महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा
" वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो ”
सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा!
माझी स्वत:ची अगोदरच वेबसाईट/संकेत स्थळ असल्यामुळे, पुन्हा तिथे लिहिलेले इथे नक्कल करून चिकटवणे, माझ्या तत्त्वात बसत नाही. शेवटी कॉपी बहाद्दर होण्यासाठीहि, ’तेथे पाहिजे जातीचे’
मात्र, अधून मधून, ’ऐसी अक्षरे’ ... संकेतस्थळावर वाचक म्हणून जरूर भेटीन !
प्रतिक्रिया
?
WTF???
अगदी!
हो हो.
आणि तुम्हालाही गुजरात दिनाबद्दल शुभेच्छा.
धन्यवाद
'पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग' ही ओळ पाठ आहे; पण गुजरात दिन कधी असतो हे मला माहीत नाही.(माझ्या अती सामान्य ज्ञानाच्या पलिकडे असावे.) परंतु दिलेल्या शुभेच्छां बद्द्ल धन्यवाद !
एकाच दिवशी
जुळी भावंडं आहेत हो गुजरात आणि महाराष्ट्र ही.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
गिरा
गिरा म्हणजे काय?
" वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
हम्म्म्म...
'पडलेला' असा अर्थ खचितच नसावा, एवढाच अंदाज तूर्तास व्यक्त करू इच्छितो.
मोल्सवर्थ - आणखीच गोंधळ
मोल्सवर्थमध्ये 'गिरा'च्या अर्थांची नोंद पुढीलप्रमाणे आढळली:
त्यापुढे, 'गिर्हा'च्या अर्थांची नोंद तत्रैव पुढीलप्रमाणे आढळली:
एकंदरीत काहीच अर्थबोध न होऊन गोंधळ अधिकच वाढला, एवढेच नोंदवू इच्छितो.
युरेका! (अधिक विचाराअंती...)
'गिरा' = 'पडलेला' = 'पडीक' असा अर्थ घेतला तर?
'वचनिं लेखनीहि मराठी पडीक दिसो' - नाहीतरी बडबड आणि (उदाहरणार्थ, मसंवर) लिहिणे (जेथेजेथे म्हणून चालते अशी सर्व ठिकाणे) यात मराठी माणूस पडीक नाही दिसत, तर मग काय भय्या दिसतो?
गिरा शब्दाचा अर्थ
माझ्या माहितीनुसार
श्री. कृ. कोल्हटकरांच्या कविततेतील वरील पंक्तीत ' गिरा ' म्हणजे भाषा !
ऐसीअक्षरेवर स्वागत
मौजमजा सदरात शुभेच्छा बघून अंमळ गोंधळलो.
असो शिरीयस शुभेच्छा लेखकांच्या स्वतःच्या संकेतस्थळावर असाव्यात
असो. Vinata यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
- शुभेच्छा. - सदर -
ऐसी अक्षरे संकेत स्थळावर 'मौजमजा ' ह्या सदरात शुभेच्छा विषय दिल्यामुळे येथे शुभेच्छा लिहिल्या. असो.