अवनी

बाह्यांतरी हो निर्मळ
करूया हा ब्रम्हगोळ
काष्ठी पाषाणी जे जळ
वाचवू तया..

सकल वृक्षांची मांदियाळी
त्यासी जो नरवर सांभाळी
तयासी खरा सावतामाळी
म्हणा म्हणा हो...

या अवनीच्या अत:करणी
अगणित वौभवाच्या खाणी
अंडी सोन्याची देयी म्हणूनी
कोंबडीच कापे

नाना सुगंध परिमळती’
नाना पुष्पे रंग सांडती
ऐसी महालावण्यवती
अवनी माझी..

धबधबा जलाशय सांडती
झरे होवुनीया झुळझुळती
नाचत गाजत जे कि मिळती
सागरासीहो..

कित्येक येथे प्राणीमात्र
नाना पुशुपक्षी सर्वत्र
ऐकावे त्यांचे नादस्तोत्र
वेदमंत्र ते..

नाना धन्यांचे असे कोठार
येथे फळांचे मळे अपार
परि हव्व्यासापोटी संव्हार
करू नकाहो..

सांभाळावे पर्वत डोंगर
तैसाची आपुला परिसर
नाना वृक्षांचा करा विस्तार
हिरवेगार...

हीच अवनी दिनी कामना
दृढकराहो आपुल्या मना
कृतीपासूनी परी चळोना
वृत्तीमाझी हो...!!!!

अवनी दिनी पुनः प्रकाशित>

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

समयोचित!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!