वंद्व कथेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण चांगलं नाही हे मान्य असूनही या नव्या अनुभवाला ती सामोरी जाण्याचा निर्णय घेते, त्यात आनंद अनुभवते आणि त्याबद्दल नंतर पश्चातापही करत नाही. शेवटही अनिर्णितच ठेवलाय, कारण पुढे काहीही घडण्याची शक्यता ती नाकारत नाही.

मला वाटते अशा नात्यामध्ये स्वतःला गुंतवून घेण्यापेक्षा, आपोआप गुंतले जाण्याची शक्यता जास्त असते. आणि तृष्णा प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. कुणाला नुसतं फोनवर बोलणं पुरेसं वाटू शकेल तर कुणाला आणखी काही. स्त्री आणि पुरुष यातून काय साध्य करतात? कदाचित वेगळेपण, नाविन्य, कितीतरी कारण देता येतील. माझ्या कथेच्या अनुरोधाने बोलायचे झाले तर मला वाटते त्या स्त्रीच्या वरवरच्या सुखी आयुष्यात काहीतरी भावनिक कमतरता असली पाहिजे, म्हणून ती त्याच्या फोनच्या एवढी आहारी गेली असेल. आता तिचे कौटुंबिक आयुष्य मी दाखवायला पाहिजे होते का? मला तशी गरज नाही वाटली. तो कदाचित दुसऱ्या कथेचा टॉपिक होऊ शकतो.

आणि हीही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठेही ती त्याच्या प्रेमात पडलेली दाखविले नाही. मला वाटते ती तिची भावनिक आणि तो त्याची लैंगिक गरज भागविण्यासाठी फोनवर बोलत असावेत.

<< विवाहित स्त्रीला टेलिफोन करून शेवटी फोनसेक्स ची मागणी करणारी व्यक्ती काहीशी एकांगी - कामपूर्तीच्या एकाच एका ध्येयाने पछाडलेली आहे असं दिसतं. माणसं अशी एकपदरी नसतात. काहीतरी हवं असण्याला अनेक पदर असतात. स्त्रीपुरुषांच्या संबंधामधे लैंगिक समागमापेक्षा बर्‍याचदा एकमेकांच्या सहवासाची ओढ अधिक दिसते. जरी ते संबंध लैंगिक स्वरूपाचे असले तरी, त्यातला समागमाचा भाग अगदी थोडा किंवा या फोनसेक्स नाट्यामधे दाखवला आहे तसा नसतो देखील.>>

कथेच्या सुरुवातीपासून, त्यांच्यातली मैत्री, सहवासाने आलेला मोकळेपणा दाखविण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे तिला आठवणीने गिफ्ट पाठवणे. तिच्या मुलाला ipad2 घेऊन देणे या गोष्टी त्याची तिच्याबद्दलची ओढ, भावना व्यक्त करतात. आता तरी तो एकांगी वाटत असेल, तर तो माझ्या लिखाणाचा दोष म्हंटला पाहिजे.

<< मग व्यक्तींना या नात्यांची ओढ का असते ? या ओढीमागे चोरटेपणाची भावना का असते ? ज्या नात्यांमधे चोरटेपणा नसतो तेथे लैंगिकता ही पूर्णपणे गैरहजरच असली पाहिजे काय ? लैंगिक समागम हा लैंगिकतेचा एक निव्वळ भाग आहे हे या कथेतून मांडणं शक्य होतं काय ? या आणि अशा प्रश्नांचा मागोवा अशा स्वरूपाच्या लिखाणातून घेता येतो. तो तुझ्या पुढच्या प्रयत्नांमधे घेता यावा अशी माझी सदिच्छा आहे.>>

नमूद केलेल्या या काही गोष्टी पुढच्या कथेसाठी जरूर वापरता येतील. त्याबद्दल धन्यवाद.

(विवाहबाह्य संबंधात चोरटेपणाची भावना असणारच ना? - एक प्रश्न).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>(विवाहबाह्य संबंधात चोरटेपणाची भावना असणारच ना? - एक प्रश्न). <<<

"ओपन मॅरेज" या स्वरूपाची जी विवाहाची व्यवस्था काही लोक पाळतात त्यांच्यातील विवाहबाह्य संबंध चोरटे नसतात.
ओपन मॅरेज बद्दलची माहिती : http://en.wikipedia.org/wiki/Open_marriage

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हो ते माझ्या स्मरणशक्तीतून निसटले होते. डिम्पल कपाडियाच्या "लीला" नावाच्या सिनेमामध्ये मी त्याचा उल्लेख पहिल्यांदा ऐकला होता. त्यावर एखादी कथा लिहिण्यास हरकत नाही. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते की फक्त दोन जीवापद्धतींचा स्पर्श होणार असेल, तर अशी कथा लिहिता येते. त्यामुळे नायिकेची बावचळलेली स्थिती आहे. ज्या मित्रमंडळात विवाहबाह्य संबंध "टॅबू" नाहीत त्या मित्रमंडळांतही असे प्रेम-त्रिकोण बनू शकतात. पण ती कथा अगदीच वेगळी उलगडली असती.

कथा चांगली लिहिली आहे. नुसत्या ब्लॉग-दुव्याऐवजी येथेसुद्धा द्यायला हवी होती. जमल्यास अजून संपादन करून कथा येथे द्यावी, अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजय. विवाहबाह्य संबंध "टॅबू" नाहीत अशी मित्रमंडळ आपल्या समाजात अस्तित्वात असतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीही ओपन मॅरेज बद्दलच बोलताहात का? दुसरं काही असेल तर त्याचे स्पष्टीकरण देवू शकाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच देशांत अविवाहित प्रौढांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे "विवाहबाह्य" यात दीर्घकाळ अविवाहितांचे व्यवहार आलेत. या दीर्घकाळ अविवाहितांमध्ये दीर्घकाळाचे सहजीवन जगणारे लोकही पुष्कळ असतात.

(या ठिकाणी त्रिकोण वगैरे नाही, पण उदाहरण म्हणून) माझी एक युरोपियन परिचित स्त्री काहीच महिन्यांत पहिल्यांदा बाळंतीण होणार आहे. मूल होणार आणि व्हावे आसे तिने आणि तिच्या जोडीदाराने आनंदाने ओळखले आणि ठरवले, तेव्हा त्यांनी आपली जोडीदारी कायदेशीररीत्या नोंदवली. ही नोंदणी म्हणजे नोंदणी-विवाह नव्हे. होणार्‍या अपत्याच्या दृष्टीने, हक्क-वारसा-वगैरे बाबतीत लग्न झाल्यासारखेच आहे. परंतु होतकरू आई-वडलांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. (मात्र जिथवर मला माहीत आहे, तिथवर ही विवक्षित जोडी "ओपन" नाही.)

अमेरिकन कृष्णवर्णीय समाजाच्या इंग्रजी बोलीत "बेबी-डॅडी" नावाचे एक नाते असते. (अन्य समाजातही हे नाते असते, पण अजून शब्द नाही.) "बेबी-डॅडी" म्हणजे अपत्याचा-बाप. या पुरुषाचा मुलाच्या आयुष्याशी काही संबंध असतो, काही प्रमाणात आर्थिक हातभार, वगैरे, असतो. मात्र या आपत्याच्या आई-वडलांचे लग्नही झालेले नसते, चालू जोडीदारी बहुतेक वेळा नसते, आणि जोडीदारी चालू असल्यास एकनिष्ठ नसते.

पण होय. माझा प्राथमिक निर्देश "ओपन पार्टनरशिप"कडे होता. ("रिलॅक्स, इट्स् जस्ट सेक्स्" या वाक्प्रचार/म्हणीप्रमाणे लैंगिक व्यवहार आणि भावनिक एकनिष्ठता यांच्यात फरक केलेला दिसतो. भावनिक प्रतारणा ही गंभीर मानली जाते. लैंगिक व्यवहार या बाबतीत नि:संदर्भ मानला जातो.)

