मुहूर्त

भेगाळलेल्या नात्याला पुन्हा येईल का अर्थ?
प्रेमाचा खटाटोप सारा होता का व्यर्थ?
माझ्या चुकांचं तुझ्या चुकांशी गुणोत्तर काढून झालंय...
फुकाच्या गर्वामुळे माझ्या उत्तर व्यस्त आलंय...
मुक्त उधळलेलं यौवन... अगणित वचनांच्या राशी...
सुकलेला गुलाब... हिरयाची अंगठी...
आणि बरंच काही जपलेलं मनाच्या खोल तळाशी...
गाण्यांची जुळती आवड आणि एकत्र पाहिलेले चित्रपट...
कधी विरहाने जलमय झालेला पापण्यांचा नदीतट...
आज अचानक भरलं आभाळ... उदासवाण्या कातरवेळी...
ओढ मना ही लागे कसली? आठवणींची विचित्र खेळी...
पावसाचं आणि तुझं माझं, शब्दातीत आहे गुपित...
जपून ठेवलंय सारं सुखरूप अंतरंगाच्या गूढ कुपीत...
माहितीय मला तुझ्या मनाचा गुलमोहर क्षणात फुलला असेल...
माझ्यासारखाच तुझाही तिथे कासावीस जीव झाला असेल...
भेटूया का राणी लेवून म्रुदगंधाचं थोडं अत्तर?
पहिल्या पावसाचा मुहूर्त साधू... नंतर मेलो तरी बेहत्तर...

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम ऐसी अक्षरेवर स्वागत!

छान कविता! मुहूर्त जवळ आला आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भेटूया का राणी लेवून म्रुदगंधाचं थोडं अत्तर?
पहिल्या पावसाचा मुहूर्त साधू... नंतर मेलो तरी बेहत्तर...

क्या बात है!!! आई ग्ग!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको