गुगल ड्राइव्ह

गुगल ही कंपनी एक अद्भुत कंपनी आहे. फक्त एका सर्चइंजीन वरून मल्टी बिलीयन डॉलर कंपनी होणे व आत्ताच्या घडीला इंटरनेट वर अधिराज्य गाजवणारी सेवा कंपनी होणे तेही मायक्रोसॉफ्ट आणि याहु सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून हे खरच अद्भुत आहे. सर्जी ब्रिनच्या एका व्हाईट पेपर प्रमाणे 'इंटरनेट तुमच्या खिशात' असे स्वप्न असलेली गुगल ही सेवा कंपनी अत्तुच्य अभियांतत्रिकी सेवा देऊन आपले सर्व दैनंदिन जीवन व्यापणार अशी लक्षणे दिसत आहेत.

अनेकोत्तम सेवा देण्यार्‍या ह्या कंपनीची एक नवी सेवा कालपासून सुरू झाली, गुगल ड्राइव्ह.
५GB इतकी जागा फुकट देऊन ही सेवा गुगलने सर्वांसाठी सुरु केली आहे. पण गुगलच्या उत्कंठा वाढवणार्‍या कॅम्पेननुसार तुमच्या अकाऊंटवर ही सेवा उपलब्ध होण्यास काही वेळ लागू शकतो. मी ट्राय केल्यावर मला 'Your Google Drive is not ready yet' असा निरोप येतोय Sad

असो, काय आहे विषेश ह्या सेवेत? तसे वेब वर जागा असणे ही सेवा काही नाविण्यपूर्ण किंवा युनिक नाहीयेय. बरेच सेवा पुरवठादार आधिपासूनच ही सेवा देत आहेत. मग गुगलचे काय एवढे विषेश? तर ह्या सेवेचे गुगलच्या इतर सेवांबरोबर होणारे एकसंगीकरण हे विषेश असणार आहे.

गुगल डॉक्स ही सेवा जर वापरत असाल तर खुषखबर ही आहे की गुगल डॉक्स हे गुगल ड्राईव्ह प्लॅटफॉर्मवरच तयार केले आहे. त्यामुळे आता गुगल डॉक्सवर तयार केलेली डॉक्युमेन्ट्स गुगल ड्राईव्हवर उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ह्या गुगल ड्राईव्हवरच्या फाइल्स तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेयर करू शकाल. तसेच एकच फाइल अनेकजण एकाच वेळी एडीट करू शकाल. एकाचवेळी अनेकांना एकच डॉक्युमेंट एडीट करता येउ शकणे हा एक खरंच उच्च अभियांत्रिकी (पेटंटेड) शोध आहे गुगलचा.

ही सेवा विंडोज, मॅक, iOS, अ‍ॅन्ड्रॉइड ह्या सर्व प्लॅट्फॉर्म्स वर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कुठुनही आणि कधीही तुम्ही तुमच्या फाइल्स हाताळू शकता.

गुगलचे ब्रेड आणि बटर असलेली 'गुगल सर्च' ही सेवा तुमच्या गुगल ड्राईव्हवरच्या फाइल्स/डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी तुमच्या दिमतीला हजर असेल. स्कॅन केलेल्या फाइल्स/डॉक्युमेंट्स मधूनही 'OCR' हे तंत्रज्ञान वापरून टेक्स्ट सर्च करून तुमच्या फाइल्स/डॉक्युमेंट्स शोधल्या जाणार आहेत.

drive.google.com/start हा दुवा वापरून तुम्ही तुमचे गुगल ड्राइव्ह सुरु करु शकता.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

छान. नवीन माहिती दिल्याबद्दल आभार. अरे, हा माझा लहान भाऊ (पक्षी - गुगल) अजून काही तरी एक वेगळे चष्म्यासारखे उपकरण घेऊन येतोय - प्रोजेक्ट ग्लास नावाने. तेही अतिशय अद्भुत आहे. त्याविषयी काही वाचलेस का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चांगली सुविधा. फक्त यात नाविन्य काय आहे? शेअर्ड फोल्डर्स तर अनेक उपलब्ध आहेत असा प्रश्न पडेपडे पर्यंत लेखात उत्तर देण्याचा प्रयत्न दिसतो; मात्र तेही फार 'वेगळे' नाहिये. असो.

काल आयसीआयसीआय बँकेने याच प्रकारची ई-लॉकर नावाची सुविधा दिली आहे. तुमच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सना स्क्यान करून या लॉकरमधे ठेवायचे. ठराविक पासर्डांशिवाय तो उघडायचा नाही.
ही सेवा देखील विनामुल्य आहे (असे लिहिले तरी होते)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी ड्रॉपबॉक्स https://www.dropbox.com/ गेली वर्षपेक्षा जास्त वापरतोय, नो प्रॉब्लेम्स. मायक्रोसॉफ्टचं स्काय ड्राईव्ह ( https://skydrive.live.com ) ७-१० जी बी देतंय. अमेझॉनही क्लाउडवर बहुतेक ५ जीबी देत होतं मागे. सद्ध्या तरी अनुभवाने ड्रॉपबॉक्स आणि स्काय ड्राईव्ह सर्वात चांगले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा लहान भाऊ (पक्षी - गुगल)

हा हा हा, मराठीत मजा नाही, तो विंग्रजीतला (Google) भाउ आहे Wink

असो, गूगल ग्लास अजुनही बाल्यावस्थेत आहे. त्याविषयी जरा जास्त डिटेल्स कळले की लिहितो त्यावर.
तो पर्यंत तुझ्या PDF Files गुगल ड्राईव्ह मध्ये ठेव Smile

- (तांत्रिक) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला नायल्याशी सहमत व्हायची वेळ आलीये आज भेंडी.

मी देखील ड्रॉपबॉक्स आणि http://www.adrive.com/ ह्या सेवा वापरतो. अतिशय सुरेख. ड्रॉपबॉक्सला बरेचदा फाईल कोणाशी शेअर केली तर ज्याच्याशी शेअर केली आहे त्या व्यक्तीला ड्रॉपबॉक्सचे सदस्यत्व घेतल्यावरच ती उतरवून घेता येते येवढीच अडचण आहे. बाकी http://www.adrive.com/ तर अतीउत्तम आहे.

आणि हो सोत्रि गूगलने ही सेवा ३ वर्षापूर्वी देखील सुरु केली होती. G Drive असे तिचे नाव होते. पण पुढे ती अचानक बंद करण्यात आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

अरे फोकलीच्या, मग तुझं पोर्न कलेक्शन शेअर कर ना ड्रॉपबॉक्स वर!

बाकी अ‍ॅपलचं आय क्लाऊडही बरं आहे हो. फुकटात मिळालयं तेव्हा बरं आहे इतकं तरी म्हणतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीतले पुष्कळसे लोक फाईल शेअरिंगसाठी आधीच वेगवेगळ्या सेवा (ड्रॉपबॉक्स, आयक्लाउड वगैरे) वापरतात. त्यात पाच गिगाबाईट्सची भर म्हणजे काहीच नाही. शिवाय, ज्याला कुणी विचारत नाही अशा मायक्रोसॉफ्टनंसुद्धा स्कायड्राईव्ह सेवा देऊन पुष्कळ दिवस झाले. म्हणजे अशी सेवा सुरू करण्यात गूगलनं उशीरच केलेला दिसतो. याउलट आपली सर्व खाजगी माहिती गोळा करून त्याचा व्यावसायिक उपयोग करून घेण्याच्या गूगलच्या धोरणाचा पुढचा भाग असंच हे सध्या दिसतं आहे. 'फाईल्स एन्क्रिप्ट केल्यात तर सर्च करता येणार नाही' असं गूगल सांगत असणारच. (थोडक्यात, तुमचा डेटा तुम्ही शोधा आणि आम्हालाही शोधू द्या).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी गुगलचे मार्केटिंग करत नाहीयेय. Smile
फक्त एक बातमी म्हणून बातमी ह्या सदरात लेख टाकला आहे.

- (गुगलचा पंखा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे फोकलीच्या, मग तुझं पोर्न कलेक्शन शेअर कर ना ड्रॉपबॉक्स वर!

हे असे प्रतिसाद आणि सदस्य बघता 'ऐसी अक्षरे'ची तुलना 'कु'स्थळाशी झाल्यास वावगे ते काय ?

