पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्मदेहाने प्रवास

अलिकडे पौराणिक विमाने, लिंगदेहाने केलेला मंगळग्रहाचा प्रवास इ. विषयी वाचून आमच्या मनाने घेतले, की आपणही असा प्रवास करावा, आणि प्राचीन काळचे जग कसे होते, ते बघावे... अमेरिकेच्या स्थूलदेहाने केलेल्या प्रवासात आम्हाला सर्वत्र एकसारखी शहरे, बाजारादि दिसले होते, परंतु आमची प्राचीनत्वाची हौस त्यातून भागली नव्हती...सूक्ष्म देहाने जावे ???
परन्तु कसे? आपण काही त्या थोर नर्तकांसारखे ब्रम्हर्षी वा प्रज्ञाब्रम्ह वगैरे नव्हे, मग हे जमायचे कसे?

तेवढ्यात आठवले की मागे एकदा एका कठीण प्रसंगी आपण आपल्या दिवंगत माता-पित्यांना आवाहन केले होते, मग त्यांनी आवाहनास साद देउन मार्गदर्शन केले होते ... असे आत्मे भल्या पहाटे पिंगळावेळेस पिंगळ्याच्या रूपात आपल्या घरासमोर बसून आपल्याला साद देतात, हे अनुभवाने ठाऊक झालेले होतेच, मग रात्री झोपताना अगदी उत्कट इच्छा केली, की उदईक पहाटे त्यांनी पुन्हा एकदा दर्शन द्यावे.
...हाच तो आत्म्यांचा संदेश आणणारा पिंगळा:

दुसरे दिवशी पहाटे पिंगळा बोलला, आणि अर्धवट जाग आली. आत्मे पिंगळ्यामार्फत आपल्याला संदेश देतात, आपण डोळे न उघडता, हालचाल न करता मन एकाग्र करायचे, म्हणजे आत्म्यांशी संपर्क होतो...
...समोर अनेक वर्षांपूर्वी दिवंगत झालेले माता-पिता सुहास्य वदनाने उभे होते.... त्यांना साष्टांग दंडवत घालून मी कश्यासाठी पाचारण केले, ते सांगितले, तेंव्हा ते म्हणाले की अरे, यासाठी तुला पुरुषोत्तम चांगली मदत करील, थांब त्याला बोलावितो ... असे म्हणण्याचा अवकाश, की लगेचच समोर 'ताजमहाल म्हणजे तेजोमहाआलय' इत्यादि ग्रंथांचे कर्ते, सुप्रसिद्ध पु.ना. ओक प्रकट झाले, . मी त्यांना वंदन करून म्हटले, की मला अमेरिका देश फार पूर्वी कसा होता, हे बघायचे आहे, त्यावर ते म्हणाले, की चल, आताच जाउया आपण.

त्यांनी मला " ओम र्‍हीम र्‍हूम काल भैरवाय नमः ओम र्‍हीम र्‍हूम कालप्रवासार्थ सज्यामि" असा मंत्र म्हणायला सांगितले..... मी मंत्रजाप सुरु करताच एकदम भोवतालचे वातावरण बदलत गेले, सोसाट्याचा वारा सुटल्यागत आवाज येऊ लागला आणि मी पुनांसह एका नवीनच जागी होतो, असे आढळले.
हीच ती जागा:

"हे बघ, आपण अनेक शतकांपूर्वीच्या अमेरिकेत आलेलो आहोत... पुना म्हणाले... त्याकाळी यास 'आम्रविका' असे नाव होते,
आणि आपल्या भारतास "इंदुस्थान" म्हणत....
हे ऐकून मला वाटलेले आश्चर्य ताडून ते म्हणाले, ..."ज्यास सांप्रत काळी अमेरिका म्हणण्याचा प्रघात आहे, त्याचे मूळ नाव 'आम्रविका' होय. याची उपपत्ती अशी, की प्राचीन काळी अपरांतक अथवा कोकण प्रदेशातून उत्तम प्रतीचे हापूस आम्र या आम्रविका देशात जहाजे भरभरून पाठविले जात. चितळे, आपटे, केळकर आदी चित्पावनांची मोठमोठी जहाजे असत. 'अमेरिका खंड' हा शब्द प्रयोग देखील 'आम्रखंड' वरून प्रचलित झालेला आहे.

या खेरीज ओक घराण्यातील व्युत्पन्न ब्राम्हण आम्रविकेतील बहुत लोकांच्या ताडपट्टीवरील नाड्या इकडे पाठवून त्यांना त्यांच्या पूर्व-जन्मांतील पापांचे स्मरण करवून देत, व त्यावरील उपाययोजना सांगत. ओक घराण्याचा दबदबा एवढा, की आज देखील 'शर्मन ओक' 'ओकल्यांड', 'सिल्व्हर ओक' इत्यादी जागा प्रसिद्ध आहेत. ओकांनी लाविलेले हजारो 'ओक वृक्ष' अमेरिकेत आहेत.... बघ तिकडे पलीकडे आहेत ओक वृक्ष...
चित्र: अमेरिकेतील ओक वृक्ष

पुना पुढे म्हणाले :"आंब्याखेरीज हिंदुस्थानातून इतर अनेक जिन्नस पाठवले जात. उदाहरणार्थ हिंग. हा त्याकाळी हिंदुस्थानाचाच एक भाग असलेल्या अफगाणी लोकांचे प्रदेशातून येई. ( 'अफगाणी' या शब्दाची उपपत्ती अशी, की तेथे अफूचे उत्पादन फार, सबब तेथील लोक अफूची निशा करून गाणी म्हणत हिंडत, त्यांस 'अफुगाणी' म्हणत). हिंगाचा व्यापार एवढा चाले, की हा व्यापार करणार्‍या लोकांचे अंगास अहोरात्र हिंगाचा वास येई. त्यावरून त्या लोकांचे आडनाव 'वास-हिंग-तन' असे पडिले, ते आजमितीस 'वॉशिंगटन' म्हणून प्रचलित आहे. या नावाचे एक गाव पूर्वी असे, ते पुढे आम्रविकेची राजधानी झाले.

त्याकाळचे पुरुषांस बटकी, कुळंबिणी, अंगवस्त्रे इत्यादिंचा सोस फार. याकारणे जारज प्रजाही अमाप. सबब तेथील पुरूषांचे 'जारज' हे नाव बहुत प्रचलित असे, उदाहरणार्थ 'जारज वास- हिंग- तन' ह्यास हल्ली 'जॉर्ज वाशिंगटन' असे म्हणतात....

हे सर्व ऐकून मी थक्कच झालो, मी त्यांना सांगितले, की मी पूर्वी अमेरिकेतील पिट्सबर्ग, न्यूयॉर्क वगैरे शहरे बघितलेली आहेत, त्यावर ते म्हणाले, अरे, पिट्सबर्ग म्हणजे पीतस-दुर्ग, इथे भारतातून वारेमाप हळद येई, त्यामुळे इथला किल्ला अगदी पिवळाजर्द झाला होता, आणि ज्याला आता न्यूयॉर्क म्हणतात, त्याचे मूळ नाव 'नऊअर्क' इथे इंदुस्थानातून नऊ प्रकारचे आयुर्वेदिक अर्क मोठ्या प्रमाणावर येत.... ते बघ नव-अर्क बंदर.

मला हे सर्व काही खरे वाटे ना, तेंव्हा ते म्हणाले, चल तुला प्रत्यक्षच दाखवतो... ते बघ आंबे घेउन येणारे जहाज, आणि माल उतरून घेण्यास नावेतून चाललेले आम्राविकन लोक.

हे बघून मात्र माझी खात्री पटली....
...परंतु भारत देशास 'इंदूस्थान' म्हणत, हे काय गौडबंगाल ? या माझ्या प्रश्नावर पुना म्हणाले " अरे, प्राचीनकाळी भारतातून नियमित पणे चंद्रावर आपली अंतराळयाने जात. त्यांना "इंदुयान" म्हणत. त्यामुळे ज्या देशात अशी 'इंदुयाने' असत, तो देश 'इंदूस्थान' म्हणून विख्यात झाला. ते बघ आकाशात उडणारे इंदुयान ...

तेवढ्यात, " अरे, आता मला जायला हवे, कारण इंद्र देवाने माझ्यावर त्या अल्ला आणि गॉड च्या प्रदेशातील बित्तंबातमी काढून आणण्याची गुप्त कामगिरी सोपवलेली आहे, तिथे जाणे मला आता भाग आहे, तू पुन्हा ये, मग तुला आणखी गोष्टी दाखवेन...." असे म्हणोन पुना अंतर्धान पावले, आणि मला पण पूर्ण जाग आली... मग मी ठरवले, की आता पुढल्या वेळी आपण रोम, फ्रान्स वगैरेची काल-यात्रा करायची.... (क्रमशः)

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile
मस्त...

पुढचा भाग केव्हां?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक घराण्याचा दबदबा एवढा, की आज देखील 'शर्मन ओक' 'ओकल्यांड', 'सिल्व्हर ओक' इत्यादी जागा प्रसिद्ध आहेत.

ओक घराण्यात* या स्थलनामांचा उच्चार कसाही करण्याचा प्रघात असो, परंतु अधोरेखित स्थलनामाचा आम्रविकेतील सद्यप्रचलित स्थानिक उच्चार हा वर दिल्याबरहुकूम नाही, एवढेच नजरेस आणून देऊ इच्छितो.

कदाचित ओक घराण्यातील उच्चार हा योग्य मूलोच्चार असून सद्यप्रचलित स्थानिक उच्चार हे त्याचे (बहुधा गैरसमजातून उद्भवलेले) अपभ्रष्ट रूप असावे काय? की याउलट ('वाइसे वर्सा' अशा अर्थी)? किंवा कसे? तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.


* डिस्क्लेमरात्मक स्पष्टीकरण: ओक घराण्यात या स्थलनामांचा उच्चार बहुधा वर प्रस्तुत धागालेखकाने नमूद केल्याप्रमाणे करण्याचा प्रघात असावा, अशी आमची केवळ प्रस्तुत धागालेखकाच्या वृत्तनिवेदनावरून झालेली समजूत (अथवा अटकळ) आहे. आमचा ओक घराण्याशी दूरान्वयानेदेखील परिचय अथवा (गॉड फॉरबिड) संबंध नसल्याकारणाने, त्यामागील तथ्याबद्दल कोणताही दावा नाही, तसा कोणताही दावा करण्याचा उद्देश अथवा मानसही नाही, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. आगाऊ धन्यवाद!
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>ओक घराण्यात* या स्थलनामांचा उच्चार कसाही करण्याचा प्रघात असो, परंतु अधोरेखित स्थलनामाचा आम्रविकेतील सद्यप्रचलित स्थानिक उच्चार हा वर दिल्याबरहुकूम नाही, एवढेच नजरेस आणून देऊ इच्छितो. <<<<

http://en.wikipedia.org/wiki/Oakland,_California या स्थानाच्या उच्चारासंदर्भातल्या उपरोक्त मताशी मी सहमत आहे.
- एक धर्मलंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ओक घराण्यात* या स्थलनामांचा उच्चार कसाही करण्याचा प्रघात असो, परंतु अधोरेखित स्थलनामाचा आम्रविकेतील सद्यप्रचलित स्थानिक उच्चार हा वर दिल्याबरहुकूम नाही, एवढेच नजरेस आणून देऊ इच्छितो.

मेल्टींग पॉटचे पॉटाध्यक्ष, आपलं राष्ट्राध्यक्ष (माजी), ज्याप्रमाणे इतर स्थलांच्या नावांचे उच्चार मुळाबरहुकूम करत नाहीत (आयरॅक इ). हा गुणधर्मही मुळात ओकांकडूनच आलेला आहे असे मानण्यास वाव आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो पौर्वात्य नावांचा अपभ्रंश करून पाश्चात्य म्हणून खपवून देण्याचा पाश्चात्यांचा उपजत गुण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा आम्रविकेचे (प्रस्तुत संदर्भातले) माजी आणि पाजी राष्ट्राध्यक्ष हे अ‍ॅपलनाम संस्थेच्या उत्पादनांचे कडवे पुरस्कर्ते असावेत. पहा : आयपॉड , आयफोन, आयपॅड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'आय'पॉड, 'आय'पॅड, 'आय'फोन, झालेच तर वर उल्लेखलेले 'आय'रॅक, 'आय'रॅन वगैरे, शिवाय 'माय'सीक्वेल, फार कशाला, 'माय' याहू, 'माय' ईबे, अगदी 'माय'लांटासुद्धा - हे सर्व दाखले लक्षात घेता, 'आय''माय'चा लाडिक पुनरुच्चार करण्याची प्रथा बहुधा आम्रविकेतून महाराष्ट्रदेशी आली असावी, असा अंदाज आहे. ('देवाणघेवाण' म्हटल्यावर सदा वन-वेच कशी होईल?)

वरील उदाहरणांत ''माय'बोली'चा उल्लेख मुद्दामच टाळला. हा प्रकार वरकरणी मराठी वाटण्यासारखा असला, तरी आम्रविकास्थित असल्याकारणाने याच्या उगमाबद्दल (आणि महाराष्ट्र-आम्रविका देवाणघेवाणीच्या दिशेबद्दल) तज्ज्ञांत अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. सबब ते उदाहरण काहीही सिद्ध करण्याकरिता (तूर्तास तरी) ग्राह्य धरता येण्यासारखे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायबोली, आयपॅड, वगैरे सोडून सोडा. आधी भारताचं इंग्लायश भाषेतलं नाव आयंडीया होणार का? अमेरायका खंडात कैच्याकैच उच्चार करतात ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारताचं इंग्लायश भाषेतलं नाव आयंडीया होणार का?

अद्याप तरी असे काही घडल्याचे ऐकिवात नाही. परंतु 'मायॅमी'करिता 'मियामी' (किंवा 'नूअर्क'करिता 'नेवार्क') वगैरे उच्चार महाराष्ट्रदेशी (आणि एकंदरीत भारतवर्षातच) खूपच मोठ्या प्रमाणात बोकाळू लागल्याकारणाने, रेसिप्रॉसिटीच्या तत्त्वास अनुसरून अशी काही उपाययोजना अमलात आणण्याची योजना विचाराधीन असल्याचे कळते.

अर्थात, सरकारी गोटांत शिजत असलेली प्रस्तुत प्रस्तावित योजना ही अपुरी असून, सध्याच्या वामपंथी (विरोधी पक्षांच्या मते वाममार्गी) सरकारच्या मिळमिळीत धोरणांस साजेशीच आहे, अशा प्रकारची प्रखर टीका सरकारच्या या प्रस्तावित धोरणाच्या संदर्भात विरोधी पक्षाच्या गोटात तूर्तास ऐकू येऊ लागली आहे. 'मुंबई'ला 'बॉम्बे' म्हणू धजणार्‍या परकीयांवर अथवा परधार्जिण्यांवर होताना ऐकू येते किमानपक्षी त्या प्रकारची पथकार्यवाही हीच खर्‍या अर्थाने 'रेसिप्रॉसिटी' म्हणवून घेण्याच्या पात्रतेची (आणि आम्रविकेच्या द्वितीय घटनादुरुस्तीस साजेशी) योजना ठरेल, परंतु प्रस्तुत योजना ही बोटचेप्या विद्यमान सरकारचे सर्वात मोठे कृष्णकृत्य आहे, असे दक्षिणपंथी जहालमतवाद्यांचे मत असल्याचे, आणि प्रस्तुत मत प्रस्तुत दक्षिणपंथी जहालमतवादी हे वामपंथी वृत्तसेवांच्या संस्थळांवरील बातम्याबातम्यांखालील चर्चाचर्चांमधून (अर्थातच मिथ्यनामांनी) अतिशय निर्भीडपणे आणि अत्यंत हिरिरीने व्यक्त करत असल्याचे कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या परिच्छेदात भर: डॅलसला डल्लास/डलास, आस्टीनला ऑस्टीन म्हणणे इ.इ.

दुसरा परिच्छेद:
०. ROFL ROFL
१. नक्की कोणत्या देशाचे सरकार? आम्रविका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरायका, अमेरिका, भारत का आयण्डाया?
२. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'मियामी'वरून आठवले. आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय लोकप्रिय अशा एका मराठमोळ्या प्रकाशनाच्या जाहिरातीतसुद्धा या स्थलनामाचा उच्चार 'मियामी' असाच स्पष्टपणे केला गेल्याचे लक्षात आहे. ('मामीला मियामीला, भाभीला अबूधाबीला, निहारिकेला अमेरिकेला' वगैरे वगैरे. 'मियामी' हे अमेरिकेतच मोडत नाही काय, अशा प्रकारच्या फुटकळ पृच्छा आम्हांजवळ करू नयेत - त्या प्रस्तुत जाहिरातीच्या कर्त्याकडे निर्देशित कराव्यात, अशी आमची नम्र परंतु कळकळीची विनंती आहे. तरीही, मायामीतील अनेक भागांत इंग्रजी बोलले असता ते स्थानिकांस समजत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावरील त्या शहरातील हिस्प्यानिकातिरेकाकडे प्रस्तुत जाहिरातकर्त्याचा रोख असावा, अशी आमची नम्र अटकळ या निमित्ताने आम्ही येथेच मांडू इच्छितो.)

(अतिअवांतरः प्रस्तुत प्रकाशनाचे कर्ते हे एक प्रथितयश फलज्योतिषी असल्याकारणाने, त्यांचा वांशिक उद्गम हा ग्रीक असावा, की 'गोराघारा' ('तेहाची माय यावनें? की चित्पावनें?' *, ** ), याबद्दल, तद्विषयक स्वारस्य राखणार्‍या अभ्यासकांत अंतर्गत मतैक्य नसून, त्या गोटांत दोन्ही बाजूंची मते अत्यंत हिरिरीने उलटसुलट फेकली जात असल्याबद्दल ऐकिवात आहे.)


* प्रेरणा: परळ की असाच कोठेतरी सापडलेला अकराशे कितीतरी सालचा मराठी भाषेतील एक अतिप्राचीन, जाहीर शिलालेख. (तूर्तास संदर्भः या दुव्यावर शोधावा. याहून बरा संदर्भ कधी सापडल्यास जमल्यास पुढेमागे दुवा देईन. धन्यवाद.) शिलालेख जाहीर आहे ही बाब लक्षात घेता, त्यातील भाषेवर बेतलेली आणि विशेषतः आजमितीस असभ्य (अनपार्लमेंटरी) वाटण्यासारख्या त्यातील शब्दांचा उल्लेख वगळलेली भाषा ही जाहीररीत्या लिहिण्यास योग्य अशीच असावी, अशी आमची नम्र अटकळ असून, त्या अटकळीच्याच आधारावर प्रस्तुत प्रेरणेचे फलस्वरूप मांडण्याचे धारिष्ट्य केलेले आहे. धन्यवाद.

नवीन
** या प्रकारास 'यावनगाळ' आणि 'चित्पावनगाळ' यांपैकी नेमके कोणते नामाभिधान उचित ठरावे, याबद्दल तज्ज्ञांचे अजूनही एकमत होऊ शकलेले नाही, असे कळते. मूळच्या प्रेरणास्वरूप 'गाळी'च्या धर्तीवर याचे एखादे चित्ररूपही प्रस्थापित करण्यात यावे, असा एक प्रस्ताव मात्र सद्यकालीन श्लीलाश्लीलतासंबंधी सामाजिक तथा वैधानिक निर्बंधांपायी फेटाळण्यात आला, अशी कुणकूण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो पौर्वात्य नावांचा अपभ्रंश करून पाश्चात्य म्हणून खपवून देण्याचा पाश्चात्यांचा उपजत गुण आहे.

पूर्व-पश्चिम हे सगळे मनाचे खेळ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://en.wikipedia.org/wiki/Oakland,_California या स्थानाच्या उच्चारासंदर्भातल्या उपरोक्त मताशी मी सहमत आहे.

आमच्या निरीक्षणास (ससंदर्भ) दुजोरा देऊन पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या शंकेचे निरसनही करू शकला असतात, तर तो दुग्धशर्करायोग ठरून अधिक आनंद झाला असता, परंतु हरकत नाही.