भारतातही काही पारंपरिक उपसमाजांत अनेक "बाहेरख्याली" पुरुष स्वतःला विवाहित गृहस्थ आणि कर्तव्यदक्ष बाप समजतात. काही प्रमाणात "रिलॅक्स्, इट्स् जस्ट् सेक्स्" असाच विचार दिसतो. मात्र या प्रसंगांत त्या विवाहित स्त्रीची सहमती नसण्याची शक्यता फार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयावरची कथा वाचल्याचे मला आठवत नाही ( हे श्रेय लेखिकेचे, की माझ्या मर्यादित वाचनाचे आणि विस्मरणशक्तीचे, कुणास ठाऊक!) त्या न्यायाने हा नवा कथाविषय आहे. जुन्या मैत्रिणीकडून 'फोन सेक्स' ची अपेक्षा करणारा मित्र आणि स्वतःच्या नकळत ती पूर्ण करणारी त्याची मैत्रीण यांची ही कथा पटणारी वाटली. अर्थात त्यामुळे नायिकेचे खरे लैंगिक आयुष्य मोहोरणे हा भाग जरासा फिल्मी वाटला. शेवटी त्याच्या मागणीला बळी पडून त्याच्याशी प्रत्यक्ष शरीरसंबंध होणे आणि नंतर त्याचे विमान संधीप्रकाशातल्या आकाशात झेपावत असताना नायिकेने थंड वार्‍याच्या झोतात अंगाभोवती साडी घट्ट लपेटून घेत तृप्त पण हुरहुरत्या मनाने 'ही एक संध्याकाळ त्याची, पण उरलेल्या सगळ्या तुझ्यासाठी, राजा. मी तुझीच होते, तुझीच आहे, आणि तुझीच राहीन; तनाने आणि मनाने..' असले काहीतरी स्वतःच्या नवर्‍याला उद्देशून मनात म्हणणे असले काही कथेच्या शेवटी येते की काय या भीतीने मी घाबराघुबरा झालो होतो. तसले काही झाले नाही याबद्दल आभार.
नायकाची लैंगिक उपासमार ध्यानात घेतली तरी कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे अशी मागणी करणे (त्यातूनही पुढे 'तशी' अपेक्षा असणे) हे शंभर टक्के पटत नाही. काही नात्यांमध्ये लैंगिकता शिरु शकत नाही. चांगले मित्र-मैत्रीण हे असेच नाते आहे. अर्थात प्रस्तुत कथेतले नायक-नायिका 'चांगले' मित्र कधीच नव्हते हे लेखिकेने स्पष्ट केले आहेच. एकूण कथा शेवटपर्यंत वाचावीशी वाटली आणि 'माहेर' दर्जाची वाटली नाही. म्हणजे रुढ अर्थाने कथा फार यशस्वी झाली आहे, असे म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

धन्यवाद सन्जोप राव.

फोन सेक्स हा विषय माझ्यासाठी नवीन होता(माझा अनुनभवीपणा ;)) म्हणून मी त्यावर लिहायला घेतले. अर्थातच मीही त्यावर कधी वाचले नाही. मराठीत आत्तापर्यंत न चर्चिले गेलेले किंवा आपणासाठी नवीन विषय यांवर लिहिण्याचा माझा प्रयत्न चाललाय. तसे काही विषय सुचल्यास जरूर सांगावे.

<< अर्थात त्यामुळे नायिकेचे खरे लैंगिक आयुष्य मोहोरणे हा भाग जरासा फिल्मी वाटला. >>

माझ्यामते ते साहजिकच होत असावे. लोक पोर्न का पाहतात? (अर्थातच मला त्याचे उत्तर माहित नाही, पण एक अंदाज की त्यांचे सेक्स लाईफ सुधारावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा चांगली लिहली आहे. विषयही चांगला हाताळला आहे. विवाहबाह्य संबंधामुळे जोडीदारांचे लैंगिक संबंध सुधारले या प्रकारच्या कथा वाचल्या पाहिल्या आहेत. इथे फक्त कच्चा दुवा म्हणायचा तर त्यांची मैत्री असे म्हणता येईल.