कुस्थळप्रेमी
परा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मला काय तुमच्या त्या सॉफ्ट्वेयर मधले कळत नाही पण एक प्रश्न- फायली फुकटात टाकाल मग त्यांचे ते सर्च इंजिन तुमच्या त्या फायली वाचून तुमच्या आवडी निवडी शोधणार व साजेशा जाहिराती आजुबाजुला दिसणार. अशा प्रकारच्या क्लुप्त्या ह्या कंपन्या करतात असे वाचले होते.
असो. पूर्वी वाचले होते- तुम्हाला काही फुकटात मिळत असेल तर तुमचा ग्राहक म्हणून पैसे मिळवण्यासाठी उपयोग केला जात असतो.
सोकाजीरावानीं थोडा विचार करूनच ह्या सुविधेचा वापर करावा असे म्हणते.
(अधूनमधून आंतरजालाचा वापर करणारी)रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्य आहे!

पण मला व्यक्तिशः, अशी पर्सनॅलाइझ्ड सेवा मिळत असेल, जर कोणी मला जे काय हवे आहे ते समजून ते माझ्या समोर आपसूक आणणार असेल तर मला आवडेल. एकदम राजेशाही थाट असेल तो. पण त्यात त्या माहितीचा गैरवापर होणे हा धोका आहेच, तो मी नाकारत नाही.

उदा. सध्या माझा पुणे - चेन्नै विमानप्रवास वाढला आहे. हे कोणीतरी अ‍ॅनालिसीस करून मला आज एक प्रमोशनल कुपॉन पाठवले. ९०० रुपयांची सूट. लगेच मी माझे एक तिकीट बूक केले जे मला ५००० रु. पडले. तेच जर मी ऐनवेळी केले असते तर ९००० - ९५००० पडले असते. हाच तो फायदा मला दिसतो.

असो, आपण कुठला लावतो आणि त्याचा रंग काय ह्यावर सगळे अवलंबून असते Wink

- (फायदा शोधणारा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोशल नेटवर्किंग आणि मोबाईल फोन्सनंतर या बाबतीत गूगल मागे पडलं. अर्थात आता अँड्रॉईड जोरदार आहे हे मान्य आहे. एकेकाळी सर्च इंजिन आणि इंटरनेट या बाबतीत मायक्रोसॉफ्ट मागे पडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>

तुला अर्थ म्हणायचे आहे का? शब्द गाळल्यामुळे भलताच अनर्थ होतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

त्यांना चष्मा म्हणायचे असावे असा अंदाज आहे

- (सोज्वळ) ऋ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चिंतातुर जंतु यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे.

मायक्रोसॉफ्टनंसुद्धा स्कायड्राईव्ह सेवा देऊन पुष्कळ दिवस झाले. म्हणजे अशी सेवा सुरू करण्यात गूगलनं उशीरच केलेला दिसतो.
याबद्दल थोडे -

मायक्रोसॉफ्टने स्कायड्राईव्ह साठी २५ जीबी फुकटचे स्टोरेज उपलब्ध करुन दिले आहे. गूगलची ५ जीबी मोफत सेवा म्हणजे त्यामानाने काहीच नाही.

असे नेटवर्क ड्राईव्ह गाणी, चित्रपट, अशा कमी महत्त्वाच्या गोष्टींसाठी चांगले आहेत. स्वतःची व्यक्तीगत डॉक्युमेंट्स अशा ड्राईव्ह वर साठवणे म्हणजे मोठीच रिस्क आहे. कोणा हॅकर च्या निशाण्यावर तुम्ही आलात की माहितीचा गैरवापर हा होणारच.

अशा नेटवर्क ड्राईव्हवर माहितीची सुरक्षितता ही प्रत्येकाने स्वतःच जपली पाहिजे. म्हणजे डाटा अपलोड करताना तो झिप / रार करुन त्या फाईललाच मोठा व कठीण पासवर्ड द्यावा व मगच असा डेटा अपलोड करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसला घोळ घातलाय मी. Biggrin

होय होय होय, त्रिवार होय! मला चष्माच म्हणायचे होते. एक डाव माफी द्या :-S

- ('घोळ'कर) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा कसा घोळ घातलास? टंकलेखन करताना तुझा चष्मा लावायला विसरला होतास का रे? लावत जारे. तो चष्मा लावल्यावर तू अगदी लिज्जतकवी मंगेश पाडगावकरांसारखा दिसतोस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

लोक एवढं लिहितात, जमवतात काय आणि साठवतात तरी कशासाठी - असं प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे माझ्या मनात Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0