असो. आमच्या(च) शंकेच्या निरसनार्थ आमचा(च) एक अंदाज व्यक्त करू इच्छितो. (अर्थात, मुळात संबंधित स्थलनाम हे ओक घराण्याच्या सन्मानार्थ देण्यात आले असावे, या प्रस्तुत धाग्यात नमूद केल्या गेलेल्या अंदाजात्मक प्रतिपादनास आमचा विरोध नाही. परंतु ती शक्यता गृहीत धरल्यास मूळ उच्चार कोणता असावा, याबाबत काही तर्क करता येतो.

(१) (धागाकर्त्याच्या वृत्तनिवेदनास अनुसरून) प्रस्तुत उत्सवमूर्ती हे सूक्ष्मदेहाने आम्रविकेस जाऊन आलेले होते,
(२) 'सूक्ष्मदेहा'करिता 'लिंगदेह' अशीही एक पर्यायी संज्ञा प्रचलित आहे (संदर्भ: मोल्सवर्थ), आणि
(३) संबंधित स्थलनाम हे ओक घराण्याच्या (कदाचित खुद्द उत्सवमूर्तींच्या?) सन्मानार्थ रूढ झाले (असावे),

या तीन बाबींचा विचार केला असता, आम्रविकेतील सद्यप्रचलित स्थानिक उच्चार हाच योग्य मूळ उच्चार असावा, असा अंदाज सयुक्तिक वाटतो.)

(पण मग (प्रस्तुत धागाकर्त्याच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे) खुद्द उत्सवमूर्तींनीच प्रस्तुत स्थलनामाचा उच्चार चुकीचा का बरे केला असावा? कदाचित श्लीलाश्लीलतेबद्दलच्या (चुकीच्या) कल्पनांचा खेळ - अथवा पब्लिकला काय खपून जाईल, याची व्यर्थ चिंता - यांपैकी काही यामागे असावे काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>कदाचित श्लीलाश्लीलतेबद्दलच्या (चुकीच्या) कल्पनांचा खेळ - अथवा पब्लिकला काय खपून जाईल, याची व्यर्थ चिंता - यांपैकी काही यामागे असावे काय? <<<
श्लीलाश्लीलादि कारणांकरता विशेषनामांच्या उच्चारांमधील बदल म्हणजे, कवी कै. मर्ढेकर यांच्या शब्दांत सांगायचे तर "गात्रलिंग धुवून घे"ण्याचाच प्रकार आहे.

पहा :
पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

डोंबलाचं श्लीलाश्लील. आता सायबाच्या देशाचं नाव पहा, त्यांच्या देशाच्या राजधानीचं नाव पहा, त्यांच्या आजूबाजूच्या देशांची नावं पहा. सायबाचा देश सोडाच ... आपल्याकडेसुद्धा (आपल्या खंडात) देशांची नावं काय मेली श्लील आहेत. शेजारी कोण, पाकीस्तान, अफगाणिस्तान. आजूबाजूला कोण, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान. आता हे स्थान्/स्तान कुठून आले सांगा पाहू. उगाच अश्लील अश्लील म्हणून काय मेली बोंब मारायची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता सायबाच्या देशाचं नाव पहा, त्यांच्या देशाच्या राजधानीचं नाव पहा

'अ‍ॅना अँड द किंग ऑफ सयाम' या कादंबरीबद्दल कदाचित ऐकले असेल. गेला बाजार त्यावरील एखादा चित्रपट तरी पाहिला असेलच.

या कादंबरीच्या पार्श्वभूमीतील देशाबद्दलही असाच रोचक योगायोग अनुभवावयास मिळतो, असे जाता-जाता* नमूद करू इच्छितो.


* आता बास. Smile
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कादंबरी आणि चित्रपट दोन्ही बाबतीत अज्ञानीच होते. त्याचं फार आश्चर्य वाटलं नाही. पण अपशब्दांबाबत असणारं अज्ञान लक्षात आल्यामुळे अंमळ हळवी झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टू गुड!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असं काहीतरी ओढून ताणून लिहिलं बोललं, तर हल्लीच्या पिढीतले लगेच 'पीजे' हा शेरा मारतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा प्रकारच्या लेखनाकडे (स्वतःला) हल्लीच्या पिढीतले (समजणारे) फिरकत असतील, याबाबत साशंक आहे.

(बरोबरच आहे. स्मायल्या नाहीत, एसेमेसी शॉर्टहँड नाही, आणि बापरे, किती लांबण लावलीय! साधे कोणाला फॉर्वर्ड करायचे तरी किती एसेमेस खर्ची पडतील! हा काय विनोद आहे? जरा माणसाला समजेल असे आणि थोडक्यात आवरा की राव!)

अतिअवांतरः चेतन भगत हा तरुणाईचा एकमेव विनोदी लेखक आहे, असे अलीकडे आमचे प्रांजळ मत होऊ लागले आहे. (निदान तो उच्चकोटीचा विनोदी लेखक आहे, अशी आमची तरी समजूत आहे. अतिशय सटल. चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निदान तो उच्चकोटीचा विनोदी लेखक आहे, अशी आमची तरी समजूत आहे. अतिशय सटल.

यावर विस्तृत विवेचन वाचावयास आवडेल. खरंतर नवा धागाच काढावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडक्यात आवरते घेण्यासारखे असताना विस्तृत विवेचनाची आवश्यकता वाटत नाही. (नव्या धाग्याची तर नाहीच नाही.)

अतिशय हास्यास्पद लेखन अत्यंत गंभीरपणे, अतिशय साटल्यपूर्वक, यात विनोदाची काही झालर आहे अशी वाचकास शंकादेखील येऊ न देता करणे यात सदर लेखकाचा हातखंडा आहे. निदान माझ्या लेखी तरी हा उच्चकोटीचा विनोदच ठरावा.

पैकी माझा सर्वात आवडता विनोद वानगीदाखल पुरेसा आहे. आपल्या परप्रांतीय प्रेयसीशी विवाहास दोन्ही घरांतून विरोध होणार हे लक्षात घेऊन दोन्ही बाजूच्या पालकांस एकमेकांचा परिचय व्हावा, एकमेकांच्या सांस्कृतिक भेदभावांस त्यांना सामावून घेता यावे, एकमेकांबद्दलच्या सांस्कृतिक पूर्वग्रहांपलीकडे पाहून त्यांना एकमेकांना स्वीकारता यावे, थोडक्यात त्यांना 'एकमेकांची सवय व्हावी' या उद्देशाने त्यांना (विवाहाच्या बेताची पूर्वकल्पना न देता) गोव्यासारख्या त्रयस्थ पर्यटक स्थळी स्वतंत्रपणे (पूर्वयोजनेने) आणून (सहज योगायोगाने 'वर्गमित्राची'/'वर्गमैत्रिणीची' त्रयस्थस्थळी भेट झाल्याच्या आविर्भावात) गाठ घालून देऊन त्यांना एकमेकांबरोबर मोकळे सोडले असता, मधल्या काळात रात्रीच्या वेळी गोव्याच्या भर बीचवर प्रेयसीबरोबर संभोगाच्या योजना आखणे, आणि (इथवरही एक वेळ ठीक आहे, पण) असा पब्लिक बीचवरील संभोग आपण 'राष्ट्रीय एकात्मते'करिता करणार आहोत वगैरे 'उदात्त' कल्पना बाळगणे (आणि मुख्य म्हणजे त्याबद्दल अत्यंत गंभीरपणे जाहीर लिहिणे), हा अत्युच्च आणि अतिसटल विनोदाचा नमुना नाही, तर मग दुसरे काय आहे? (संदर्भः 'टू स्टेट्स'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आहे.

पाच पैकी तीन चित्रे युवरूप खंडातील आहेत. (परांच देशातील "प्रसूतल भूमी" आणि "मरुशैल पत्तन" आणि "लवणयान".) आम्रविका खंडात पिकलेले आंबे जात, आणि युवरूप खंडात कोवळ्या कैर्‍या खपत, असे कोणी आम्रवटशोकिन गुरुजी म्हणून गेले आहे.

परंतु कैर्‍या आणि आंबे यांच्यात फरक इतकाच की वाट बघितल्यास कैर्‍यांचे आम्र होतात, असे पुना सर्वसद्भावाने म्हणाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0