कथा इथे द्यायला हवी होती या मताची पुनरुक्ती करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हाफीसातून ब्लॉगस्पॉट बंद आहे त्यामुळे कथेचा शेवट वाचता आला नाही Sad
इथे सुद्धा चिकटवा की कथा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथा वाचनीय आणि रंजक झाली आहे आणि सध्याच्या काळात कदाचित वास्तवाच्या जवळ जाणारीही आहे. कथाविषय आणि मांडणी आवडली.
पण त्याच्याशी बोलतानाची धुंदी आणि त्यानंतर नवरा,मुलं समोर आल्यावर आलेली अपराधी भावना आणखी परिणामकारक व्हायला वाव होता असे वाटते. स्त्री मॉडर्न असली तरी लहानपणापासून ठसलेल्या मूल्यसंकल्पना तोडताना अपराधी वाटणारच (विशेषतः आपल्या समाजात नीतिमत्तेच्या सगळ्या संकल्पना योनिशुचितेशीच निगडीत असताना जास्तच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा रंजक झाली आहे हे वेगळे सांगायला नको. पण अशा घटनांमधून जातानाचे मनोव्यापार अधिक गुंतागुंतीचे असण्याची शक्यता जास्त. शिवाय यातला मित्राचा हेतू मला पुरेसा स्पष्ट झाला नाही - आणि मैत्रीणही आयुष्यात तशी काही दु:खी वगैरे दिसत नाही वरवर पाहताना तरी. मग माणसं अशी अचानक वेगळा रस्ता त्यांच्याही नकळत का पकडतात? 'ज्यांच्यासमवेत आपण नसतो त्यांच्यासमवेत असणे' ही प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे सोपी झाली आहे का आणि त्याला वास्तवाची किती धार आहे हा प्रश्न माझ्या मनात आला - पण तो अर्थातच कथानकाच्या बाहेरचा आहे हे मला मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या 'अनुभवा'च्या संदर्भात विश्वासघात हा लेख कृपया वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथील सभासदांच्या इच्छेला मान देऊन कथा येथे संपूर्णपणे दिल्याबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद Nile, नगरीनिरंजन, आतिवास.

आतिवास,

<< शिवाय यातला मित्राचा हेतू मला पुरेसा स्पष्ट झाला नाही - आणि मैत्रीणही आयुष्यात तशी काही दु:खी वगैरे दिसत नाही वरवर पाहताना तरी. >>

अशा गोष्टी माणसे ठरवून करत असतील का? आणि कुणी फोन करून तुमच्या मनातल्या सुप्त भावना जागवत असेल, तर सुखी असताना तुम्ही त्या एन्जोय करू शकणार नाही का?

नगरीनिरंजन,

<<पण त्याच्याशी बोलतानाची धुंदी आणि त्यानंतर नवरा,मुलं समोर आल्यावर आलेली अपराधी भावना आणखी परिणामकारक व्हायला वाव होता असे वाटते. >>

हं. विचार करायला हवा.

मुक्तसुनीत,

मला कथा इथेच टाकायची होती. पण सभासदांवरची बंधने तुम्ही सैल करू शकणार नाही का? जो पोस्ट टाकतोय त्याला ती पोस्ट काढून टाकण्याचाही अधिकार असला पाहिजे ना? कृपया मॉडरेटर्सनी याची नोंद घ्यावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अशा गोष्टी माणसे ठरवून करत असतील का? आणि कुणी फोन करून तुमच्या मनातल्या सुप्त भावना जागवत असेल, तर सुखी असताना तुम्ही त्या एन्जोय करू शकणार नाही का?"
अशा गोष्टीच नव्हे तर कुठलीही गोष्ट करताना किंवा कुठलाही अवघड निर्णय घेताना माणसे कदाचित पूर्वानुभव,संस्कार,सद्यस्थिती,आपली जगण्याची तत्वे इत्यादी कामी आणत असावीत. आता जर आपल्याच विचारात गडबड असेल, आपल्याच तत्वांवर आपलाच विश्वास नसेल तर द्विधा मनस्थितीची परिस्थिती अशा प्रत्येकवेळीच ओढवू शकते. मग एखादा निर्णय घेऊन झाल्यावर अशा लोकांना तो नंतर चुकीचा वाटून काही अविचार सुद्धा घडू शकतो. कथानायिका कदाचित अशाच मानसिकतेतून जात आहे असे जाणवते आहे. काहीजणांच्या दृष्टीने हा व्यभिचार असेल तर काही जणांना हा कालानुरूप जगण्यातील बदल वाटेल. शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टीकोन आहे त्यामुळे पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चूक अशी विभागणी करता येणार नाही.
कथा चांगली जमली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळा विषय आणि बेष्ट लिखाणशैली..एकदम गुंगवून टाकणारी कथा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं